करवीर निवासिनी म्हणून जिची आहे अशी आदी माया आदिशक्ती आई अंबाबाई. महाराष्ट्राच्या अनेक कुळांचं दैवत खंडेराया , कुलस्वामिनी आई तुळजाभवानी या प्रमाणे कोल्हापूरची आई अंबाबाई देखील आहे. याच अंबाबाईचं महात्म्य आज जाणून घेऊयात.
साडेतीन शक्तीपीठापैंकी एक देवीचं शक्तीपीठ म्हणजे करवीरनिवासिनी आई अंबाबाई. भक्तांच्या रक्षणासाठी धावून येणारी आई अंबाबाई ही कोल्हापूर कशी राहिली याबाबत देखील एक आख्य़ायिका सांगितली जाते.
पुराणकथेनुसार, कोह्लासूर नावाचा एक असूर म्हणजेच राक्षस होता. तो पराक्रमी, अत्यंत बलशाली आणि अहंकारी होता. ब्रह्मदेवाच्या कठोर तपश्चर्येमुळे त्याला असा वर मिळाला की त्याचा वध फक्त स्त्रीच्या हातूनच होऊ शकेल. या वरामुळे कोह्लासूराने संपूर्ण पृथ्वीवर अत्याचार सुरू केले. त्याने त्य़ाला मिळालेला वरदानाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. पृथ्वीवर घातलेल्या थैमानामुळे अनेक निष्पाप जीवांना याचा त्रास व्हायला लागला. देव, ऋषी आणि लोक त्याच्या अत्याचाराने त्रस्त झाले. सर्व देवांनी एकत्र येऊन आदिशक्तीला प्रार्थना केली. त्यानुसार देवी महालक्ष्मी (अंबाबाई) प्रकट झाली. देवीने कोह्लासूराला युद्धासाठी आव्हान दिलं. दीर्घकाळ चाललेल्या प्रखर युद्धात अखेर देवीने कोह्लासूराचा वध केला.
मरण्याआधी कोह्लासूराने देवीला प्रार्थना केली की, ज्या ठिकाणी तू माझा वध केलास ते ठिकाण माझ्या नावाने ओळखलं जावं. या ठिकाणी भक्त तुझ्या दर्शनासाठी आले तरी हा प्रदेश माझ्या नावाने ओळखला जावा. आदीशक्तीने कोल्हासूराला वरह दिला. याच कोल्हासूराच्या नावारुन ओळखलं जाणारं ठिकाण म्हणजे कोल्हापूर.
कोल्हापूरची अंबाबाई म्हणजेच श्री महालक्ष्मी ही भक्तांना संपत्ती, सौभाग्य आणि शक्ती प्रदान करणारी देवी मानली जाते. नवरात्र, पौर्णिमा आणि शुक्रवारच्या दिवशी येथे विशेष पूजाअर्चा केली जाते. मंदिरातील मूर्तीला चार हात आहेत – शंख, चक्र, गदा आणि पाषाण यांचे प्रतीक घेऊन ती विष्णूच्या सहचारिणी लक्ष्मीचे स्वरूप दर्शवते.ही कथा देवीच्या स्त्रीशक्तीचं प्रतीक आहे. कोह्लासूराच्या अत्याचारांचा अंत स्त्रीशक्तीने करून समाजात धर्म आणि न्याय प्रस्थापित केल्याचं महत्त्व या आख्यायिकेतून स्पष्ट होतं.
करविर निवासिनी आई अंबाबाई ही स्त्रीशक्ती प्रमाणे सैभाग्याच्या प्रतीक मानलं जातं. देवीच्या दर्शनासाठी जाताना भाविक हिरव्या बांगड्या, कुंकू, हिरवी साडी आणि देवीचा साजश्रृंगार ओटीसाठी घेऊन जातात. हिरवा रंग हा समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक आहे. त्यामुळे हिरव्या रंगाची साडी देखील देवीला वस्त्र म्हणून परिधान केली जाते.