फोटो सौजन्य- pinterest
शारदीय नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवस देवीच्या विविध रुपाला समर्पित आहे. यावेळी देवीची प्रत्येक रुपाची पूजा करताना पूजेच्या साहित्यासोबतच फुलाला देखील विशेष महत्त्व आहे. शास्त्रांनुसार, नवरात्रीमध्ये देवीला काही फुले देवीला विशेष प्रिय असतात त्यापैकी एक आहे पारिजातकाचे फूल. हे सर्वात पवित्र आणि दुर्मिळ मानले जाते. असे मानले जाते की हे फूल घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य आणते आणि ते अर्पण केल्याने देवीचा आशीर्वाद कायम भक्तांवर राहतो.
पूजेमध्ये फुलांना अत्यंत महत्त्व आहे. प्रत्येक भक्ताला माहीत आहे की, योग्य फुले अर्पण करणे हा देवीला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. पण अशी काही फुले आहेत जी फक्त सौंदर्यासाठीच नाही तर आध्यात्मिक शक्ती आणि आशीर्वादासाठी देखील ओळखली जातात. यामुळे भक्ताला प्रत्येक कामात अपेक्षित यश लाभते.
बंगालमध्ये पारिजात फूल हे दुर्गा देवीच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते. ते विशेषतः पूजेमध्ये आणि मंदिरांमध्ये सजावट आणि नैवेद्यासाठी ठेवले जाते. असे म्हटले जाते की, देवीला ताजी आणि सुगंधित फुले अर्पण केल्यास भक्तांवर देवीचा कायम आशीर्वाद राहतो. स्थानिक परंपरेत ते नशीब आणि शांती आणणारे मानले जाते.
शास्त्रांमध्ये पारिजात वृक्षाचा उल्लेख देवीच्या आवडत्या फुलांपैकी एक म्हणून केला जातो. हे फूल फक्त सजावटीसाठी नसून भक्ती, श्रद्धा आणि उर्जेचे प्रतीक आहे. पुराणांमध्ये या फुलांचे वर्णन देवीच्या आगमनाचे आणि आशीर्वादाचे लक्षण म्हणून केले आहे. हे फूल भक्तांचे मन शुद्ध करते आणि घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा पसरवते.
पूजेदरम्यान पारिजात फूल स्वच्छ आणि ताजे ठेवा. या फुलाला देव्हाऱ्यात, मंदिरात किंवा कपाटात ठेवता येते. यामुळे घराचे सौंदर्य वाढतेच त्यासोबतच देवीचे आशीर्वाद आणि सकारात्मक उर्जेचा प्रवाह देखील सुनिश्चित होतो.
पारिजातचा नाजूक सुगंध आणि दिव्य स्वरूप भक्तांसाठी खास असतो. बंगालमध्ये या फुलाला मातृदेवतेच्या आगमनाचे लक्षण मानले जाते आणि भक्तांना त्याच्याशी आध्यात्मिकरित्या जोडलेले वाटते. हे फूल घरात सौभाग्य, शांती आणि शक्तीचे प्रतीक बनते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)