फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येकाला स्वप्ने पडतात. कधीकधी स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी या शुभ असतात तर काही अशुभ असतात. स्वप्नशास्त्र आणि ज्योतिषानुसार स्वप्नांना विशेष महत्त्व आहे. विशेषतः गुरुवारी रात्री पडणारी स्वप्ने ही देवगुरू बृहस्पतीशी संबंधित असल्याची मानली जातात. गुरू ग्रह ज्ञान, धर्म, नीतिमत्ता आणि भविष्याचा संकेत देतो. त्यामुळे या दिवशी स्वप्नात दिसणारे काही संकेत शुभ तर काही अशुभ घटनांचे पूर्वसंकेत मानले जातात. गुरुवारी रात्री जर काही विशिष्ट दृश्ये वारंवार दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
गुरुवारी रात्री येणाऱ्या स्वप्नांचे आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे असल्याचे मानले जाते. श्रद्धेनुसार जर गुरुवारी रात्री भगवान विष्णू किंवा देवांचे गुरु बृहस्पति यांचे स्वप्न पडले तर, हे त्या व्यक्तीची इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचे लक्षण मानले जाते. गुरुवारी रात्रीचे स्वप्न देखील गुरु ग्रहाच्या आशीर्वादाशी संबंधित आहेत. गुरुवारी रात्री कोणती स्वप्ने अशुभ आहेत ते जाणून घ्या
स्वप्नामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या दिसणे अशुभ किंवा विनाशकारी घडणार असल्याचे मानले जाते. गुरुवारी रात्री दिसणारी अशी काही स्वप्ने आहेत ती अशुभ मानली जातात. जर अशी स्वप्न ब्रम्ह मुहूर्ताच्या जवळपास दिसणे म्हणजे येणाऱ्या काळाबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.
गुरुवारी रात्री स्वप्नात एखाद्याचा अचानक मृत्यू पाहणे, स्मशानभूमीत किंवा भयानक ठिकाणी स्वतःला पाहणे, दात पडणे किंवा तुटणे, अचानक खूप मुसळधार पाऊस किंवा वादळ येणे किंवा एखादा प्राणी जखमी किंवा मृत दिसणे हे खूप अशुभ आहे. ही स्वप्ने जीवनामध्ये समस्या, आरोग्य समस्या किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान दर्शवतात.
स्वप्नात पूर्ण अंधार, काळी सावली किंवा रस्ता चुकल्यासारखे वाटणे हे मानसिक तणाव, चुकीचे निर्णय किंवा येणाऱ्या अडचणींचे संकेत असू शकतात.
स्वप्नात रक्त पाहणे, अपघात होणे किंवा उंचावरून पडणे हे नुकसान, आजार किंवा अचानक येणाऱ्या संकटाचे संकेत असू शकतात.
स्वप्नात घाण पाणी, दलदल किंवा बुडताना दिसणे हे आर्थिक अडचणी, कर्ज किंवा मानसिक अडथळ्यांचे संकेत असू शकतात.
गुरुवारी रात्री देवमूर्ती तुटलेली किंवा अपवित्र अवस्थेत दिसणे हे धार्मिक दोष, गुरुदोष किंवा आत्मविश्वास कमी होण्याचे लक्षण मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस मानला जातो. गुरु ज्ञान, धर्म आणि भविष्याशी संबंधित असल्याने या दिवशी पडलेली स्वप्ने संकेत देणारी मानली जातात.
Ans: अपघात, रडणे, अंधार, पडणे, साप चावणे, भांडण, मृत व्यक्ती दुःखी दिसणे किंवा स्वतःला अडचणीत पाहणे ही स्वप्ने अशुभ समजली जातात.
Ans: स्वप्नातील संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास समस्या वाढण्याची शक्यता असते, असे स्वप्नशास्त्र सांगते.






