फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व दिले जाते. आषाढ महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो. वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशीचे व्रत पाळले जाते. कारण दर महिन्याला दोनदा एकादशीचे व्रत पाळले जाते. यावेळी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. यावेळी आषाढ महिन्यातील एकादशीचे व्रत शनिवार, 21 जून रोजी पाळले जाणार आहे. योगिनी एकादशीच्या दिवशी तुमच्या राशीनुसार कोणते उपाय करायचे, जाणून घ्या
एकादशीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंना लाल फुले अर्पण करावी. व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते.
वृषभ राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंना पांढरे वस्त्र अर्पण करावे यामुळे व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते, असे म्हटले जाते.
वृषभ राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंना हिरव्या रंगांचचे वस्त्र अर्पण करावे यामुळे तुमची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतात, असे म्हटले जाते.
या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंना खीर अर्पण करावी. यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता.
सिंह राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र अर्पण करुन स्वतःही पिवळे कपडे परिधान करावे यामुळे जीवनात सुख समृद्धी येते.
एकादशीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगांची मिठाई आणि केशर अर्पण करावे. यामुळे व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात.
या लोकांनी पांढऱ्या रंगांच्या वस्तूंचे दान करावे यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात कायम गोडवा राहतो.
वृश्चिक राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने नोकरी व्यवसायात प्रगती होते.
धनु राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगांचे वस्त्र आणि चंदन अर्पण करावे. त्यासोबतच पिवळी फळे दान करावी. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते असे म्हटले जाते.
मकर राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी दही आणि वेलची अर्पण करणे शुभ मानले जाते.
कुंभ राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा, यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात असे मानले जाते.
एकादशीच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी गरीब लोकांना मिठाईचे दान करावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)