फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, पितृपक्षाची सुरुवात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी होते आणि ही तिथी अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपते. पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण आणि आदर केला जातो. पितृपक्षाच्या 15 दिवसांत लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांच्यासाठी तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करतात. पितृपक्षात बऱ्याचदा दानधर्म आणि सत्कर्म केल्यानंतरही आपण पापाचे भागीदार बनतो. पितृपक्षात कोणत्या गोष्टींची खरेदी करु नये, जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी आपल्या पूर्वजांचे आत्मे समाधानी नसतात त्यावेळी त्याचे आत्मे पृथ्वीवर राहणाऱ्या त्यांच्या वंशजांना त्रास देतात. यालाच ज्योतिषशास्त्रामध्ये पितृ दोष म्हणतात. मान्यतेनुसार, आपल्या पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवरील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पाहत असतात आणि पितृपक्षात त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात, अशी मान्यता आहे. यावेळी अनेक गोष्टी आहेत त्या चुकूनही करु नयेत.
पितृपक्षात आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. या दिवसांत बूट, चप्पल, कपडे खरेदी करण्यास निषिद्ध मानले जाते. या काळात लग्न, साखरपुडा इत्यादी शुभ कार्यक्रम करु नये. वाईट कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये. त्याचबरोबर या काळामध्ये कांदा, लसूण, अंडी, मांस, मासे खाणे टाळावे. तसेच सोने चांदी देखील खरेदी करु नये. असे करणे अशुभ मानले जाते. या काळात धार्मिक कार्य करणे देखील टाळावे. कोणाशीही गैरवर्तन करू नका आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा.
पितृपक्षामध्ये लोखंडी वस्तू खरेदी करू नयेत. असे मानले जाते की पितृपक्षात लोखंडी वस्तू खरेदी केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. यामुळे व्यक्तीला काही समस्यांना तोंड द्यावे लागते.
पितृपक्षात मोहरीचे तेल घरी आणू नये. मिठाप्रमाणेच शेजाऱ्यांकडून मोहरीचे तेल देखील घेऊ नये. मोहरीच्या तेलात शनि ग्रह असल्याने व्यक्तीची दृष्टी कमी होऊ शकते. यामुळे पूर्वज दुःखी होतात आणि पितृदोष वाढण्याची शक्यता असते.
ॐ त्र्यंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम्। उर्वरुकमिव बंधनं मृत्युरमुखिया ममृतत् ।
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाया च धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात्।
ॐ पितृगणाय विद्महे जगत धारिणी धीमहि तन्नो पितृो प्रचोदयात्।
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)