फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Police Smriti Din: दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतिदिन साजरा केला जातो. हा दिवस देशाची सुरक्षा आणि नागरिकांचे रक्षण करताना शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित आहे. 1959 साली लडाखच्या हिंद-चीन सीमेवर चीनी सैनिकांनी भारतीय पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात 10 पोलीस शहीद झाले होते. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.
या दिवशी देशभरात पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शहीद पोलीस जवानांना आदरांजली वाहून त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानित केले जाते. पोलीस दल देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असतात आणि त्यांचे योगदान समाजासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.






