Photo Credit- Social Media 'हे नेते' ठरवणार देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मंत्री
पुणे: मागील दोन आठवड्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज महायुती सरकारच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आणि त्यांच्या चाहत्यामंध्ये एकच जल्लोष झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या घोषणेची त्यांचे चाहते वाट पाहू लागले. पण त्यानंतरही महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत राहिल्या. दिल्लीतील गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे नाराज होऊन त्यांच्या गावी निघून गेले. मुख्यमंत्रिपदाच्या बदल्या गृहमंत्रीपदाची मागणी एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे केली होती.त्यामुळे शपथविधीला उशीर होत होता. पण अखेर दोन आठवड्यांच्या प्रतिक्षेनंतर आज महायुतीच्या विधीमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंपदी निवड करण्यात आली. पण लोकसभेतील पराभवापासून विधानसभेच्या विजयापर्यंतचा फडणवीसांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते.
राज्यात विधनसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व य़श मिळवत यशाचा झेंडा फडकावला.132 जागा जिंकून भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने हे अभूतपूर्व यश देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्राप्त केले आहे. राज्यात महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. पण हा विजय देवेंद्र फडणवीसांसाठी सोपा नव्हता. फडणवीस यांचे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध नाहीत तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लाडके आहेत. भाजपमधील राष्ट्रीय स्तरावरील बड्या नेत्यांमध्येही त्यांची गणना होते. पण लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश जागा भाजपने गमावल्या आणि विजयाचा आकडा दुहेरी आकडाही गाठू शकला नाही.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपचा हा पराभव अनेक अर्थाने फडणवीसांसाठी मोठा राजकीय पराभव होता. या निवडणुकीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी उपमुख्यमंत्री पद सोडून पक्षासाठी काम करण्याची ऑफर दिली होती.
मात्र, त्यावेळी उपमुख्यमंत्री असतानाही पराभवाचे खापर आपल्याच माथी मारले जात असल्याचा राग त्यांच्या मनात होता. पण लोकसभा निवडणुकीनंतरही भाजपने फडणवीसांना सरकारमधून बाहेर पडू दिले नाही आणि फडणवीस सरकारमध्येच राहिले. पण त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपला गियर बदलला. लोकसभा निवडणुकीतील पराभव मागे टाकण्यासाठी फडणवीसांना प्रत्येक खेळी खेळायची होती.
गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठे बदल झाले आहेत, विशेषत: भाजपच्या राजकारणात लोकसभेतील पराभवानंतरही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत राहिली. अनेकदा फडणवीस यांना दिल्लीला पाठवायचे, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचे, केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करायचे, अशी चर्चाही सुरू झाल्या. पण त्याचकाळात फडणवीसांनी आपले डाव टाकण्यास सुरूवात केली होती. लोकसभेतील पराभवानंतर दुखावलेल्या फडणवीसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क साधत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी आरएसएसलाही विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी काम करण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीच्या काळात संघ सक्रिय नव्हता. फडणवीस यांच्या सभांनंतर संघाची टीम सक्रिय झाली. निवडणुकीतील प्रत्येक छोट्या मोठ्या बैठकांपासून मोठमोठ्या सभांपर्यंत फडणवीस आणि भाजपने मायक्रो नियोजन केले होते. निवडणुकीच्या दिवसापर्यंत भाजप मैदानात काम करत होती.
तालिबानचा आणखी एक तानाशाही निर्णय; महिलांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यापासून बंदी
राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपचे नेतृत्त्व म्हणून पाहिले जायचे. पण मधल्य काळात हे नेतृत्त्व बदलाच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. पण भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि संघाच्या हस्तक्षेपामुळे भाजपची लगाम देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राहिली. विधानसभा निवडणुकीच्या काळातही एकनाथ शिंदे यांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाशी वाढता संपर्क आणि अजित पवार यांची नाराजी या सर्वात भाजपमधूनच फडणविसांच्या विरोधात सक्रीय असलेला गट या सगळ्याचा सामना करत देवेंद्र फडणवीस स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्यात यशस्वी झाले. निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीमध्ये वाटाघाटी करून जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्यात भाजपला यश आले. अखेर फडणवीसांच्या मेहनत फळाला आली आणि विधानसभा निवडणुकीत भाजप अभूतपूर्व बहुमताने विजयी झाली.
पण यानंतरही फडणवीसांचा संघर्ष सुरूच होता. मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांची तळमळ आणि नाराजी कायम होतीच. निकालानंतरही दोन आठवड्यांपर्यंत भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर कऱण्यात आले नाही. त्यामुळेही राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा पेच वाढला होता. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत विनोद तावडे यांच्यापासून मुरलीधर मोहोळांपर्यंत अनेकांची नावे आली. पण या सर्वांना मागे टाकत आज फडणवींसांच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाली.
संभलमध्ये राजकारण तापले! विरोधी पक्षनेते राहुल गांधी अन् प्रियांका गांधींचा दौरा,