फोटो सौजन्य - Social Media
नवभारत वृत्तवाहिनीने दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्य आणि दिमाखदार स्वरूपात ‘नवभारत वुमन अवॉर्ड्स २०२५’ चे आयोजन केले होते. हा सोहळा महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यासाठी दरवर्षी आयोजित केला जातो. ‘नवभारत वुमन अवॉर्ड्स २०२५’ मध्ये सामाजिक कार्य, शिक्षण, विज्ञान, कला, प्रशासन, क्रीडा, उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या आणि समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात येतो.
समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित स्त्रियांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अमृता फडणवीस यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून महिलांना गौरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत प्रेरणादायी विचार मांडले आणि महिलांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अमृता फडणवीस यांनी त्यांच्या @amruta.fadnavis या इंस्टाग्राम हॅन्डलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ‘नवभारत वुमन अवॉर्डस २०२५’ चे काही क्षण शेअर केले आहेत. पोस्टमध्ये महिलांना पुरस्कारित करून त्यांचा गौरव करतानाचे काही क्षण शेअर केले गेले आहेत. तयार काही फोटोंमध्ये अमृता फडणवीस उपस्थितांना संबोधित करत आहेत. यादरम्यान त्यांनी पोस्टखाली याबद्दल माहिती दिली आहे. पोस्टखाली त्यांनी नमूद केले आहे की,” मुंबईत आयोजित नवभारत वुमन अवॉर्ड्स २०२५ मध्ये प्रतिष्ठित, प्रेरणादायी आणि अतुल्य कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. कर्तव्यनिष्ठ महिलांशी संवाद साधून आनंद वाटला.”
याशिवाय, अमृता फडणवीस यांचा या कार्यक्रमातील लूकदेखील चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्या या भव्य सोहळ्यात आकाशी रंगाच्या सुंदर आउटफिटमध्ये झळकत होत्या. त्यांच्या स्टायलिश लूकमुळे त्यांचे चाहतेही प्रभावित झाले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण लूकबद्दल देखील माहिती शेअर केली आहे. त्यांनी परिधान केलेला हा खास पोशाख @reemaanandlabel यांनी डिझाइन केला आहे, तर त्यांच्या दागिन्यांचे डिझाइन @curiocottagejewelry यांचे आहे. त्यांचा संपूर्ण लूक @stylebysaachivj यांनी स्टाइल केला आहे.
‘नवभारत वुमन अवॉर्ड्स २०२५’ हा सोहळा केवळ महिलांच्या सन्मानाचा नव्हे, तर त्यांच्या संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा गौरव करणारा ठरतो. महिलांनी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे आणि त्यांच्या परिश्रमाला उचित मान्यता देण्यासाठी अशा सोहळ्यांचे महत्त्व अधिक वाढते.