फोटो सौजन्य- istock
सनातन धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. यावेळी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरीब गरजूवंतांना काही वस्तूचे दान करावे. या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार, पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि तुळशीच्या रोपाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आपल्या सर्वांवर आशीर्वाद कायम राहतो, अशी मान्यता आहे. तुम्हालाही देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर ठेवायची असेल तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे हे उपाय तुम्ही करु शकता. जाणून घ्या ज्येष्ठ पौर्णिमेला तुळशीचे कोणते उपाय करायचे.
तुम्ही जीवनामध्ये बऱ्याच काळापासून अनेक अडचणींचा सामना करत असाल तर ज्येष्ठ पौर्णिमेला तुळशीच्या झाडाला उसाचा रस अर्पण करुन तुळशीसमोर दिवा लावून आरती करा. हे सर्व उपाय केल्याने तुमच्या जीवनामधील असलेल्या सर्व अडी अडचणी संपतील.
जर तुम्ही एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात केली आहे आणि तो व्यवसाय पुढे वाढत नसल्यास ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावणे फायदेशीर ठरु शकते. त्याचबरोबर तुळशीच्या रोपाजवळ फळे आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा. ज्येष्ठ पौर्णिमेला हे उपाय केल्याने व्यवसायात प्रगती होतेच तसेच तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीचा कायम आशीर्वाद राहतो.
भगवान विष्णू यांना जगाचे रक्षणकर्ता म्हणून ओळखले जाते. विष्णूंना तुळशीचे रोप खूप आवडते म्हणून विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी व्यक्तीने पवित्र नदीत स्नान करुन पिवळ्या धाग्याला 108 गाठी बांधून तुळशीच्या रोपाला बांधा. असे म्हटले जाते की, हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होऊन व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच त्यांना सर्व कामामध्ये यश देखील मिळते.
जर तुम्हाला एखाद्या कामामध्ये, व्यवसायात किंवा इतर कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळवायचे असल्यास ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला लाल चुनरी किंवा कच्चे दूध अर्पण करा. त्याचबरोबर व्यक्तीच्या जीवनात सुख शांतीसाठी प्रार्थना करावी. धार्मिक मान्यतेनुसार, हे सर्व उपाय केल्यास तुमची सर्व प्रलंबित कामे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने पूर्ण होतील.
तुलसी श्रीमहालक्ष्मीरविद्या यशस्विनी ।
धर्मया धर्मान्ना देवी देवीदेवमनः प्रिया ।
लभते सूत्र भक्तिमन्ते विष्णुपदम् लभेत् ।
तुलसी भूरमहलक्ष्मी: पद्मिनी श्रीहरहरप्रिया।
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)