शिवसेना वर्धापनदिन मेळाव्यात कोण गाजवणार व्यासपीठ? ठाकरे-शिंदे गटातील प्रमुख वक्त्यांची यादी समोर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापनदिन मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ‘ऑपरेशन टायगर’नंतर प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याने या भाषणाकडे विशेष लक्ष लागले आहे.
ठाकरे गटातून हे नेते करणार भाषण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा वर्धापनदिन मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा शिंदे गटासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
शिंदे गटातून हे नेते करणार भाषण
ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या चर्चांनंतर दोन्ही गटांचा हा पहिलाच मोठा मेळावा आहे. त्यामुळे या व्यासपीठांवरून होणारे आरोप-प्रत्यारोप, पक्षसंघटनेवरील दावे आणि आगामी राजकीय दिशा याकडे सर्वांचे लक्ष असेल.
दरम्यान, गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुमारे ३०० ते ४०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले असून प्रवेशद्वारांवर प्रत्येकाची तपासणी केली जात आहे.
तसेच काळ्या रंगाचे कपडे घालून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश नाकारला जात असल्याची माहिती समोर आली आहे. संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने होणारे हे दोन्ही मेळावे केवळ संघटनात्मक कार्यक्रम न राहता महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारे ठरू शकतात. विशेषतः खासदार फुटीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांवर कोणते राजकीय बाण सोडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






