विविधतेने नटलेला देश म्हणजे भारत. निसर्ग, संस्कृती, समाज यात जशी विविधता आढळते तशीच विविधता भाषेत देेखील आढळते. संवाद साधण्यासाठी भरतात विविध भाषा आहेत असं जरी असलं तरी संपूर्ण भारतात एक भाषा राज्याराज्यात रुळलेली आहे, अशी भाषा जी अनेकांची मातृभाषा नसली तरी रोजच्या जगण्यातली व्यावहारिक भाषेचा दर्जा हीला नक्की आहे, ती म्हणजे हिंदी भाषा. जसा मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त आहे आणि मराठी भाषा दिन साजरा केला जातो तसाच 14 सप्टेंबरला देखील हिंदी दिवस साजरा केला जातो.
हिंदी भाषा दिनाचा देखील एक रंजक इतिहास आहे. 14 सप्टेंबर 1949 या दिवशी संविधान सभेने देवनागरी लिपीसह हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले. स्वतंत्र भारताला त्याच्या भाषेला आदर आणि मान्यता मिळण्याचे हे पहिले मोठे पाऊल होते. त्यानंतर, १९५३ पासून हा दिवस औपचारिकपणे राष्ट्रीय हिंदी दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. या हिंदी दिवसाची आणखी एक गोष्ट आहे. राष्ट्रीय पातळीसोबतच, हिंदीला आंतरराष्ट्रीय मान्यता हिंदीला देण्यासाठीही पुढाकार घेण्यात आला. कारण १९७५ मध्ये याच दिवशी नागपूर येथे पहिले जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती. तो दिवस होता 10 जानेवारी. आणि हेच कारण आहे हिंदी दिवस हा 10 जानेवारीला देखील साजरा केला जातो.
आज केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये हिंदी भाषिकांची संख्या कोट्यवधींमध्ये आहे. अशा परिस्थितीत, जागतिक हिंदी दिनाचा उद्देश हिंदीला जागतिक आवाज बनवणे आणि परदेशातही तिची पोहोच मजबूत करणे आहे.हिंदी ही केवळ एक भाषा नाही तर ती आपल्या संस्कृती, साहित्य आणि एकतेचा आत्मा आहे. ती भारतातील विविध परंपरा आणि प्रांतांना जोडणारी दुवा आहे.हिंदी दिवस आपल्याला आठवण करून देतो की भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर ती ओळख आणि अभिमानाचे प्रतीक आहे. ती येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.
आजवर अनेक साहित्यिक या भाषेने दिले आहेत. गुलजार, इम्तियाज अली, आणि अगदी आताचे लोकप्रिय लेखक दिव्य प्रकाश दुबे ज्यांची ऑक्टोबर जंक्शन ही कादंबरी फक्त हिंदीतच नाही तर इंग्रजी आणि अन्य भाषेत देखील लोकप्रिय होत आहे. त्यामुळे हिंदी ही भारताची फक्त एक भाषा नाही तर ती विविधतेची ओळख आहे.