उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक ३ च्या हद्दीत येणाऱ्या पॅनल क्रमांक १२ मधील तीन नंबर ओटी सेक्शनच्या संतोष नगर रोड परिसरात अवैधरित्या भरविण्यात आलेल्या भाजी मंडईवर पालिका प्रशासनाने मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान रस्ता आणि पदपथावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या अनेक हातगाडी चालकांच्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या, तसेच पदपथावर उभारण्यात आलेले अवैध शेडही हटविण्यात आले.