निसर्गाचे सौंदर्य जितके विलोभनीय असते, तितकेच त्याचे काही पैलू थरकाप उडवणारे असतात. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे उत्तराखंडमधील हिमालयाच्या कुशीत, तब्बल १६,५०० फूट उंचीवर असलेला ‘रूपकुंड तलाव’ या तलावाला जगभरात ‘कंकालांचा तलाव’ म्हणून ओळखले जाते. वर्षातील बहुतांश काळ बर्फाच्छादित असणाऱ्या या तलावाचा बर्फ जेव्हा उन्हाळ्यात वितळतो, तेव्हा तलावाच्या तळाशी आणि काठावर शेकडो मानवी सांगाडे, कवटी आणि हाडे तरंगताना दिसतात. हे भयानक दृश्य कोणाचाही थरकाप उडवू शकते.
राजा, राणी आणि सैनिकांची लोककथा
या सांगाड्यांमागे स्थानिक लोकांमध्ये एक जुनी कथा प्रसिद्ध आहे. नवव्या शतकात कनौजचे राजा जशधवल हे त्यांच्या गरोदर राणीसह आणि सैनिकांच्या लवाजम्यासह ‘नंदा देवी’च्या यात्रेसाठी निघाले होते. यात्रेदरम्यान राजाने गाण्याबजावण्याचे नियम मोडल्यामुळे स्थानिक देवता नंदा देवी कोपली. अचानक आलेल्या भयंकर वादळात आणि गारपिटीत राजा, राणी आणि त्यांचे संपूर्ण सैन्य या तलावात गाडले गेले, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे.
हंपीला फिरायला जाताय? ही आहे हंपीमध्ये फिरण्यासारखी 10 बेस्ट ठिकाणे! आत्ताच पाहून घ्या
विज्ञानाला पडलेले कोडे
१९४२ मध्ये एका फॉरेस्ट गार्डने या तलावाचा शोध लावला. तेव्हापासून आजपर्यंत जगभरातील शास्त्रज्ञांनी यावर अनेक संशोधने केली आहेत, पण प्रत्येक संशोधनासोबत हे रहस्य अधिकच गडद होत गेले:
भयंकर गारपीट: डीएनए चाचण्यांवरून असे दिसून आले की, हे सांगाडे ८५0 ईसवी सन पूर्व काळातील आहेत. त्यांच्या कवटीवर झालेल्या जखमांवरून असे समोर आले की, क्रिकेटच्या चेंडूएवढ्या मोठ्या गारा अंगावर पडल्यामुळे या लोकांचा मृत्यू झाला असावा. हिमालयाच्या उघड्या पठारावर लपायला जागा न मिळाल्याने हे सगळे एकाच वेळी मारले गेले.
कर्नाटकातील बदामी मधील ही आहेत 10 पर्यटन स्थळे! आत्ताच पाहून घ्या
सर्वात धक्कादायक खुलासा २०१९ च्या संशोधनात झाला. हाडांच्या रचनेवरून कळाले की, हे सर्व लोक एकाच काळातील आणि एकाच ठिकाणचे नव्हते. यात काही लोक भारतीय वंशाचे होते, तर काही लोकांचे डीएनए थेट भूमध्य समुद्रातील (Mediterranean) ग्रीस देशातील लोकांशी जुळणारे होते, जे तिथे शेकडो वर्षांनंतर आले होते.
थरारक पर्यटनाचे केंद्र
हे लोक कोण होते? ग्रीसचे लोक हिमालयातील एवढ्या दुर्गम भागात काय करत होते? या प्रश्नांची अचूक उत्तरे विज्ञानाकडेही नाहीत. आज हे रहस्यमयी रूपकुंड ट्रेकर्स आणि शास्त्रज्ञांसाठी आकर्षणाचे मोठे केंद्र बनले आहे. निसर्गाचा कोप आणि इतिहासाचे गडद गूढ सोबत घेऊन हा तलाव आजही हिमालयाच्या कुशीत शांत उभा आहे.






