फोाटो सौजन्य- pinterest
वास्तूशास्त्रामध्ये विविध गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. प्राचीन ग्रंथांवर आधारित असलेले हे वास्तुशास्त्र आहे. आजकालच्या आधुनिक युगामध्ये प्रत्येक जण घरामध्ये, दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा बसवतात. मात्र बऱ्याचदा आपल्याला माहीत नसते की सीसीटीव्ही कॅमेरा बसवताना घराच्या योग्य दिशेला बसवला नाही तर आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच तुम्हाला इतर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याशी योग्य दिशा कोणती, जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये चुकूनही पूर्व, आग्नेय, नैऋत्य आणि पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेला सीसीटीव्ही कॅमेरा लावू नये. इतर कोणत्याही दिशेला कॅमेरा लावल्यास त्याचे फायदे होतात. जर तुम्ही या दिशेला सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यास चोरीसह अनेक समस्या आणि अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. तसेच आर्थिक समस्या देखील जाणवते. असे देखील म्हटले जाते की, या दिशेला मुलांचे आणि घड्याळांचे फोटो लावू नये.
वास्तुशास्त्रात उल्लेख केल्याप्रमाणे घराचे मुख्य प्रवेशद्वार योग्य दिशेला नसल्यास घरामध्ये रोग, दुःख, भांडणे इत्यादी समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते. जर तुमच्या दरवाजाची दिशा ईशान्य दिशेकडे असल्यास तुमच्या घराला आग लागण्याची शक्यता जास्त असते. तर मुख्य प्रवेशद्वाराची दिशा आग्नेय दिशेला असल्यास घरातील मुले खोटे बोलू लागतात, असे म्हटले जाते. यामुळे पालकांसाठी हे चिंतेचे कारण बनते.
त्याचप्रमाणे दरवाजाची दिशा नैतृत्य दिशेला असल्यास मुलांची संबंधित समस्या वाढतात. म्हणजे मुल न होणे. यासोबतच, मुख्य दरवाजा वायव्य दिशेला असल्यास घरातील महिलांवर बाहेरील लोकांचा सहज प्रभाव पडतो. या सर्व घटनाचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडतो. अशा घरात राहणाऱ्या लोकांना खोट्या न्यायालयीन खटल्यांना सामोरे जावे लागू शकते.
घरामध्ये स्वयंपाक घर योग्य दिशेला असल्यास घरामध्ये शिजवलेले अन्न कायम व्यक्तीला निरोगी आणि सकारात्मक उर्जेने परिपूर्ण ठेवते. याशिवाय ते संपत्ती आणि समृद्धीचे कारक मानले जाते. मात्र चुकूनही स्वयंपाकघर ईशान्य, पूर्व किंवा नैऋत्य दिशेला असल्यास घरातील लोकांना गरिबीचा सामना करावा लागू शकतो. यामुळे घरामध्ये नेहमीच वाद आणि आजारपण येण्याची शक्यता जास्त असते.
वास्तूशास्त्रानुसार, घरामध्ये घड्याळ जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे चुकीच्या दिशेने लावल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच दक्षिण किंवा पूर्व दिशेला गोल घड्याळ लावले असल्यास तुमचे सर्व चालू असलेले काम बिघडू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)