फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ही तिथी खूप खास मानली जाते. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थी असेदेखील म्हटले जाते. या दिवशी उपवास देखील केला जातो आणि चंद्रोद्यानंतर हा उपवास सोडला जातो. हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणजेच सर्व अडथळे दूर करणारा देव मानले जाते.
पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात शुक्रवार, 16 मे रोजी सकाळी 4.3 मिनिटांनी होईल आणि या तिथीची समाप्ती शनिवार, 17 मे रोजी सकाळी 5.13 वाजता होईल. यावेळी संकष्टी चतुर्थीचे व्रत शुक्रवार, 16 मे रोजी पाळले जाईल. तसेच त्यावेळी चंद्रोद्य रात्री 10.39 मिनिटांनी होईल.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी देव्हारा स्वच्छ केल्यानंतर सर्वप्रथम, गणपतीची मूर्ती स्थापित करा आणि तीन वेळा तोंड स्वच्छ धुवा. यानंतर, गणेशजींना पंचामृताने स्नान घाला आणि मूर्तीसमोर दिवा लावा. पूजेवेळी गणपतीला हिरव्या रंगाचे कपडे, पवित्र धागा, चंदन, दुर्वा, सुपारी, तांदूळ, धूप, दिवा, पिवळी फुले आणि फळे इत्यादी अर्पण करा.
दुर्वा अर्पण करताना ‘श्री गणेशाय नमः दुर्वांकुरण समर्पयामि’ या मंत्राचा जप करा. यानंतर, गणेशजींना त्यांचे आवडते नैवेद्य म्हणजे मोदक आणि लाडू अर्पण करा. शेवटी, भगवान गणेशाचे मंत्र म्हणा आणि त्यांची आरती करा आणि सर्वांना प्रसाद वाटा.
एकडन्तया विद्महे, वक्रतुण्डया धीमही, तन्नो दंति प्रचोदयात्।
ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा ॥
ॐ गंग गणपतये नमो नमः
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सदा ।
एकादंतय शुद्धाय सुमुखाय नमो नमः
प्रपन्न जनपालाय प्रणतार्ति विनाशिने।।
ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये।
वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नमः॥
ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये
वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा॥
संकष्टी चतुर्थी ही विशेषतः भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता मिळविण्यासाठी साजरी केली जाते. हे व्रत केवळ अडथळे दूर करत नाही तर इच्छा पूर्ण करते. या दिवशी पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते असे म्हटले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)