Paryushan Parva 2026: ऐकूनच आश्चर्य वाटेल! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
केशलोचन म्हणजे केस उपटणे. जेव्हा एखादी व्यक्ती संसार सोडून जैन मुनी किंवा साध्वी बनते, तेव्हा त्याला दीक्षा दिली जाते. त्याचवेळी हा विधी केला जातो. मुनी आपल्या हातांनी डोक्यावरचे आणि चेहऱ्यावरचे केस मुळापासून उपटतात.हा फक्त केस काढण्याचा प्रकार नसून खूप मोठा विचार आहे. केस म्हणजे सुंदर दिसण्याचं साधन. केसांमुळे माणूस सुंदर दिसतो. ते काढून टाकणं म्हणजे आपण आता शरीराच्या सौंदर्याला, ऐहिक सुखाला सोडून दिलं आहे.
तुम्हाला प्रश्न पडेल की,हाताने उपटण्यापेक्षा कात्रीने किंवा ब्लेडने केस कापले तर वेदना होणार नाहीत. पण जैन धर्मात असं केलं जात नाही.याची दोन कारणं आहेत.
जेव्हा एखादा माणूस साधू बनतो, तेव्हा तो शपथ घेतो की मी आता संसाराशी संबंध तोडत आहे. माझं जुनं आयुष्य संपलं. केशलोचन करून तो हेच दाखवतो. मी माझ्या रूपाचा, शरीराचा मोह सोडला आहे. आता बाहेरच्या सुंदरतेपेक्षा आतल्या आत्म्याची शुद्धता माझ्यासाठी महत्त्वाची आहे.हा विधी कसा केला जातो?हा विधी एका धार्मिक वातावरणात केला जातो. मुनी एका जागी बसतात. आजूबाजूला मंत्र म्हटले जातात. मग ते स्वतःच्या हाताने हळूहळू केस उपटतात. कधी कधी मोठे गुरु पण त्यांना मदत करतात.
सगळा विधी झाल्यावर ते पुढच्या साधनेला लागतात.किती वेळा करतात?हा विधी एकदाच नाही केला जात. जैन परंपरेनुसार मुनी वर्षातून एक किंवा दोन वेळा केशलोचन करतात. बघायला गेलं तर हे खूप कठीण वाटतं, पण त्यांच्यासाठी हा त्यांच्या साधनेचा, त्यागाचा एक भाग आहे.म्हणूनच पर्युषण पर्वात या विधीला खूप महत्त्व आहे. हे आपल्याला शिकवतं की खरं सुख बाहेरच्या गोष्टीत नाही तर त्यागात आणि संयमात आहे.






