फोटो सौजन्य- istock
आज धनत्रयोदशी आहे ज्याला धनतेरस असे म्हटले जाते. हा सण धनसंपत्तीशी संबंधित आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, पितळ किंवा इतर धातूच्या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. दरम्यान धनत्रयोदशीला सोने आणि पितळ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. धनत्रयोदशीला सोने का खरेदी करतात? या वर्षी धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे? जाणून घ्या
धनत्रयोदशी तिथीची सुरुवात 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.20 पासून होत आहे आणि त्याची समाप्ती 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.54 वाजता होईल. धनत्रयोदशीच्या पूजा करण्याचा मुहूर्त संध्याकाळी 6.59 ते 8.56 पर्यंत असेल. धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्यासाठी मुहूर्त 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.20 ते रात्रीपर्यंत कधीही तुम्ही सोने चांदीची खरेदी करु शकता.
देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवी मानली जाते. जीवनामध्ये सोने आणि चांदी हे मौल्यवान धातू मानले जातात. एखाद्या व्यक्तीकडे जितकी जास्त संपत्ती, मालमत्ता आणि दागिने असतील तितकेच त्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे. धनत्रयोदशीला सोने, चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी केली जाते. ज्यावेळी या वस्तू घरी आणल्या जातात त्यावेळी त्या लक्ष्मीच्या रूपात दिसतात ज्याचा संबंध संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होण्याचे प्रतीक आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी किंवा देवी लक्ष्मीशी संबंधित इतर वस्तू खरेदी केले जातात. हा दिवस देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्याचा दिवस मानला जातो.
पौराणिक मान्यतेनुसार, कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला होता. ते हातात अमृत असलेले सोन्याचे भांडे घेऊन प्रकट झाले. त्यांना देवी लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. असे म्हटले जाते की, भगवान धन्वंतरी यांना पिवळा रंग खूप आवडतो. म्हणून धनत्रयोदशीच्या लोक सोने, पितळ आणि इतर वस्तूंची खरेदी करतात. या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा देखील केली जाते, ज्यामुळे दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य मिळते.
धनत्रयोदशीला सोने, चांदी इत्यादी खरेदी केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते आणि कठीण काळात ते कामी येते.
धनत्रयोदशीला खरेदी केलेले सोने आणि चांदीचे दागिने घातल्याने कुंडलीतील गुरु दोष आणि चंद्र दोष नाहीसा होण्यास देखील मदत होते.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी इत्यादी वस्तूंची खरेदी केल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात, असे म्हटले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)