फोटो सौजन्य: सोशल मीडिया
गणेशोत्सवात भगावान शंकर आणि माता पार्वतीच्या लाडक्या पुत्राची म्हणजेच गणेश बाप्पाची सर्वत्र पुजा केली जाते. सर्वत्र आनंदाचे जल्लोषाचे वातावरण आहे. रोज बाप्पाला वेगवेगळे प्रकारचे मोदक, मिठाई अर्पण केली जात आहे. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दूरवरूण भक्तगण येत आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत चालणाऱ्या दहा दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान भक्तांना त्यांच्या आराध्य गणेशाची विविध रूपे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकाबद्दल सांगायचे तर, गणेशोत्सवात बाप्पाच्या मनमोहक आणि मनोकामना पूर्ण करणाऱ्या अष्टविनायकाच्या रूपाचे दर्शन घेण्यास भक्तांची गर्दी जमली आहे. गणपतीच्या अष्टविनायक रूपांपैकी आज आम्ही तुम्हाला विघ्नेश्वर विनायक रूपाचा महिमा सांगणार आहोत.
ओझरचा विघ्नेश्वर विनायक
अष्टविनायकतील पाचवा गणपती विघ्नेश्वरचे मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिह्यात कुकरी नदीच्या काठावर ओझर गावात आहे. अष्टविनायकाच्या इतर मंदिराप्रमाणेच हे मंदिर देखील पूर्वाभिमुख आहे. या ठिकाणा असलेली मूर्ती पूर्वेकडे आहे. या मंदिराती गणपती बाप्पाची मूर्ती सिंदूर आणि तेलाने मढवली जोत. मूर्तीच्या डोळ्यात तसेच नाभीत हिरे जडलेले आहे. पुणे-नाशिक मार्गावर 85 किमोमीटर अंतरावर असलेल्या ओझर गावात विघ्नहर्ता अष्टविनायकाचे हे मंदिर आहे.
गणपतीला विघ्नेश्वर हे नाव कसे पडले?
पौरानिक कथेनुसार, विघ्नासुर नावाच्या राक्षसाचा गणेश बाप्पांनी पराभव केला होता. त्यामुळे बाप्पाला विघ्नेश्वर विनायक हे नाव मिळाले. कथेनुसार राजा अभिनंदन नावाच्या राज्याच्या जीवनात अडथळे निर्माण करण्यासाठी देवराज इंद्राने विघ्नासुर नावाच्या राक्षसाची निर्मीती केली होती. विघ्नासुराने सर्व धार्मिक आणि वैदिक विधी नष्ट केले. त्यानंतर भक्तांच्या प्रार्थना पूर्णे करण्यासाठी बाप्पाने त्याचा पराभव केला.
गणेशाने पराभूत केल्यावर, राक्षस गणेश बाप्पाला शरण गेला. गणपती बाप्पाने एक अट ठेवील की, जिथे गणेशाची पूजा केली जात असेल तिथे तो जाणार नाही. विघ्नासुराने ही अट मान्य केली आणि गणपतीच्या नावासोबत आपले नाव देखील जोडले जावे अशी श्री गणेशाची प्रार्थना केली, तेव्हापासून श्रीगणेशाचे नाव विघ्नहर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि ओझरचा गणपती श्री विघ्नेश्वर विनायक म्हणून प्रसिद्ध झाला.
गणपती रिद्धी-सिद्धीसह विराजमान आहे
या मंदिराभोवती उंच दगडी भिंत बांधलेली असून मंदिराचे शिखर सोन्याचे आहे. मंदिराचा बाहेरचा गाभारा 20 फूट लांब आमि आतील गाभारा 10 फूट लांब आहे. मंहिरातील मूर्तीची सोंड डाव्या बाजूला आहे. बाप्पाच्या या मूर्तीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जोडलेले आहेत. तसेच रिद्दी सिद्धी देखील गणपतीच्या बाजूला निराजमान आहेत. हे मंदिर पोर्तुगाज शासकांचा पराभव करून 1785 च्या दशकात चिमाजी अप्पांनी बांधले होते.
मंदिराभोवती उंच दगडी भिंती असून त्याचे शिखर सोन्याचे आहे. मंदिराचा बाहेरचा गाभारा 20 फूट लांब असून आतील गाभारा 10 फूट लांब आहे. मंदिरात बसवलेल्या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला असून त्याच्या डोळ्यात आणि नाभीत हिरे जडलेले आहेत. या मंदिरात रिद्धी-सिद्धीसह गणेश विराजमान आहे. असे म्हणतात की या मंदिराचा वरचा भाग सोन्याचा आहे, जो पोर्तुगीज शासकांचा पराभव करून 1785 च्या सुमारास चिमाजी अप्पांनी बांधला होता.