Maharashtra Breaking News Updates Today:
मुंबई: जुलैच्या सुरुवातीलाच राज्यात मान्सूनने जोरदार पुनरागमन केले आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशसह राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रापासून उत्तर केरळच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेला एक तीव्र कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) सक्रिय झाला आहे. याच्या प्रभावामुळे, ६ जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
03 Jul 2026 05:50 PM (IST)
सुरक्षित भविष्यासाठी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करणे फार महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपत्तीजन्य परिस्थिती समोर येईल तेव्हा पैशांची गरज भासल्यास कोणाकडे पैसे मागायची गरज पडणार नाही. जर तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशांची गुंतवणूक करण्यासाठी एखादी चांगली योजना शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजना खूप उपयुक्त ठरू शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या योजनेत गुंतवणूक करतात. नेमकी काय आहे योजना आणि किती मिळतो रिटर्न?
03 Jul 2026 05:40 PM (IST)
11th Sudents Admissions Updates: अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिये अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विशेष फेरी क्रमांक १ ची गुणवत्ता यादी शुक्रवारी दि. ३ सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आली. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे यांनी ही यादी प्रसिद्ध केली असून, विद्यार्थ्यांनी (Career) आपल्या लॉगिनमधील कॅप वाटप स्थिती या पर्यायावर जाऊन कोणते कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे, याची खात्री करून प्रवेशाची पुढील कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
03 Jul 2026 05:20 PM (IST)
पावसाळा सुरू झाला की अनेकजण सनस्क्रीन वापरणे बंद करतात. काहींना वाटते की, ढगाळ वातावरण आणि उन्हाचा तडाखा नसल्याने पाहून त्वचेला सूर्यकिरणांचा धोका नाही. मात्र, त्वचारोग तज्ज्ञांच्या मते हा गैरसमज आहे. पावसाळ्यातही अतिनील (UV) किरणे ढगांमधून त्वचेपर्यंत पोहोचतात आणि दीर्घकाळात त्वचेचे नुकसान करू शकतात. त्यामुळे वर्षभर सनस्क्रीनचा वापर करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
03 Jul 2026 05:10 PM (IST)
शाळकरी मुलांची सुरक्षा हा प्रत्येक पालकासाठी आणि शाळा प्रशासनासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांच्या गर्दीत ‘पिवळ्या रंगाची स्कूल बस’ दुरूनही आपले लक्ष वेधून घेते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की स्कूल बसचा रंग पिवळाच का असतो? आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी तिच्या रचनेत काय काळजी घेतली जाते? चला, यामागील रंजक आणि शास्त्रीय कारणे जाणून घेऊया.
03 Jul 2026 04:45 PM (IST)
मराठी म्युझिक अल्बम क्षेत्रात वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित गाणी सादर करणाऱ्या केपी फिल्म्स आणि ८ स्टुडिओकडून आता आणखी एक भन्नाट डान्सिकल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बेबी लेट्स डान्स’ या नव्या म्युझिक अल्बमची घोषणा करण्यात आली असून, आधुनिक संगीत, आकर्षक नृत्यरचना आणि स्टायलिश सादरीकरणाचा सुरेख मिलाफ या गाण्यात पाहायला मिळणार आहे. याआधी ‘मौसम इश्काचा’, ‘बहिण लाडकी’, ‘साजनी’, ‘तुला पाहून मी’, ‘राधा बासरी’ आणि ‘मराठी रॅपर’ यांसारख्या गाण्यांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर ही टीम पुन्हा एकदा नव्या संकल्पनेसह सज्ज झाली आहे.
03 Jul 2026 03:50 PM (IST)
Dhruv Rathee Controversy: युट्युबर ध्रुव राठी (Dhruv Rathee) यांच्या एका वादग्रस्त युट्यूब व्हिडिओबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. न्यायालयाने केंद्र सरकारच्या ‘ग्रीव्हन्स अपिलेट कमिटी’ला (GAC) या व्हिडिओच्या हटवण्याबाबतच्या अपिलावर १५ दिवसांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की, त्यांच्या आदेशाचे पालन न केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल. हे प्रकरण एका अशा व्हिडिओशी संबंधित आहे ज्यामध्ये ध्रुव राठी यांनी कथितरीत्या असे म्हटले होते की, भगवान राम, माता सीता आणि भगवान कृष्ण मांस आणि मद्य सेवन करत असत. हा व्हिडिओ हटवण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. वाचा सविस्तर
03 Jul 2026 03:45 PM (IST)
Pink E-Rickshaw Scheme : राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी (पिंक) ई-रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, चालू आर्थिक वर्षात किमान ५ हजार महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणेबाबतचा प्रश्न विधानपरिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला. या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी, परिणय फुके यांनी सहभाग घेतला. या प्रश्नांना उत्तर देताना त्या बोलत होत्या. वाचा सविस्तर
03 Jul 2026 03:40 PM (IST)
Remove BAT BMS App : सध्या सोशल मीडियावर बंद रिक्षा धक्का मारत घेऊन जातानाचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. पडताळणी केल्यानंतर कळलं की या ई- रिक्षा आहेत ज्या अचानक रस्त्यात बंद पडताहेत. याचं कारण आहे BAT BMS ॲप. रस्त्यावर धावणाऱ्या ई-रिक्षा दूरस्थपणे बंद करणाऱ्या ‘बॅट बीएमएस’ (BAT BMS) या ॲपला गूगल प्ले आणि ॲपल ॲप स्टोअरवरून काढून टाकण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले असल्याचं समोर येत आहेत ही माहिती शुक्रवारी सुत्रांकडून समोर आली आहे. वाचा सविस्तर
03 Jul 2026 03:35 PM (IST)
नाशिक : एसटी महामंडळाने स्थापन केलेल्या नियोजन समितीच्या तपासणीत कामकाजात हलगर्जीपणा आणि त्रुटी आढळल्या. त्यामुळे, एसटीच्या विभागीय कार्यालयातील तब्बल अकरा अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये दर्जा एकचे ३, तर दर्जा दोनच्या आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे एसटीच्या वर्तुळात खळबळ उडाली. वाचा सविस्तर
03 Jul 2026 03:30 PM (IST)
परदेशात शिक्षण घेणाऱ्या पाहुण्यांना भारतीय मनोरंजनसृष्टीसाठी विशेष आकर्षण आहे, याची ग्वाही नेहमीच मिळत असते. अनेक परदेशी पाहुण्यांनी भारतीय सिनेमात स्वतःची ओळख तयार केली आहे. त्यातील एक नाव म्हणजे Soundous Moufakir! या फॅशन-मॉडेल आयकॉनने नुकताच एक नवा व्यवसाय सुरु केला आहे. मूळची Morocco या देशाची असलेली सुंदुस, धर्माने इस्लाम आहे. दरम्यान, तिने नवा स्किन केअर प्रोडक्टसचा व्यवसाय सुरु केल्यामुळे तिची चर्चा तर होतीच. पण तिने या नव्या व्यवसायानिमित्त घरी आयोजित केलेल्या पूजेमुळे या चर्चेला मोठा वेग मिळाला आहे. वाचा सविस्तर
03 Jul 2026 03:25 PM (IST)
नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर नवीन सेलची घोषणा करण्यात आली आहे. 4 जुलैपासून फ्लिपकार्टवर GOAT सेल 2026 आणि ॲमेझॉनवर प्राईम डे सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टच्या ब्लॅक आणि प्लस मेंबर्सना 24 तास आधीच सेलमध्ये प्रवेश मिळणार आहे. जर तुम्ही दिर्घकाळापासून नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरील सेलमधील ऑफर्स तुमच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात. वाचा सविस्तर
03 Jul 2026 03:20 PM (IST)
Sanjay Raut News: देशाला कलंकित करणाऱ्या घटना अयोध्येत घडत आहेत. प्रभू श्रीरामाच्या नावाने देशाची अस्मिता उंचावली गेली, पण आज अयोध्येत अंडरवर्ल्डसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाने अयोध्येत गुंड आणि दरोडेखोरांचं राज्य निर्माण केलं आहे. राम मंदिराच्या दानपेटीतून तब्बल साडेपाचशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं असून त्यामध्ये भाजपशी संबंधित लोकांची नावं आहेत.” अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. वाचा सविस्तर
03 Jul 2026 03:15 PM (IST)
Vande Bharat Sleeper Train : देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन (मुंबई-बंगळूरू वंदे भारत स्लीपर ट्रेन) बंगळूरू रेल्वे स्टेशनवर दाखल झाली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि केएसआर बंगळूरू रेल्वे स्टेशन दरम्यान धावणारी ही ट्रेन भारतातील सर्वात वेगवान रात्रभर धावणारी ट्रेन असेल. वंदे भारत स्लीपर ट्रेनची आता बंगळूरू स्टेशनवर अंतिम चाचणी घेतली जाईल, त्यानंतर ही सेवा प्रवाशांसाठी सुरू केली जाईल. वाचा सविस्तर
03 Jul 2026 03:10 PM (IST)
देशभरातून फोडाफोडीच्या राजकारणाच्या बातम्या येत असतानाच आता तामिळनाडूतूनही सत्ताधारी आमदारांना फोडण्यासाठी कथित घोडेबाजार सुरु झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांच्या टीव्हीके पक्षातील एका आमदाराला फोडण्यासाठी 35 कोटींची ऑफर आली असल्याचे आरोप करण्यात आले आहे. वाचा सविस्तर
03 Jul 2026 03:05 PM (IST)
Pakistan Bus Accident News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात प्रवासी बस दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत किमान ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर
03 Jul 2026 02:59 PM (IST)
नवी मुंबईतील शाळांना आज सुट्टी देण्यात आली. अतिवृष्टीच्या इशा-यामुळे शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांच्या सुरक्षेसाठी मनपाचा निर्णय घेतला आहे.
03 Jul 2026 02:50 PM (IST)
झाड कोसळून आणखी एकाचा बळी गेलाय. मिरा-भाईंदरमध्ये ही दुर्देवी घटना घडली आहे. धावत्या दुचाकीवर भलमोठं नारळाचे झाडं कोसळलं. यात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय. राई गावात धावत्या दुचाकीवर नारळाचे झाड कोसळल्यानं हा अपघात झाला. दोन दिवसापूर्वीच मुंबईतील चेंबूरमध्ये झाड कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना पुन्हा झाड कोसळून एकाचा बळी गेलाय. या घटनेवरून अपघाताचं सत्र सुरूच असल्याचं दिसून येतंय.
03 Jul 2026 02:42 PM (IST)
साता-यातील पाचगणी मार्गावरील पसरणी घाटामध्ये दरड कोसळलीये. त्यामुळे एकेरी वाहतूक सध्या सुरु आहे,या घटनेमुळे मार्गावर वाहतूक धोकादायक झाली असून वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने प्रवास करावा. प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम सुरू असून नागरिकांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
03 Jul 2026 02:30 PM (IST)
शाळा परिसरात एनर्जी ड्रिंक विक्रीला बंदी घातली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत ही महत्त्वाची माहिती दिली. त्यामुळे यापुढे शाळेच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक विकता येणार नाही.
03 Jul 2026 02:21 PM (IST)
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील दक्खन ते कळकदारा इथं महामार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार सुरू असून आज सकाळी दरड कोसळली. सद्य स्थितीत दक्खन ते कळकदारा हा एकेरी मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. मात्र ही भली मोठी दरड सध्या वाहतूक सुरू असलेल्या महामार्गाच्या अत्यंत जवळ आली आहे. चार पदरीच्या मधोमध लोखंडी कंपाउंड असल्यामुळे दरड वाहतुकीच्या मार्गावर आली नाही. मात्र काही दगडीचे तुकडे आले असून वाहतुकीला धोका निर्माण होऊ शकतो. पाऊसाचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहन धारकांनी वाहने सावधतेने चालवावीत असे आवाहन करण्यात येत आहे.
03 Jul 2026 02:09 PM (IST)
आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आली असताना पवित्र इंद्रायणी नदीचे पात्र केमिकलयुक्त पाण्यामुळे फेसाळली आहे. वारीत लाखो वारकरी इंद्रायणीत स्नान करून माऊलींच्या दर्शनाला जात असल्याने या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त होत आहे. केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे नदीचे पाणी दूषित झाल्याचा आरोप होत असून, वारीच्या पार्श्वभूमीवर ही बाब गंभीर मानली जात आहे. दरवर्षी लाखो वारकरी इंद्रायणीत स्नान करून या पाण्याचा तीर्थ म्हणून स्वीकार करतात. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक आणि वारकरी करत आहेत.
03 Jul 2026 02:00 PM (IST)
Iran warning to US Hormuz strait 2026 : पश्चिम आशियातील राजकीय आणि लष्करी वातावरण पुन्हा एकदा कमालीचे तापले असून, संपूर्ण जगावर इंधनाच्या भीषण टंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. इराणच्या मुख्य लष्करी कमांड, ‘खतम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयाने’ (Khatam al-Anbiya Central Headquarters) एक अत्यंत कडक आणि आक्रमक निवेदन जारी करून अमेरिकेला थेट अंतिम इशारा दिला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये (Strait of Hormuz) अमेरिकेकडून किंवा तिच्या मित्र राष्ट्रांकडून होणारा कोणताही लष्करी हस्तक्षेप इराण सहन करणार नाही. जर अशी कोणतीही कृती झाली, तर इराणी लष्कर त्याला “जलद आणि निर्णायक” (Rapid and Decisive) प्रत्युत्तर देईल, अशी घोषणा इराणने केली आहे. या इशाऱ्यामुळे आखाती देशांमध्ये संकटाचे सावट अधिकच गडद झाले आहे.
03 Jul 2026 01:55 PM (IST)
Nothing RCB Edition Smartphone: आरसीबी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टेक कंपनी नथिंग लवकरच एक खास आरसीबी एडीशन स्मार्टफोन लाँच करणार आहे. याचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. नथिंगने रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुसह केलेल्या भागिदारीला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि टीमच्या ऐतिहासिक विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी एक अत्यंत खास आणि लिमिटेड एडिशन स्मार्टफोन ‘Nothing Phone (4b) RCB Edition’ लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला आरसीबीचा लोगो पाहयला मिळणार आहे. नव्या स्मार्टफोनची डिझाईन आणि रंग अतिशय आकर्षक असणार आहे. कंपनीचा हा लिमिटेड एडीशन स्मार्टफोन नवीन ‘b’ सीरीजअंतर्गत लाँच केला जाणार आहे.
03 Jul 2026 01:45 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी चौक परिसरात गुरुवारी पहाटे ४७ वर्षीय स्क्रॅप व्यावसायिकाचा धारदार शस्त्राने मांडीवर वार करून खून केला आहे. गंभीर जखमी अवस्थेत मदतीसाठी धावत आलेल्या व्यावसायिकाला पोलिसांनी घाटीत दाखल केले; मात्र अतिरक्तस्त्रावामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, हल्ल्यामागील नेमके कारण क्षुल्लक वाद होते की लुटीचा प्रयत्न, याचा जिन्सी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.
03 Jul 2026 01:35 PM (IST)
Venezuela Earthquake News in Marathi : काराकस : व्हेनेझुएलात २४ जून रोजी झालेल्या दोन सर्वात शक्तिशाली भूकंपांनी हजारो लोकांचे प्राण घेतले. मिळालेल्या आकडेवारीनुसार, २,२०० हून अधिक लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. हजारो घरे जमीनदोस्त झाल्या असून मोठ्या प्रमाणात विध्वंस घडला आहे. या भीषण घटनेनंतर तब्बल आठ दिवसांनी एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आहे. तसेच एका श्वानालाही पाच दिवसांनी सुरुखप वाचवण्यात आले आहे. यामुळे लोकांना एक आशेचा किरण मिळाला आहे.
03 Jul 2026 01:30 PM (IST)
Reduced fuel surcharge: जागतिक स्तरावरील उलथापालथनंतर आता आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत सतत मोठी घसरण होत आहे. या परिस्थितीनंतर आता एअर इंडियाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एअरलाइनने उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि युनायटेड किंगडमसाठीच्या विमानसेवांवरील इंधन अधिभार कमी केला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. कंपनीने ७ एप्रिल रोजी इंधन अधिभार लागू केला, जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचला होता. त्यावेळी, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नाकेबंदीमुळे कच्च्या तेलाच्या जागतिक पुरवठ्यावर परिणाम झाला होता. परिणामी, वाढलेल्या इंधन खर्चामुळे आणि हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे एअरलाइनचा परिचालन खर्च लक्षणीयरीत्या वाढला. त्यामुळे, एअर इंडिया ग्रुपने आपल्या बहुतेक आंतरराष्ट्रीय मार्गांवर US$24 ते US$280 पर्यंत इंधन अधिभार जाहीर केला. परिणामी, देशांतर्गत प्रवाशांकडून मार्गावर अवलंबून US$299 ते US$899 पर्यंत अतिरिक्त शुल्क आकारण्यात आले.
03 Jul 2026 01:25 PM (IST)
Kalyan News Marathi : कल्याणमध्ये एका महिलेने दोन सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात मारहाण आणि गैरवर्तनाचे गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. दरम्यान, संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हे प्रकरण बदनामी करण्यासाठी रचलेला कट असल्याचा दावा केला आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, एका महिलेच्या माध्यमातून तिला एका घरात बोलावण्यात आले. तेथे सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव आणि संकेश शिंदे उपस्थित होते. त्याठिकाणी तिचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा खोटा आरोप करण्यात आला. त्यानंतर तिच्याशी मारहाण करण्यात आली तसेच गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीच्या आधारे खडकपाडा पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळावरील परिस्थिती, संबंधित व्यक्तींचे जबाब तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
03 Jul 2026 01:20 PM (IST)
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने ३ जुलै रोजी सीए फाउंडेशन मे २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेले सर्व उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर वापरून icai.org या अधिकृत वेबसाइटवर निकाल तपासू शकतात. ICAI ने गुणवत्ता यादी जाहीर करण्याबरोबरच सकाळी ११ वाजता निकाल पाहण्याची लिंक देखील सक्रिय करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करून त्यांचे गुण तपासणे सोपे जाईल. विद्यार्थी ICAI सीए फाउंडेशन मे २०२६ परीक्षेचे गुणपत्रक (स्कोरकार्ड) देखील डाउनलोड करू शकतात.
03 Jul 2026 01:10 PM (IST)
Uddhav Thackeray Press conference : “भाजपचे सुरुवातीला दोनच खासदार होते. पण राममंदिराच्या मुद्द्याचे भांडवल करून भाजपवाले हिंदुत्त्वाकडे आले. आज ते देशात सत्ता उपभोगत आहेत. भाजपवाले आता ऑपरेशन राम मंदिर करत आहे का? राममंदिरालाच मिळालेल्या दानाची चोरी करून चोरीचा पैसा ते पक्ष फोडण्यासाठी वापरत आहेत. राम मंदिरावर दरोडा टाकला जातोय.” असा आरोप करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे.
येत्या रविवारी (5 जुलै) दादर येथील हनुमान मंदिरासमोर दुपारी चार वाजता हे आंदोलन होणार आहे. राम मंदिर आणि रामावर प्रेम कऱणाऱ्या राम भक्तांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दादरमधील हनुमान मंदिरांसमोर दुपारी चार वाजता रामरक्षा स्त्रोत्र आंदोनल करणार, तमाम हिंदू आणि रामभक्तांना या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती करत आहे. हनुमान चालीसा, मारुती स्त्रोत्र देखील म्हणणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
03 Jul 2026 01:02 PM (IST)
पुणे : उच्च सुरक्षा नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवण्याची अंतिम मुदत ३० जून रोजी संपल्याने, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) १ जुलैपासून विना-एचएसआरपी वाहनांविरुद्ध कडक मोहीम हाती घेतली आहे. कारवाईच्या पहिल्याच दिवशी आरटीओने २६१ वाहनांची तपासणी केली, ज्यामध्ये एचएसआरपी नंबर प्लेट न बसवणाऱ्या ७५ वाहनचालकांना प्रत्येकी १ हजार रुपयांचा ऑनलाईन दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी दंड झालेल्या एकाही वाहनचालकाने अद्याप दंडाची रक्कम जमा केलेली नाही.
03 Jul 2026 12:48 PM (IST)
: छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी चौक परिसरात गुरुवारी पहाटे ४७ वर्षीय स्क्रॅप व्यावसायिकाचा धारदार शस्त्राने मांडीवर वार करून खून केला आहे. गंभीर जखमी अवस्थेत मदतीसाठी धावत आलेल्या व्यावसायिकाला पोलिसांनी घाटीत दाखल केले; मात्र अतिरक्तस्त्रावामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, हल्ल्यामागील नेमके कारण क्षुल्लक वाद होते की लुटीचा प्रयत्न, याचा जिन्सी पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.
03 Jul 2026 12:36 PM (IST)
पुण्यातील लोहगड किल्ल्यावर उद्योजक केतन अग्रवाल याचा दरीत पडून झालेला मृत्यू सध्या चर्चेचा विषय आहे. देशभरात या प्रकरणावर चर्चा होत आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासेही समोर येत आहेत. अशातच आता केतन अग्रवालला टक्कल होते म्हणून लग्न करायचे नव्हते, असे सियाने पोलिस तपासात सांगितले आणि हाच धागा पकडून डॉ. मुस्कान सोनी हिने केतनची खिल्ली उडवली होती. मात्र असे करणे डॉ. सोनीला चांगलेच महागात पडले असून, तिच्यावर ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अॅण्ड सर्जन्स असोसिएशनने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. तसेच पाच वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे.
03 Jul 2026 12:24 PM (IST)
गुहागर तालुक्यातील बहुचर्चित विश्वास खरे खून व दरोडा प्रकरणात तब्बल १२ वर्षांनंतर अखेर सत्याचा विजय झाला आहे. प्रकरणात चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. वी. म्हालटकर यांनी आरोपी अमोल चंद्रकांत गाडवे (रा. बोफखेल, खडकी, पुणे) आणि किरण रामदास कुचेकर (रा. उत्तमनगर, वारजे माळवाडी, पुणे) यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची सक्तमजुरी अशीही शिक्षा ठोठावली. तर विष्णू किसन कनपुरे (रा. पुणे) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
03 Jul 2026 12:12 PM (IST)
दौंड तालुक्यातील खुटबाव येथे जुलै २०२० मध्ये घडलेल्या अत्यंत धक्कादायक आणि गंभीर अशा दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल बारामती न्यायालयाने दिला आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका महिलेसह पुरुषाची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी प्रमोद उर्फ पप्पू अंकुश पवार याला बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनील ईश्वर वसेकर यांनी कोर्टात सबळ पुरावे सादर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली, यामध्ये भा.द.वि. कलम ३०२ (खून): जन्मठेप (सश्रम कारावास) आणि ५,००० रुपये दंड. दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद,भा.द.वि. कलम १७६: ६ महिने साधी कारावासाची शिक्षा,भा.द.वि. कलम १७७: ६ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
03 Jul 2026 11:45 AM (IST)
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेत दररोज लाखो महिला प्रवास करतात. मात्र, अनेक स्थानकांवर स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज महिला स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर ‘वुमेन्स फॅसिलिटी सेंटर’ सुरू केले आहे. सीएसएमटी दिशेकडे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर सुरू झालेल्या या केंद्रामुळे महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान स्वच्छ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
03 Jul 2026 11:40 AM (IST)
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र (UN) मुख्यालयाबाहरे एका व्यक्तीने आत्मदहन केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गंभीर भाजल्यामुळे संबंधित व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे. न्यूयॉर्क पोलिसांकडून या घटनेची पुष्टी करण्यात आली आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे.
03 Jul 2026 11:35 AM (IST)
इंग्लंडने दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून आपल्या घरच्या मैदानावर होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला आहे. या सामन्यात त्यांचा सामना सहा वेळा विजेतेपद पटकावलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाशी होईल. विजेतेपदाचा सामना ५ जुलै रोजी लॉर्ड्सवर खेळला जाईल. जर इंग्लंडने हा सामना जिंकला, तर १७ वर्षांनंतर हे त्यांचे पहिले विजेतेपद असेल. २००९ मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषक हंगामात न्यूझीलंडला हरवून इंग्लंडने पहिले विजेतेपद पटकावले होते.
03 Jul 2026 11:28 AM (IST)
बारामती शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक कंबाईंड सीवर सक्शन, जेटिंग आणि डीवॉटरिंग मशीन उपलब्ध झाले आहे. हे अत्याधुनिक वाहन बारामती नगरपरिषदेच्या प्रांगणात दाखल होत असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आगामी बारामती दौऱ्यात त्याचे लोकार्पण करून ते बारामतीकरांच्या सेवेत समर्पित करण्यात येणार आहे.
03 Jul 2026 10:50 AM (IST)
बारामती शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक कंबाईंड सीवर सक्शन, जेटिंग आणि डीवॉटरिंग मशीन उपलब्ध झाले आहे. हे अत्याधुनिक वाहन बारामती नगरपरिषदेच्या प्रांगणात दाखल होत असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आगामी बारामती दौऱ्यात त्याचे लोकार्पण करून ते बारामतीकरांच्या सेवेत समर्पित करण्यात येणार आहे.
03 Jul 2026 10:40 AM (IST)
इंडोनेशियाच्या पापुआ प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पापुआ प्रदेशात अमेरिकन वैमानिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर विमानालाही आग लावल्याचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली असून हल्ल्याची जबाबदारी पापुआ प्रदेशासीतल सशस्त्र बंडखोरांनी घेतली आहे. या घटनेुळे पापुआतील दीर्घकाळ सुरु असलेल्या संघर्षाबाबत पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.
03 Jul 2026 10:30 AM (IST)
मुंबईसह उपनगरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले असले, तरी अनेक जण पावसाचा मनमुराद आनंद घेत आहेत. याच दरम्यान बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने पत्नी कतरिना कैफसोबतचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून, त्याच्या कॅप्शनने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
03 Jul 2026 10:20 AM (IST)
दुकानातून घेतलेली एक छोटीशी प्लास्टिक पिशवी… काही मिनिटांत उपयोग संपतो आणि ती फेकून दिली जाते. पण हीच साधी वाटणारी पिशवी निसर्गात मात्र शेकडो वर्षे टिकून राहते आणि हळूहळू पर्यावरणात अदृश्य पण कायमस्वरूपी परिणाम सोडते. याच विरोधाभासाची जाणीव करून देण्यासाठी ३ जुलै हा ‘आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो.
03 Jul 2026 10:10 AM (IST)
माहिती अधिकार (आरटीआय) कायद्यांतर्गत राज्य सरकारने केलेल्या वादग्रस्त नियमबदलांना अखेर तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बदलांविरोधात उपोषणाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हस्तक्षेप केला. अण्णा हजारे यांच्याशी चर्चा होईपर्यंत कोणतेही नवे नियम लागू करू नयेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी राज्य माहिती आयोगाला केली.
03 Jul 2026 10:00 AM (IST)
जागतिक बाजारातील संमिश्र कल पाहता, आज ३ जुलै रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, तेजीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास १५१ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २४,४१६ च्या पातळीवर व्यवहार करत होता.
03 Jul 2026 09:50 AM (IST)
मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. आज, गुरुवारी देखील मुंबईत पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवलीसह अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. तसेच नवी मुंबईत देखील पावसाची बॅटिंग सुरु आहे. याशिवाय, वाढत्या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक उशीराने सुरु आहे. तसेच, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने आणि पावसामुळे दृष्टमानता कमी झाल्याने रस्ते वाहतूक देखील मंदावली आहे.
03 Jul 2026 09:40 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच नैऋत्य मान्सूनने पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेपासून दिलासा दिला आहे. डोंगराळ भागांमध्ये मात्र हाहा:कार उडाला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये ढगफुटी झाली असून, त्यामुळे पूर आल्याचे पाहिला मिळत आहे. तर उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्ग अनेक तासांपासून बंद आहे. त्यामुळे हजारो यात्रेकरू अडकून पडले.
03 Jul 2026 09:30 AM (IST)
Madhya Pradesh Murder: आयुष्यात सर्व काही सुख-सोयी असूनही केवळ समाधानाच्या अभावामुळे आणि सततच्या अतृप्ततेतून गुन्हेगारी प्रवृत्ती कशी बळावते, याचे एक धक्कादायक आणि विवाहाच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे प्रकरण समोर आले आहे. येथील एका महिलेने आपल्या चौथ्या लग्नाचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रियकराच्या मदतीने तिसऱ्या पतीची निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक आरोप आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित महिला, तिचा प्रियकर आणि त्यांना मदत करणाऱ्या एका अन्य साथीदाराला अटक केली आहे.
03 Jul 2026 09:25 AM (IST)
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढते भाव आणि डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत चाललेल्या रुपयामुळे देशभरात सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून, आज ३ जुलै रोजी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४३,९४० रुपयांवर पोहोचला आहे. याआधीच्या दिवशी दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याच्या दरात तब्बल ३,००० रुपयांची मोठी वाढ होऊन तो प्रति १० ग्रॅमसाठी १,४७,५०० रुपयांवर पोहोचला होता. जागतिक बाजारात 'स्पॉट गोल्ड'चा भाव प्रति औंस ४,१४४.८३ डॉलर्स इतका वाढल्याने स्थानिक बाजारातही सोन्याची मागणी आणि दर कमालीचे वधारले आहेत; मात्र सोन्याच्या या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले असून, खरेदीचा प्लॅन पुढे ढकलण्याची चिंता त्यांना सतावत आहे.
03 Jul 2026 09:15 AM (IST)
Ketan Agrawal Murder Case: येथील उद्योजक केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने, आज दुपारी अडीच वाजेनंतर त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायाधीश ए.एम. विभूते यांच्या समोर ही महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार असून, गेल्या पाच दिवसांच्या कोठडीत पोलिसांनी केलेल्या कसून तपासात हाती लागलेले महत्त्वाचे धागेदोरे आणि पुरावे न्यायालयात सादर केले जातील.
03 Jul 2026 09:10 AM (IST)
India Share Market Update: जागतिक बाजारातील संमिश्र कल पाहता, आज ३ जुलै रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, तेजीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास १५१ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २४,४१६ च्या पातळीवर व्यवहार करत होता.






