फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येकाला चांगले काम करुन आपल्या कारकिर्दीत यश मिळवावे, अशी इच्छा असते. तुमच्या कामाच्या ठिकाणी वाईट गोष्टी ठेवल्याने तुमच्या करिअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यश मिळविण्यासाठी मेहनतीसोबत वास्तूच्या नियमांचे पालन करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. या नियमांचे पालन केल्याने तुमच्या कामकाजाच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात.
कामाच्या ठिकाणी तुमच्या डेस्कसमोर डोंगराचे चित्र लावणे खूप शुभ मानले जाते किंवा त्याऐवजी असा फोटो लावा जो तुम्हाला सतत प्रेरणा देत राहील. रिकामी भिंत असल्याने तुम्हाला तुमच्या डेस्कवर जास्त वेळ बसण्याची इच्छा कमी होते आणि काही प्रकारे ते तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवते.
वास्तुशास्त्रानुसार, करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी कधीही तुमच्या मागे भिंतीवर पाण्याच्या स्रोतांशी संबंधित कोणतेही चित्र किंवा पोस्टर लावू नये. असे फोटो टाकल्याने कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांसोबतचे तुमचे संबंध बिघडू शकतात. तुम्हाला करिअरमध्ये प्रगती करायची असल्यास अशी चित्रे लावणे टाळा.
कामाच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी बसणे टाळा. गर्दीच्या ठिकाणी नवीन कल्पना सचण्याची शक्यता कमी असते. सर्जनशील कल्पनांनी परिपूर्ण असलेल्या लोकांसोबत बसण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये अशा लोकांच्या जवळ बसल्याने सर्जनशीलता वाढते. सर्जनशील कल्पना मिळविण्यासाठी खिडकीजवळील जागा निवडा.
कामाच्या ठिकाणाचे फर्निचर नेहमी आरामदायी असावे. मात्र वास्तुशास्त्रानुसार कामाच्या ठिकाणी तुमची बसण्याची जागा लाकडापासून बनलेली आयताकृती किंवा चौकोनी असावी. ऑफिसमध्ये कोणत्याही तुटलेल्या खुर्चीवर किंवा फर्निचरवर बसल्याने तुमच्या करिअरध्ये अडथळा येऊ शकतो. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
ऑफिसमध्ये काम करतेवेळी तुमच्याकडे टेबल लॅम्प असेल तर तो टेबलाच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवणे योग्य मानले जाते. असे केल्याने तुम्हाला अनेक संधी मिळतात आणि आर्थिक लाभही मिळतो. आर्थिक प्रगतीसाठी या दिशेला झाडे लावणे देखील शुभ मानले जाते.
कामाच्या ठिकाणी कधीही काटेरी किंवा निवडुंगाची झाडे लावू नयेत. वास्तुशास्त्रानुसार, ऑफिसमध्ये अशा वनस्पतींचा वापर केल्याने व्यक्तीमध्ये शांती आणि आरामाची भावना कमी होते. तसेच काटेरी झाडे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना देखील इजा करू शकतात. त्यामुळे कार्यालयात फक्त काटेरी नसलेली रोपे लावावीत.
करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी ऑफिसमध्ये तुमचे टेबल स्वच्छ ठेवा. घाणेरड्या टेबलाचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर वाईट परिणाम होतो. जे तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)