Maharashtra Breaking News Updates Today
NEET Exam 2026: ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी लातूरचा डॉक्टर मनोज शिरुरे सीबीआयकडून अटक
देशभरात खळबळ उडवणाऱ्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात (NEET Exam 2026 Paper Leak) केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातून आणखी एका आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी लातूरचा मूळ रहिवासी असून त्याचे नाव डॉ. मनोज शिरुरे असे आहे. बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. शिरुरे याने मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकरकडून स्वतःच्या मुलासाठी नीटचा पेपर खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे. सीबीआयने त्याला लातूरहून चौकशीसाठी पुण्यात आणले होते आणि कसून चौकशी केल्यानंतर त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली. नीट पेपरफुटीच्या आतापर्यंतच्या तपासात एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी केवळ पेपर फोडणाऱ्या आणि विकणाऱ्यांवर कारवाई झाली होती, मात्र आता थेट पेपर खरेदी करणाऱ्या पालकालाच अटक झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून याचे धागेदोरे आणखी गडद होत चालले आहेत.
21 May 2026 05:40 PM (IST)
मुंबई शहरात लोकल ट्रेन, मेट्रो, BEST बस आणि गर्दीने भरलेले रस्ते हे नेहमीचं चित्र आहे. पण गेल्या काही वर्षांत मुंबईच्या रस्त्यांवर आणखी एक गोष्ट झपाट्याने वाढताना दिसते आहे ती म्हणजे ट्रॅफिक आणि त्यासाठी जबाबदार असलेला एक मुख्य घटक म्हणजे वाहनांची संख्या. 2026 पर्यंत मुंबईतील नोंदणीकृत वाहनांची संख्या 53 लाखांच्या पुढे गेली आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक हिस्सा हा खासगी वाहनांचा आहे. दोन चाकी आणि खासगी कार्स मिळून शहरातील जवळपास 88 टक्के वाहनसंख्या तयार होते. वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली, सार्वजनिक वाहतुकीवरील ताण आणि सोयीसाठी स्वतःच्या वाहनांकडे वाढलेला कल यामुळे मुंबईचे रस्ते दिवसेंदिवस अधिक व्यस्त होत आहेत.
21 May 2026 05:30 PM (IST)
आयपीएल २०२६ मध्ये आता फक्त ५ लीग स्टेज सामने बाकी आहेत. साखळी फेरीचा शेवट जवळ आला असून प्लेऑफच्या शर्यतीत आता चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. मात्र चौथ्या आणि अखेरच्या जागेसाठी राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात जोरदार स्पर्धा सुरू आहे. सध्या प्रत्येक सामन्यानंतर पॉईंट्स टेबलचे चित्र बदलत आहे. काही संघांचे भवितव्य त्यांच्या स्वतःच्या विजयावर अवलंबून आहे, तर काहींना इतर संघांच्या निकालांचीही प्रतीक्षा करावी लागणार आहे.
21 May 2026 05:20 PM (IST)
नवी दिल्ली: जगातील वाढत्या आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार (Central Goverment) पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आफ्रिकेतील वाढता प्रादुर्भाव पाहून ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ (जागतिक आरोग्य आणीबाणी) घोषित केल्यानंतर, भारत सरकारने तातडीने देशव्यापी ‘हेल्थ ॲडव्हायझरी’ जारी केली आहे. देशात व्हायरसचा शिरकाव रोखण्यासाठी सर्व विमानतळे (Airports), बंदरे आणि आंतरराष्ट्रीय एंट्री पॉईंट्सवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कडक स्क्रीनिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतात अद्याप इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, ही दिलासादायक बाब असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाला नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
21 May 2026 05:05 PM (IST)
Tumbadchi Manjula : तुंबाडची मंजुळा या रहस्य आणि कॉमेडीचा अनोखा संगम असलेल्या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पोस्टर, टिझर आणि गाण्यांमधून आधीच उत्सुकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरने आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. रहस्य, भीती, गुढता आणि त्यात मिसळलेली गावकऱ्यांची भन्नाट कॉमेडी यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक प्रेक्षक हा चित्रपट एक परिपूर्ण मनोरंजनाची मेजवानी ठरणार असल्याचं म्हणताना दिसत आहेत.
21 May 2026 05:00 PM (IST)
पुणे/चंद्रकांत कांबळे : पुणे शहरातील वाढती वाहनसंख्या लक्षात घेता वाहन चालविण्याच्या परवान्यांसाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणे यांच्या माध्यमातून मागील दोन वर्षांत तब्बल ४ लाख ३९ हजार २५३ वाहन चालकांनी कायमस्वरूपी वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) प्राप्त केला आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनांचा समावेश आहे.
21 May 2026 04:50 PM (IST)
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचे जुने सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ते अजय महाराज बारस्कर यांनी आंदोलनाच्या माध्यमातून काही जणांनी आर्थिक लाभ घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेत बारस्कर यांनी जमीन व्यवहार, वाळू प्रकरणे आणि कथित बेहिशेबी संपत्तीबाबत पुरावे असल्याचा दावा करत चौकशीची मागणी केली. माझा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध नाही. त्यांनी उपोषण करावे. मात्र, आंदोलनातून नेमका कुणाला फायदा झाला, हे समाजासमोर येणे गरजेचे आहे.
21 May 2026 04:45 PM (IST)
नवी मुंबई शहराच्या उभारणीसाठी आपल्या जमिनींचा त्याग करणाऱ्या ठाणे, उरण आणि पनवेल तालुक्यातील ९५ गावांतील प्रकल्पग्रस्तांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले जिव्हाळ्याचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी खासदार श्री. सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक (MD) विजय सिंघल यांची सिडको भवन, बेलापूर येथे भेट घेऊन त्यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले.या बैठकीत खासदार सुरेश म्हात्रे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या विविध न्याय्य मागण्यांवर आक्रमकपणे बाजू मांडली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सह-व्यवस्थापकीय संचालक (JMD) श्री. गणेश देशमुख यांना प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर तातडीने एक विशेष बैठक आयोजित करून हे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे निर्देश दिले आहेत.
21 May 2026 04:40 PM (IST)
चिपळूण तालुक्यातील कळमुंडी गावच्या बौद्धवाडीतील सर्व ग्रामस्थांनी शिवसेना नेते आणि गुहागर मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव आणि जिल्हाप्रमुख श्री. विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. याआधी आम्ही अन्य पक्षाचे काम करत होतो. परंतु सत्तेत असतानाही आमच्या वाडीचा विकास त्यांच्याकडून होऊ शकला नाही. दुसरीकडे विरोधी पक्षाचे आमदार असतानादेखील तुमच्या माध्यमातून मतदारसंघात सुरू असलेला विकासकामांचा धडाका पाहून आम्ही प्रभावित झालो आणि आमच्या वाडीने एकसंघपणे आपल्या सोबत येण्याचा निर्णय घेतला. यापुढे आपल्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी कायम राहू, असे उद्गार प्रवेशकर्त्यांनी काढले. या सर्वांचे पक्षात स्वागत करताना आमदार श्री. जाधव यांनी आपल्या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द दिला.
21 May 2026 04:35 PM (IST)
भाजप सिंधुदुर्गच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ येत्या २३ मे २०२६ ते २४ मे २०२६ दरम्यान आयोजित केले आहे. हे प्रशिक्षण अभियान मालवण तालुक्यातील चौके येथे होणार आहे. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे, प्रदेश सरचिटणीस योगेश सागर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत होईल. तर या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार प्रमोद जठार, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची उपस्थिती असेल, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
21 May 2026 04:30 PM (IST)
भिवंडीतील गोवा गाव नाका परिसरात बुधवारी सकाळपासून हायव्होल्टेज ड्रामा सुरू असून एका तरुणाने तब्बल 150 फूट उंच रिलायन्स मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. अनेक तास उलटल्यानंतरही संबंधित तरुण खाली उतरला नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पिंपळगाव परिसरातील या मोबाईल टॉवरवर संबंधित तरुण सकाळी सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास चढला. विशेष म्हणजे त्याच्याकडे भारताचा तिरंगा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तसेच पेट्रोलची बाटली असल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण त्याच्या साखरपुड्याशी संबंधित काही वैयक्तिक मागण्यांसाठी आंदोलन करत असल्याचे सांगितले जात आहे. टॉवरवरून तो मेगाफोन आणि मोबाईल फोनद्वारे खाली उपस्थित नागरिकांशी संवाद साधत होता. यावेळी त्याने काही कागदपत्रे देखील टॉवरवरून खाली फेकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
21 May 2026 04:25 PM (IST)
कर्जत तालुक्यातील कशेळे येथे उपचार घेत असलेल्या रुग्णाला तब्बल तीन तासांनी रुग्णवाहिका उपलब्ध झाली. विषबाधा झालेल्या रुग्णाला रुग्ण वाहिकेसाठी ताटकळत रहावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे. कर्जत तालुक्यातील खांदण गावातील लोकांना विषबाधा झाली.20 मे रोजी सायंकाळी ही घटना घडताच सहा वाजता कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी आणण्यात आले. खांदण येथील पेशंट विषबाधेमुळे ग्रामीण रुग्णालय हॉस्पिटल कशेले येथे उपचारासाठी आणण्यात आले होते. परंतु विषबाधा जास्त प्रमाणात लागल्यामुळे त्या पेशंटला पुढील उपचारासाठी सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे हलवण्यास सांगितले.
21 May 2026 04:20 PM (IST)
आगामी बकरी ईद हा सण शहरात शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा व्हावा, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष शांतता बैठकीत पोलीस प्रशासनाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. "ईदच्या काळात शहरात कुठेही गोवंश किंवा गोहत्या केल्यास संबंधितांवर कायद्यानुसार अत्यंत कडक कारवाई केली जाईल," असा स्पष्ट आणि जाहीर इशारा शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी दिला आहे. सणांचा आनंद घेताना कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, गोवंश हत्येसारख्या बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांची करडी नजर असेल. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी बकरी ईद च्या दिवशी कायद्याचे पालन करावे आणि गोवंश व गोहत्या करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
21 May 2026 04:14 PM (IST)
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले आहे. आरोग्य सभापती निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विविध महापालिका रुग्णालयांचा पाहणी दौरा करण्यात आला.समिती सदस्य, सभापती, उपसभापती आणि वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी विरार चंदनसार येथील जीवरक्षक रुग्णालय, बोळींज रुग्णालय तसेच नालासोपारा येथील तुळींज रुग्णालयाला भेट देत आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. रुग्णांना मिळणारी वागणूक, मोफत औषध पुरवठा, स्वच्छता आणि रुग्णालयां मधील त्रुटी यांची पाहणी करण्यात आली.
21 May 2026 03:59 PM (IST)
भिवंडीतील गोवा गाव नाका परिसरात बुधवारी सकाळपासून हायव्होल्टेज ड्रामा सुरू असून एका तरुणाने तब्बल 150 फूट उंच रिलायन्स मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. अनेक तास उलटल्यानंतरही संबंधित तरुण खाली उतरला नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
पिंपळगाव परिसरातील या मोबाईल टॉवरवर संबंधित तरुण सकाळी सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास चढला. विशेष म्हणजे त्याच्याकडे भारताचा तिरंगा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तसेच पेट्रोलची बाटली असल्याची माहिती समोर आली आहे.
21 May 2026 03:47 PM (IST)
कर्जत तालुक्यातील कशेळे येथे उपचार घेत असलेल्या रुग्णाला तब्बल तीन तासांनी रुग्णवाहिका उपलब्ध झाली. विषबाधा झालेल्या रुग्णाला रुग्ण वाहिकेसाठी ताटकळत रहावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे.
कर्जत तालुक्यातील खांदण गावातील लोकांना विषबाधा झाली.20 मे रोजी सायंकाळी ही घटना घडताच सहा वाजता कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी आणण्यात आले. खांदण येथील पेशंट विषबाधेमुळे ग्रामीण रुग्णालय हॉस्पिटल कशेले येथे उपचारासाठी आणण्यात आले होते. परंतु विषबाधा जास्त प्रमाणात लागल्यामुळे त्या पेशंटला पुढील उपचारासाठी सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे हलवण्यास सांगितले.त्यानंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर 108ची रुग्णवाहिका मिळावी म्हणून संपर्क करण्यात आला. 6: 30 वाजता संपर्क केल्यानंतर रुग्णवाहिका लवकरच पोहचेल असे सांगण्यात आले. त्यानंतर एक तास होऊन देखील ॲम्बुलन्स आले नाही,त्यामुळे नातेवाईकांनी पुन्हा 108 ला कॉल केला असता. ॲम्बुलन्स ड्रायव्हर कॉल वर बोलताना अलिबाग वरून आलो आहे, त्यामुळे तात्काळ येऊ शकणार नाही.मला येण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ॲम्बुलन्स घेऊन येण्यास वेळ लागेल अशी उत्तरे देण्यात आली. किमान आठ ते साडेआठ वाजेपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये पोहोचेल अशी उत्तर देऊन कॉल कट करण्यात आला. त्यामुळे विषबाधा झालेल्या रुग्णाची प्रकृती ढासळली.नातेवाईक यांनी डॉक्टरांना रुग्णवाहिका बद्दल विचारणा करण्यास सुरुवात केली.मात्र काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने रुग्णाची स्थिती बघून सर्वत्र घाबरट निर्माण झाली.
21 May 2026 03:34 PM (IST)
आगामी बकरी ईद हा सण शहरात शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा व्हावा, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष शांतता बैठकीत पोलीस प्रशासनाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. "ईदच्या काळात शहरात कुठेही गोवंश किंवा गोहत्या केल्यास संबंधितांवर कायद्यानुसार अत्यंत कडक कारवाई केली जाईल," असा स्पष्ट आणि जाहीर इशारा शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी दिला आहे.
21 May 2026 03:27 PM (IST)
भाजप सिंधुदुर्गच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ येत्या २३ मे २०२६ ते २४ मे २०२६ दरम्यान आयोजित केले आहे. हे प्रशिक्षण अभियान मालवण तालुक्यातील चौके येथे होणार आहे. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे, प्रदेश सरचिटणीस योगेश सागर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत होईल. तर या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार प्रमोद जठार, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची उपस्थिती असेल, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
21 May 2026 03:13 PM (IST)
चिपळूण तालुक्यातील कळमुंडी गावच्या बौद्धवाडीतील सर्व ग्रामस्थांनी शिवसेना नेते आणि गुहागर मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव आणि जिल्हाप्रमुख श्री. विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.
याआधी आम्ही अन्य पक्षाचे काम करत होतो. परंतु सत्तेत असतानाही आमच्या वाडीचा विकास त्यांच्याकडून होऊ शकला नाही. दुसरीकडे विरोधी पक्षाचे आमदार असतानादेखील तुमच्या माध्यमातून मतदारसंघात सुरू असलेला विकासकामांचा धडाका पाहून आम्ही प्रभावित झालो आणि आमच्या वाडीने एकसंघपणे आपल्या सोबत येण्याचा निर्णय घेतला. यापुढे आपल्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी कायम राहू, असे उद्गार प्रवेशकर्त्यांनी काढले. या सर्वांचे पक्षात स्वागत करताना आमदार श्री. जाधव यांनी आपल्या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द दिला.
21 May 2026 03:06 PM (IST)
भिवंडीतील गोवा गाव नाका परिसरात बुधवारी सकाळपासून हायव्होल्टेज ड्रामा सुरू असून एका तरुणाने तब्बल 150 फूट उंच रिलायन्स मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. अनेक तास उलटल्यानंतरही संबंधित तरुण खाली उतरला नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
पिंपळगाव परिसरातील या मोबाईल टॉवरवर संबंधित तरुण सकाळी सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास चढला. विशेष म्हणजे त्याच्याकडे भारताचा तिरंगा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तसेच पेट्रोलची बाटली असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण त्याच्या साखरपुड्याशी संबंधित काही वैयक्तिक मागण्यांसाठी आंदोलन करत असल्याचे सांगितले जात आहे. टॉवरवरून तो मेगाफोन आणि मोबाईल फोनद्वारे खाली उपस्थित नागरिकांशी संवाद साधत होता. यावेळी त्याने काही कागदपत्रे देखील टॉवरवरून खाली फेकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
21 May 2026 02:59 PM (IST)
अदानी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ४.५ लाख कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीचे मोठे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्यामुळे आता कोकणाचा विकास हे ध्येय ठेवून जरी रोजगार निर्मिती होणार हे मात्र खरं असलं तरीही त्याच्यासोबतच या सुंदर अशा कोकणाला ग्रहणही लागणार आहे का ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे.
21 May 2026 02:49 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना ‘Melody’ टॉफी भेट म्हणून दिली खरी त्यामुळे मेलोडीचं मार्केट हालून गेलं. देशातील अनेक ऑनलाइन ‘क्विक-कॉमर्स’ प्लॅटफॉर्मवर या टॉफीचा स्टॉक अवघ्या काही क्षणातच संपला. या घटनेचा आणखी एक महत्त्वपूर्ण परिणाम ‘Parle Industries’ च्या शेअर्सवर दिसून आला. त्यामुळे सोशल मीडियावर जशी खळबळ उडाली तशीच खळबळ शेअर मार्केटमध्येही दिसली. पण फायदा कोणा दुसऱ्याचाच झाला. गुरुवारी या कंपनीच्या शेअर्सने ‘अप्पर सर्किट’ची पातळी गाठली. बाजार उघडताच, ‘Parle’ च्या शेअरमध्ये ५ टक्क्यांची मोठी वाढ झाली. सलग दुसऱ्या दिवशी या कंपनीच्या शेअर्सने ‘अप्पर सर्किट’ गाठण्याची ही दुसरी वेळ ठरली.
21 May 2026 02:40 PM (IST)
गेले अनेक वर्ष कोल्हापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष पद घरातच असणाऱ्या माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांना काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. त्या जागी नवीन शहराध्यक्ष म्हणून नगरसेवक प्रवीण केसरकर यांना जबाबदारी देण्यात आली
21 May 2026 02:29 PM (IST)
खासदार श्रीकांत शिंदें यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वंदे भारत ट्रेनने ठाणे ते नाशिक असा प्रवास केला. आज त्यांच्या नाशिक दौऱ्यात चांदवड, मनमाड, येवला, नांदगाव आणि मालेगाव मतदारसंघांमध्ये आढावा बैठका पार पडणार आहेत. आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आणि निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.
21 May 2026 02:19 PM (IST)
नाशिकच्या कांद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं चित्र छापल्याची माहिती समोर आली आहे. या अनोख्या प्रयोगामुळे शेतकरी आणि बाजारपेठेत चर्चाना उधाण आलं असून सोशल मीडियावरही हा विषय व्हायरल झाला आहे.
21 May 2026 02:10 PM (IST)
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाची घडामोड झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मनसे कार्यकर्त्यांकडूनही या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे.
21 May 2026 02:00 PM (IST)
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी II (NDA), नौदल प्रबोधनी II (NA) आणि एकत्रित संरक्षण सेवा II (CDS) २०२६ परीक्षेची अधिकृत सूचना जाहीर केली आहे. या परीक्षेच्या अधिकृत वेळापत्रानुसार, १३ सप्टेंबर रोजी परीक्षा घेतल्या जातील. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय तरूणांना विविध क्षेत्रात अधिकारी होण्याची संधी मिळते. या परीक्षेला अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख ९ जून २०२६ आहे, तसेच १३ सप्टेंबर २०२६ रोजी परीक्षा असेल.
21 May 2026 01:55 PM (IST)
भारताच्या पंतप्रधानांनी जरी जनतेला सोनं चांदी खरेदी न करण्याचं आवाहन केलं असलं तरीही त्यात किती उतार चढाव झाला आहे. यावर तर लक्ष ठेवल्याशिवाय काही भारतीयांचा दिवस जायचा नाही. आज नेमकी दरात काय परिस्थिती होती? समजून घेऊयात.आजचे सोने आणि चांदीचे दर ऐकून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नक्कीच थोडंसं हास्य उमटेल. आज केवळ चांदीच अधिक परवडणारी झाली नाही, तर लखलखत्या सोन्याच्या किमतीतही घट झाली आहे. २१ मे रोजी सकाळी, सोन्याच्या दरात ५०० रुपयांहून अधिकची घसरण झाली, तर चांदी २,३०० रुपयांनी स्वस्त झाली. MCX वर, ५ जूनच्या डिलिव्हरीसाठीचे सोन्याचे कंत्राट मागील सत्रात प्रति १० ग्रॅम १,६०,००६ रुपयांवर बंद झाले होते; तर आज ते १,५९,९०० रुपयांवर उघडले.
21 May 2026 01:50 PM (IST)
यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये मराठीचा डंका देखील पाहायला मिळाला. मराठमोळा साज श्रृंगार कान्सच्या जागतिक रेड कार्पेटवर गाजलं देखील. यामध्ये होती ती महाराष्ट्राची लाडकी जोडी निवेदिता सराफ आणि अशोक सराफ. रेड कार्पेटवरच्या यांच्या पारंपरिक लुकला चाहत्यांना पसंती देखील दिली. नुकतंच या सगळ्याबाबत निवेदिता सराफ यांनी एका पॉडकास्टमध्ये एक किस्सा सांगितला आहे.
21 May 2026 01:45 PM (IST)
मेटा (Meta) कंपनीमध्ये नुकत्याच झालेल्या मोठ्या प्रमाणावरील कर्मचारी कपातींनंतर मेटा कंपनीचे प्रमुख मार्क जुगरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, जुकरबर्ग यांनी कंपनीच्या अंतर्गत मेमो (Internal Memo) मध्ये स्पष्ट केले आहे की, या वर्षात आता कंपनी पातळीवर आणखी मोठ्या कपातीची शक्यता नाही.
21 May 2026 01:35 PM (IST)
इराणसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन घनिष्ठ मित्रांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यात इराणवरील हल्ल्यावरुन मतभेद निर्माण झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये नुकत्या झालेल्या फोनवरील संभाषणात तीव्र वाद झाला आहे. इराणवर लष्करी कारवाई करण्याऐवजी वाद कूटनीतिकतेने सोडवावा असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. मात्र, नेतन्याहू लष्करी कारवाईवर ठाम असून राजकीय तणाव प्रचंड वाढला आहे.
21 May 2026 01:25 PM (IST)
मुरखाला गावाजवळ आज सकाळी (21 मे 2026) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) गडचिरोलीहून उमरखेडला जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. चंद्रपूर मार्गावरील नवेगाव मुरखळाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस लोखंडी कठडा तोडून रस्त्याच्या खाली कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत. यात एका चिमुकल्याचा समावेश असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
21 May 2026 01:20 PM (IST)
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता एक नवे आणि खळबळजनक वळण मिळाले आहे. जरांगे यांचे जुने सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ते अजय महाराज बारस्कर यांनी आंदोलनाच्या आडून काही जणांनी कोट्यवधी रुपयांचा आर्थिक लाभ घेतल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. आंदोलनातून एक विशिष्ट ‘लाभार्थी टोळी’ तयार झाली असल्याचा दावा करत बारस्कर यांनी या प्रकरणाची थेट सक्तवसुली संचलनालय (ED) आणि आयकर विभागाकडे (Income Tax) तक्रार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत अजय महाराज बारस्कर यांनी जमीन व्यवहार, अवैध वाळू उपसा आणि कथित बेहिशेबी संपत्तीबाबत आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचा दावा केला. तसेच या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
21 May 2026 01:15 PM (IST)
दुबईस्थित मराठमोळा संगीतकार आणि सांस्कृतिक उद्योजक सागर पाटील जो BeatXX नावाने ओळखला जातो. त्याने नुकतंच एक गाणं सध्या प्रदर्शित केलं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” दुबईत प्रदर्शित केले आहे. भारतीय संस्कृती, आणि संगीताचा उत्साहपूर्ण संगम असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. ‘द मॅंगो अँथम’ हे केवळ एक मनोरंजनात्मक गाणे नसून भारतीय संस्कृतीशी असलेली भावनिक नाळ आहे. विशेषतः मराठी संस्कृतीचा अभिमान आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या ओळखीचे प्रतीक म्हणूनही पाहिले जात आहे. आकर्षक संगीत, लक्षवेधी व्हिज्युअल्स आणि सहज गुणगुणता येईल अशी रचना यामुळे हे गाणे तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे.
21 May 2026 01:08 PM (IST)
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) अवघ्या 5-6 दिवसांत डिजिटल विश्वात मोठा प्रभाव निर्माण केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके या तरुणाने सुरू केलेल्या या मोहिमेने व्यवस्थेविरोधातील जनभावना व्यक्त करण्यासाठी नवा मंच उभा केल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, इन्स्टाग्रामवर अवघ्या सहा दिवसांत १० दशलक्ष (१० मिलियन) फॉलोअर्सचा टप्पा पार केल्याने या पेजची देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
21 May 2026 01:02 PM (IST)
घरकुलाचा हप्ता मंजूर करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भोर तालुक्यातील शिंद आणि गवडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. महादेव नामदेव सालगुडे (वय ५३, रा. बारामती) असे कारवाई करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
21 May 2026 12:48 PM (IST)
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर आज पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर स्कोडा कारचा गंभीर अपघात झाला असून या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्कोडा कार थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की डिव्हायडरचा लोखंडी पत्रा थेट कारमध्ये घुसला. या भीषण अपघातात गाडीत असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच आयआरबी यंत्रणा, पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त कारचे दरवाजे आणि गाडीमध्ये घुसलेला लोखंडी पत्रा कापून जखमी व मृतांना बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
21 May 2026 12:36 PM (IST)
पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या रावेत येथील फर्निचर व्यावसायिक गोळीबार प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. तब्बल २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी कुख्यात बिश्नोई गँगच्या नावाने हा थरारक गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी थेट उत्तराखंडमध्ये धडक कारवाई करत, बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या तीन सराईत गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली होती.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या पथकाने उत्तराखंडमध्ये अत्यंत धाडसी आणि गुप्त मोहीम राबवून ही कारवाई केली. प्रवीण राम निवासे (वय २३, रा. हरियाणा ), पंकज कुलदीप रहाठी (वय २१, रा. हरियाणा), सागर अजय पाल (वय २१, रा. हरियाणा) या तिघांना अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी कुख्यात अराजू बिश्नोई याच्या थेट संपर्कात होते. अटक करण्यात आलेल्या या तिघांना बुधवारी रात्री उशिरा पुण्यात आणण्यात येणार आहे.
21 May 2026 12:24 PM (IST)
पुणेकरांच्या सेवेसाठी आणि शहरातील वाहतूक अधिक वेगवान व पर्यावरणपूरक करण्यासाठी स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या भूमिगत मेट्रोचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे.या कामाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, मार्केट यार्ड आणि बिबवेवाडी येथील प्रस्तावित मेट्रो स्टेशन परिसरातील वाहतूक नियोजनबद्ध पद्धतीने नवीन मार्गावर वळवण्यात आले आहे.पुणे मेट्रो आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) यांनी संयुक्त समन्वय साधून प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षिततेसाठी तसेच मेट्रोच्या कामाला गती देण्यासाठी वाहतुकीचे हे नवे नियोजन केले आहे.
21 May 2026 12:12 PM (IST)
जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात बिबट्याचा हैदोस सुरूच असून, गुरुवारी सकाळी वाघचौरे वस्ती परिसरात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींवर बिबट्याने अचानक जीवघेणा हल्ला केला. मात्र, १३ वर्षांच्या कल्याणीने दाखवलेले अजोड धैर्य आणि प्रसंगावधान यामुळे तिची १० वर्षांची लहान बहीण काव्या बिबट्याच्या जबड्यातून सुखरूप बचावली. या हल्ल्यात काव्या गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे ओतूर परिसरात प्रचंड घबराट पसरली असून, वनविभागाच्या कारभारावर आणि स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या दुरवस्थेवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
21 May 2026 11:49 AM (IST)
नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काॅकरोच पार्टीचे अभिजीत दीपके यांनी केली आहे. साम टिव्हीशी संवाद साधताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणऱ्या शिक्षणमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे.
21 May 2026 11:36 AM (IST)
नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनायक उर्फ नैय्या खैरे यांच्या विरोधात मसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भुखंड हडपण्यासाठी भूखंड मालकाला धमकी देत 90 लाखांची खंडणी मागण्याचा आरोप त्यांच्या विरोधात आहे.
21 May 2026 11:26 AM (IST)
खासदार श्रीकांत शिंदें यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वंदे भारत ट्रेनने ठाणे ते नाशिक असा प्रवास केला. आज त्यांच्या नाशिक दौऱ्यात चांदवड, मनमाड, येवला, नांदगाव आणि मालेगाव मतदारसंघांमध्ये आढावा बैठका पार पडणार आहेत. आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आणि निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.
21 May 2026 10:40 AM (IST)
जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन ग्विर यांनी सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये गाझाला मदत पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांना इस्रायलने ताब्यात घेतले असून त्यांच्यासोबत गैरवर्तन केले जात आहे. त्यांची थट्टा उडवली जात आहे. या दृश्याने सर्वत्र खळबळ उडाली असून इटलीटच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
21 May 2026 10:30 AM (IST)
कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून पळून नेलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं. यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केल्या असून या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे. घडलेली घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
21 May 2026 10:20 AM (IST)
नीट (NEET) पेपर लीक प्रकरणाच्या तपासात सातत्य नवनवीन पैलू समोर येत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवराज मोटेगावकर आणि त्यांच्याशी संबंधित नेटवर्क अत्यंत पद्धतशीरपणे काम करत असल्याचा आरोप तपास यंत्रणेचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालकांना त्यांच्या मुलांना निवडीबाबत पूर्ण खात्री दिली जात होती. याबदल्यात लाखो रूपयांचे पालकांशी व्यवहार ठरत होते. अनेक पालक त्यांना ‘ब्लँक चेक’ देण्यासही तयार होते, असा दावा तपासशी सुत्रांनी केला आहे. तसेच सुरवातीला टोकन रक्कम घेतली जात असून परीक्षा संपल्यावर प्रश्नांचे क्रॉस चेक करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रक्कम दिली जात असे
21 May 2026 10:10 AM (IST)
मध्य पूर्वेतील (Middle East) राजकीय आणि लष्करी परिस्थिती सध्या अत्यंत स्फोटक बनली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य महायुद्ध रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पडद्यामागे वेगाने हालचाली सुरू असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक अत्यंत खळबळजनक आणि महत्त्वपूर्ण विधान केले आहे. वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील शांतता वाटाघाटी आता एका अतिशय ‘गंभीर आणि निर्णायक टप्प्यावर’ पोहोचल्या असून इराणने योग्य पाऊल उचलले नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. एअर फोर्स वन या राष्ट्राध्यक्षांच्या विमानाने प्रवास केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अमेरिकेची पुढील रणनीती उघड केली.
21 May 2026 09:58 AM (IST)
ठाणे जिल्ह्यातील नौपाड्यातीलतील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटला अचानक आग लागल्याने शहरात आगीचा भीषण तांडव पाहायला मिळाला. आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली आणि यात दोन जणांना मृत्यू झाल्याचीही बातमी समोर येत आहे. माहितीनुसार, पहाटे ३:३० च्या सुमारास आग लागली, ज्यात मार्केटमधील मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला. या आगीमुळे आर्थिक नुकसान तर झालेच शिवाय बचावासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकाचा आणि अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यूही झाला. काळू गाडेकर असे सुरक्षा रक्षकाचे नाव होते तर सागर शिंदे असे अग्निशमन जवानाचे नाव होते. आगीची भीषणता फार होती ज्यामुळे यातून तीव्र धूर बाहेर पडला. या धूरामुळेच गुदमरुन दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
21 May 2026 09:40 AM (IST)
WTC Rankings: बांगलादेशने पाकिस्तानला कसोटी मालिकेत २-० असा ऐतिहासिक 'व्हाइट वॉश' दिल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले असून याचा थेट धक्का टीम इंडियाला बसला आहे. या विजयासह बांगलादेशने थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली असून, भारतीय संघाची घसरण आता सहाव्या स्थानावर झाली आहे.
मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी ४३७ धावांचे मोठे आव्हान मिळाले होते, मात्र बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ ३५८ धावांवर बाद झाला आणि बांगलादेशने हा सामना ७८ धावांनी जिंकला. यापूर्वी मीरपूर येथे झालेली पहिली कसोटी बांगलादेशने १०४ धावांनी जिंकली होती. या दारूण पराभवामुळे पाकिस्तान संघ डब्ल्यूटीसी रँकिंगमध्ये आठव्या स्थानावर फेकला गेला आहे, तर भारताला मागे टाकत बांगलादेशने पाचवे स्थान काबीज केले आहे.
21 May 2026 09:35 AM (IST)
NEET Exam : देशभरात गाजत असलेल्या 'नीट' पेपरफुटी (NEET Exam Paper Leak) प्रकरणाचे धागेदोरे आता थेट पुण्यातील नामांकित 'मॉडर्न कॉलेज'पर्यंत पोहोचले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात जाऊन अतिशय गोपनीय आणि सखोल तपासणी केली. या महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या मनीषा मांढरे (Manisha Mandhare) यांच्या कपाट, लॉकर आणि डेस्कची सीबीआय अधिकाऱ्यांनी कसून झाडाझडती घेतली, तसेच त्यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रेही तपासली.
या कारवाई दरम्यान सीबीआयने मॉडर्न महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी केली असून, मनीषा मांढरे यांचे कॉलेजमधील नियुक्तीपत्र आणि त्यांची 'राष्ट्रीय परीक्षा एजन्सी' (NTA) मध्ये झालेली नियुक्ती या संदर्भातील सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी केली.
21 May 2026 09:30 AM (IST)
Pune Water Crisis: पुणे जिल्ह्यात वाढलेल्या तीव्र उष्णतेचा आणि उन्हाळ्याच्या तीव्रतेचा थेट परिणाम आता जलसाठ्यावर दिसू लागला असून, शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. उन्हाळी आवर्तनामुळे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर झाला असून, एकीकडे पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे धरणसाठा कमी होत असल्याने आगामी काळात पुण्यावर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या बिघडत्या परिस्थितीमुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली असली, तरी प्रशासनाने ३१ मे पर्यंत शहरात कोणतीही पाणीकपात केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांना तूर्तास दिलासा दिला आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता पुढील काळात पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले जात आहे.






