फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येक महिन्यच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला संकष्ट चतुर्थीचे व्रत पाळले जाते. जून महिन्यात येणाऱ्या चतुर्थी तिथीला कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी म्हणतात. यावेळी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहे. या दिवशी गणपती बाप्पाचे भक्त उपवास करतात. जाणून घ्या कधी आहे संकष्टी चतुर्थी, शुभ मुहूर्त, शुभ योग
पंचांगानुसार, संकष्टी चतुर्थी तिथीची सुरुवात शनिवार, 14 जून रोजी दुपारी 3.46 वाजता होणार आहे. तसेच या तिथीची समाप्ती रविवार, 15 जून रोजी दुपारी 3.51 वाजता होईल. उद्यतिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत शनिवार, 14 जून रोजी पाळले जाणार आहे.
यावेळी ब्रम्ह मुहूर्त पहाटे 4.2 ते 4.43 असेल, अभिजीत मुहूर्त सकाळी 11.54 ते दुपारी 12.49 पर्यंत राहील, निशिता मुहूर्त मध्यरात्री 12.1 ते 12.42 पर्यंत. पूजा करण्यासाठी शुभ वेळ सकाळी 7.7 ते सकाळी 8.52 पर्यंत आहे.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहे. यावेळी सकाळी ब्रम्ह योगापासून ते दुपारी 1.13 वाजेपर्यंत असेल. तर इंद्रयोग दुपारी 1.13 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत असेल. तसेच या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग रात्री 12.22 ते 15 जून रोजी पहाटे 5.23 पर्यंत राहील. त्यानंतर उत्तराषाढ मध्ये नक्षत्र 15 जून रोजी सकाळी 12.22 वाजेपर्यंत असते. त्यानंतर श्रावण नक्षत्र सुरु होईल.
संकष्टी चतुर्थीला चंद्रोद्य रात्री 10 वाजून 7 मिनिटांनी होईल. यावेळी चंद्राची भक्तिभावाने पूजा करुन त्याला कच्चे दूध, पांढरे फुले, संपूर्ण तांदूळ आणि पाणी घालून जल अर्पण करावे. त्यानंतर उपवास सोडावा.
संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठून सर्व आवरुन स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करावी. त्यानंतर हातात पाणी आणि फुले घेऊन प्रतिज्ञा करावी. ‘ॐ गं गणपतये नमः’आणि ‘ॐ भालचंद्राय नमः’ या मंत्रांचा जप करा. गणपती बाप्पाला दुर्वा लाल फुले, मोदक, तीळ, फळे, चंदन, अगरबत्ती, दिवे इत्यादी गोष्टी अर्पण करा. पूजा झाल्यानंतर आरती करुन नैवेद्य दाखवा.
मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीला उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी मान्यता आहे. तसेच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते, असे देखील मानले जाते. या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा, सिंदूर, मोदक, फळे इत्यादी अर्पण केल्यास तुम्हाला अपेक्षित फळ मिळते, असे म्हटले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)