फोटो सौजन्य- pinterest
गुरुपुष्यामृत योग हा ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत शुभ आणि मंगल योग मानला जातो. जेव्ह गुरू ग्रह यांचा दिवस म्हणजे गुरुवार आणि पुष्प नक्षत्र जेव्हा एकाच दिवशी येतात तेव्हा हा योग तयार होतो. यालाच अमृत योग असंही म्हणतात. कारण या काळात केलेली शुभ काम दीर्घकाळ लाभ देतात, अशी श्रद्धा आहे. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रातील अत्यंत शुभ मानलं जातं. त्यात गुरुवारचा दिवस आल्यामुळे या योगाचं महत्त्व आणखी वाढतं.
ज्योतिषशास्त्रानुसार हा योग संपत्ती, ज्ञान, प्रगती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारा मानला जातो. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. अनेक लोक या दिवशी सोनं, चांदी, वाहन, घर किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात. नवीन व्यवसाय सुरू करणे, गुंतवणूक करणे, बॅंक खाते उघडणे किंवा महत्त्वाचे करार या दिवशी करणे अत्यंत शुभ मानलं जातं. धार्मिकदृष्ट्याही या योगाला विशेष महत्त्व आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांनी नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, पुस्तक खरेदी करणे किंवा नवीन कौशल्य शिकण्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो. याकाळात तुम्हाला अपेक्षित यश मिळते असे म्हटले जाते.
या दिवशी भगवान विष्णू, बृहस्पति देव आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. काही लोक गुरू मंत्र जप, दानधर्म आणि धार्मिर ग्रंथांच वाचन करतात. लोकांचा असा विश्वास आहे की, या योगामध्ये केलेलं दान, जप आणि शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात. त्यामुळे व्यापारी, गृहस्थ आणि धार्मिक श्रद्धा असलेले लोक या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात.
हा योग केवळ भौतिक लाभासाठी नसून मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठीही महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी केलेली प्रार्थना आणि साधना मनाला स्थैर्य देते अशी श्रद्धा आहे.
वाद-विवाद आणि नकारात्मक विचार टाळावेत
कोणालाही दुखावणारे बोलणे टाळावे
चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न करू नये
धार्मिक श्रद्धांचा अपमान टाळावा
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा एकत्र संयोग झाल्यावर तयार होणाऱ्या शुभ योगाला गुरुपुष्यामृत योग म्हटले जाते.
Ans: गुरु ग्रह ज्ञान, भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो, तर पुष्य नक्षत्र अत्यंत पवित्र नक्षत्र मानले जाते. त्यामुळे हा योग शुभ आणि फलदायी मानला जातो.
Ans: सोने खरेदी, नवीन व्यवसाय सुरू करणे, गुंतवणूक, घर-वाहन खरेदी आणि धार्मिक कार्य करणे शुभ मानले जाते.






