फोटो सौजन्य: Pinterest
हिंदू धर्मानुसार प्रत्येक ग्रहाचे ज्याचे त्याचे गुणवैशिष्ट्यं आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की, पत्रिकेत जे ग्रह उच्च निच्च होतात त्यानुसार प्रत्येकाच्या आयुष्यावर त्याचा चांगला वाईट परिणाम होतो. अनेकदा चांगलं काम करुन ही नोकरी किंवा व्य़वसायात पाहिजे तसं यश मिळत नाही. त्याचबरोबर समाजात मान प्रतिष्ठा देखील कमी होते. धर्मशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की या समस्या पत्रिकेतील सूर्य निचेचा असल्याने होतं. जर तुम्हाला योग्य काम करुनही पाहिजे तसं फळ मिळत नसेल तर तुम्ही घरात तांब्याचा सूर्य लावणं फायदेशीर आहे. या तांब्य़ाच्या सूर्याचे असे कोणते चांगले फायदे आहेत ते ज्योतिषशास्त्राच्या आधारावर जाणून घेऊयात.
ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की, मान सन्मान पदोन्नती हे सूर्यदेवांच्य़ा कृपेमुळे प्राप्त होतं. समाजातील प्रतिष्ठा ही सूर्यदेव मिळवून देतात. याउलट जर पत्रिकेतील सूर्य खराब असल्यास मानहानी अपमानास्पद वागणूक यासगळ्याला सामोरं जावं लागतं. यावरच उपाय म्हणजे तांब्याचा सूर्य. जर घरात कौटुंबिक वाद होत असल्यास तुम्ही घरात तांब्याचा सूर्य लावू शकता. हे नेमकं कसं लावायच आणि याची पुजा कशी करायची याचं देखील शास्त्र आहेत.
तांब्याचा सूर्य घराच्या पूर्व दिशेला लावावा. पूर्व दिशा ही सूर्योदयाची दिशा आहे. त्यामुळे घराच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर तांब्याचा सूर्य लावावा. फक्त हा सूर्य भिंतीवर लावायचा नाही तर त्याला वेळोवेळी स्वच्छ करणं देखील तितकच महत्वाचं आहे. तांब्याच्या सूर्याची सूर्योदयाच्या वेळी पूजा करावी. यावेळी सूर्यदेवांचं सुस्तीपठण करावं. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
1) ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत सूर्य दुर्बल, ग्रहीण किंवा अकार्यक्षम असेल, त्यांनी तांब्याच्या पात्रात जल ठेवून सूर्याला अर्घ्य दिल्यास दोष कमी होतो.
2) सूर्य हा राजयोगाचा ग्रह आहे. त्याचे तांब्याच्या स्वरूपात पूजन केल्यास नेतृत्वगुण, आत्मविश्वास व समाजात मान वाढतो.
3) तांब्याचा सूर्य म्हणजे सकारात्मक उर्जा. दररोज सकाळी तांब्याच्या पात्रात जल भरून त्यात थोडंसं कुंकू किंवा लाल फुल घालून सूर्याला अर्घ्य दिल्यास मनःशांती व आध्यात्मिक बल प्राप्त होतं.
4) घरात तांब्याचा सूर्यरूप यंत्र किंवा प्रतीक ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर राहते.