फोटो सौजन्य- pinterest
आज शनिवार, 30 ऑगस्ट रोजी दुपारी 4.48 वाजता बुध सिंह राशीमध्ये आपले संक्रमण करणार आहे. बुद्धिमत्ता, संवाद आणि व्यवसायाचे प्रतीक असलेला बुध ग्रह, सूर्याच्या, ग्रहांचा राजा, सिंह राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाला ग्रहांचा राजा मानले जाते, जो तर्कशास्त्र, हुशारी आणि बौद्धिक क्षमतेचे प्रतीक आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे जो अग्नि राशी आहे. या संक्रमणादरम्यान, सूर्य आणि केतुच्या उपस्थितीमुळे त्रिग्रही योग आणि बुधादित्य योग देखील तयार होत आहे. हे योग आणि संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी शुभ मानले जाते. हे संक्रमण लेखन, संवाद, व्यवसाय आणि सामाजिक प्रतिष्ठा या क्षेत्रांमध्ये भरपूर यश मिळेल. या संक्रमणाचा कोणत्या 4 राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे हे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. हा संक्रमणादरम्यान लेखन, पत्रकारिता आणि माध्यमांसारख्या संवादाशी संबंधित कामांमध्ये प्रचंड यश मिळेल. भावंडांकडून मिळणारा पाठिंबा तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. जे लोक नवीन प्रकल्पाची सुरुवात करु इच्छित आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप शुभ आहे. तुमची बौद्धिक क्षमता आणि धाडसी निर्णय तुम्हाला तुमच्या ध्येयांच्या जवळ घेऊन जाऊ शकतात.
सिंह राशीच्या कुंडलीमध्ये हे संक्रमण पहिल्या घरामध्ये होणार आहे. या संक्रमणाचा संबंध घर व्यक्तिमत्व, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाशी संबंधित आहे. त्यामुळे हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. सूर्य आणि बुध ग्रहाच्या युतीमुळे या राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये बुधादित्य योग तयार होत आहे. त्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. या काळामध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकते. तसेच व्यावसायिकांना अपेक्षित यश मिळू शकते.
तूळ राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण सकारात्मक राहील. कारण हे संक्रमण या राशीच्या कुंडलीमध्ये 11 व्या घरावर परिणाम करणारे आहे. या संक्रमणाचा संबंध नफा, सामाजिक नेटवर्क आणि इच्छा पूर्ण करण्याशी संबंधित आहे. हे संक्रमण व्यावसायिक आणि नोकरी करणाऱ्यांसाठी खूप शुभ आहे. शेअर बाजार, गुंतवणूकीमध्ये या लोकांना अपेक्षित लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण 10 व्या घरात होत आहे. या संक्रमणाचा संबंध करिअर, सामाजिक प्रतिष्ठा आणि कार्यक्षेत्राशी संबंधित आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ पदोन्नती, आदर आणि प्रगतीच्या संधी घेऊन येईल.
व्यावसायिकांना नवीन प्रकल्प आणि भागीदारीत यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)