• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Maharashtra St Employees Congress General Secretary Shrirang Barge On Msrtc St Bus

Exclusive : ‘फाटलेली आसनं, तुटलेले पत्रे….! खिळखिळ्या बसप्रमाणेच महामंडळाचीही अवस्था…’, श्रीरंग बरगे यांचा आरोप

St Bus News : एसटी कर्मचाऱ्यांची नोकरी जास्त जोखिमीची आहे. याचसंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस आणि अभ्यासक श्रीरंग बरगे यांनी नवराष्ट्र डिजीटला मुलाखत दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 12, 2025 | 01:09 PM
खिळखिळ्या बसप्रमाणेच महामंडळाचीही अवस्था...', श्रीरंग बरगे यांचा आरोप

खिळखिळ्या बसप्रमाणेच महामंडळाचीही अवस्था...', श्रीरंग बरगे यांचा आरोप

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • एसटी चालक वाहकांची संख्या अपुरी
  • कर्मचाऱ्यांचे पैसे व्यवस्थापन चोरतं…
  • घोषणा फक्त कागदावरच…

St Bus News In Marathi : ‘प्रवाशांच्या सोयीसाठी’ हे ब्रीद वाक्य असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC)सेवेत काळानुरूप बदल झाला, हे नाकारता येत नाही. ‘गाव तिथे एसटी’ या वाक्याचा अभिमान बाळगून महामंडळाने गेल्या दोन दशकांत ‘शिवाई’, ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘विठाई’, ‘अश्वमेध’ आदी विविध नावांनी सेवा सुरू केल्या. इलेक्ट्रिक बस देखील आणल्या, अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून ते महिलांपर्यंत विविध श्रेणींसाठी सवलत योजना लागू करण्यात आली आणि ऑनलाइन बुकिंगपासून अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या. यामध्ये ‘एसटी’चे अधिकारी, कर्मचारी यांची मेहनत आणि सकारात्मक कार्यपद्धत यांचा यात महत्त्वाचा वाटा आहे. पण याच कर्मचाऱ्यांचा एसटीसोबतचा प्रवास सुखरुप होत आहे का? याचविषयावर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस आणि अभ्यासक श्रीरंग बरगे यांनी नवराष्ट्र डिजीटला दिली खास मुलाखत…

थकीत महाभाई भत्ता 1 हजार कोटी

एसटी ही अत्यावश्यक सेवा असल्याने कर्मचारी कुठल्याही सणाला कुटुंबासोबत नसतात. चालक आणि वाहक सेवाभावी दृष्टिकोन ठेवून रात्रंदिवस प्रवाशांना सेवा देत असतात. सुदैवाने महामंडळातील कर्मचाऱ्यांना जून २०२५ च्या वेतनापासून मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात आली. दरम्यान 87 हजार एसटी कर्मचाऱ्यांचा 1 हजार कोटींचा महागाई भत्ता थकीत आहे. एसटी कर्मचाऱ्याचा खर्चाला लागणारी सर्व वेतन सरकार देईल असं सरकारने हायकोर्टात मान्य केलं होतं, मात्र अद्याप असं काही घडलं नाही, सरकार सवलीतीची प्रतिकृती करत आहे, असा आरोप श्रीरंग बरगे यांनी केला.

ST Bus : एसटीची ‘लवचिक भाडे’ योजना सुरू, तिकीट दरात 15 टक्के सवलत

एसटी चालक वाहकांची संख्या अपुरी

एसटी महामंडळात चालकांची संख्या 6747 ने कमी आहे तर वाहकांची संख्याबळ 3730 ने कमी आहे. एसटी महामंडळात प्रशासकीय कर्मचारी, वाहक ,चालक 29361 कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. असे असताना देखील महामंडळच्या २९ हजार जागा रिक्त आहेत. महामंडळीतील या जागांवर भरती काढली तर एसटीमध्ये रोजगार उपलब्ध होईल तसेच एसटी महामंडळाचा आणि कर्मचाऱ्यांवरचा ताण थोडाफार का होईना कमी होईल.

आर्थिक पिळकवणूक होतेय का?

महाभाई भत्ता हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही मिळाला पाहिजे. महागाई भत्ता मिळतो पण विलंबाने दिला जातो आणि त्यामधील फरक मात्र दिलाच जात नाही. एसटीचा कर्मचारी हा कर्जबाजारी आहे. एसटी कर्मचाऱ्यांची नोकरी जास्त जोखिमीची आहे. एसटी कर्मचारी आणि शासकीय वाहन चालकांच्या पगारीची तुलना केल्यास, दोघांमध्ये बरीच तफावत आढळून येते.

महामंडळाची अवस्था खिळखिळी…

एसटी महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ तरी करावी किंवा सरकारने त्यांच्या खात्यातून पैसे द्यावे…जरी एसटी ना नफा ना तोटावर चालवली जात असली तरी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यायची झाली का मात्र महामंडळाचा तोटा आड येतो. महाभाई भत्ता सरकार देत नाही. तर दुसरीकडे वेतनवाढीचा फरक २३१८ कोटींचा आहे. एकंदरित सरकारची आणि एसटी प्रशासनाची ही दुहेरी भूमिका आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होताना दिसत आहे. यावर कायस्वरुपीचा तोडगा काढला पाहिजे. एकंदरित जुन्या एसटीच्या गाड्या खिळखिळत झाल्या आहेत, तसं एसटी महामंडळाचं व्यवस्थापन खिळखिळीत झालं आहे.

कर्मचाऱ्यांचे पैसे व्यवस्थापन चोरतं…

गेल्या सात आठ महिने परिवहनमंत्र्यांचे घोषणा करण्यामध्येच गेले, आता उत्पन्ना वाढीचा विचार केला पाहिजे. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना दिलाच पाहिजे. सरकारने कर्मचाऱ्यांची देणगी दिली पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देताना विलंब करतात आणि नंतर मधला फरक देत नाही. एकंदरित कर्मचाऱ्यांचे पैसे चोरत आहे, असा थेट आरोप श्रीरंग बरगे यांनी महामंडळावर केला आहे.

वेतनवाढ होणार का?

येत्या काही दिवसात दिवाळी हा सण येत आहे. अशातच एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळेल का? जर एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली तरच महामंडळाचे उत्पन्न वाढू शकते. अपुरी संख्याबळमुळे कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. एसटी महामंडळात अधिकार वर्ग आहे जो चांगला नाही, बहुतांशी कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक दिली जाते. अगदी छोट्या कामासाठी ही चार्जशीट दिली जाते. अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही मग एसटी कर्मचाऱ्यांवर का? गणेशोत्सव काळात एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढ होईल अशी अपेक्षा होती, मात्र सप्टेंबर १ ते १० सप्टेंबर २८ कोटी ६३ लाखांचं उत्पन्न एसटी महामंडळाला मिळालं. साधारण साडे चार कोटींच तफावत आहे. अपेक्षित उत्त्पन मिळत नाही..

घोषणा फक्त कागदावरच…

२४६० गाड्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार होत्या मात्र अद्याप २३४७ बस महामंडळात दाखल झाल्या आहेत. अजूनही वीजेवरच्या गाड्या आल्या नाहीत. दरवर्षी पाच हजार एसटी बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार अशी घोषणा एकनाथ शिंदे परिवहन मंत्री असताना केली होती, मात्र आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या काळात २४६० गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आता केवळ चार महिने शिल्लक आहेत, असे असताना पाच हजार गाड्या दाखल होतील का, अशी शंका श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली.

St Bus : ८३ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती पगार येणार

Web Title: Maharashtra st employees congress general secretary shrirang barge on msrtc st bus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 01:09 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • Shrirang Barge
  • st bus

संबंधित बातम्या

ई-वाहनांना मिळतीये टोलमाफी; एसटीला होतोय फायदा, महिन्याला सव्वा कोटींची होणार बचत
1

ई-वाहनांना मिळतीये टोलमाफी; एसटीला होतोय फायदा, महिन्याला सव्वा कोटींची होणार बचत

एकदाची Tesla कारची झाली डिलिव्हरी ! ‘या’ मंत्र्याच्या हातात पडली पहिल्या Model Y ची चावी
2

एकदाची Tesla कारची झाली डिलिव्हरी ! ‘या’ मंत्र्याच्या हातात पडली पहिल्या Model Y ची चावी

Pune News: एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण; ‘इतक्या’ जणांना मिळाली पदोन्नती
3

Pune News: एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण; ‘इतक्या’ जणांना मिळाली पदोन्नती

Pratap Sarnaik : ठाणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोची भेट मिळण्याची शक्यता
4

Pratap Sarnaik : ठाणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोची भेट मिळण्याची शक्यता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Exclusive : ‘फाटलेली आसनं, तुटलेले पत्रे….! खिळखिळ्या बसप्रमाणेच महामंडळाचीही अवस्था…’, श्रीरंग बरगे यांचा आरोप

Exclusive : ‘फाटलेली आसनं, तुटलेले पत्रे….! खिळखिळ्या बसप्रमाणेच महामंडळाचीही अवस्था…’, श्रीरंग बरगे यांचा आरोप

संचमान्यता केली जाणार जुन्याच नियमानुसार; शालेय शिक्षण विभागाने घेतली पुन्हा एकदा माघार

संचमान्यता केली जाणार जुन्याच नियमानुसार; शालेय शिक्षण विभागाने घेतली पुन्हा एकदा माघार

दीर्घकाळ Kiss करणे ओठांवर पडू शकते भारी, इंटरनेटवर का घेतला जातोय Deep Kissing उपायांचा जास्त शोध?

दीर्घकाळ Kiss करणे ओठांवर पडू शकते भारी, इंटरनेटवर का घेतला जातोय Deep Kissing उपायांचा जास्त शोध?

NATO Article 4 : सीमेवर 40 हजार सैनिक तैनात, मोठ्या आपत्तीचे संकेत; रशिया-पोलंड वादामुळे आंतरराष्ट्रीय तणाव तीव्र

NATO Article 4 : सीमेवर 40 हजार सैनिक तैनात, मोठ्या आपत्तीचे संकेत; रशिया-पोलंड वादामुळे आंतरराष्ट्रीय तणाव तीव्र

Solapur : महापालिका आयुक्तांचा गुडघाभर पाण्यात उभं राहून बाधित भागांना दौरा

Solapur : महापालिका आयुक्तांचा गुडघाभर पाण्यात उभं राहून बाधित भागांना दौरा

मराठा आरक्षणाची मागणी संपवण्यासाठी सरकारचा डाव – लाखेपाटील

मराठा आरक्षणाची मागणी संपवण्यासाठी सरकारचा डाव – लाखेपाटील

Ahmednagar Railway Station: अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, स्थानिकांच्या मागणीला सरकारची मान्यता

Ahmednagar Railway Station: अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, स्थानिकांच्या मागणीला सरकारची मान्यता

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan News : KDMC मधील २७ गावांचा निवडणुकीला विरोध

Kalyan News : KDMC मधील २७ गावांचा निवडणुकीला विरोध

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचा मोठा निर्णय; AI च्या माध्यमातून भाविकांवर सीसीटीव्हीद्वारे नजर

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचा मोठा निर्णय; AI च्या माध्यमातून भाविकांवर सीसीटीव्हीद्वारे नजर

Kolhapur : शैक्षणिक कर्ज घेऊन शेतकरी पुत्राचा डंका,भारत सरकारकडूनही मिळाली मान्यता

Kolhapur : शैक्षणिक कर्ज घेऊन शेतकरी पुत्राचा डंका,भारत सरकारकडूनही मिळाली मान्यता

जबरदस्त ऑफर! जिओ या प्लॅनसह देत आहे एक्स्ट्रा मोबाइल डेटा मोफत, 20GB पर्यंत वापरू शकता जास्त इंटरनेट; जाणून घ्या सविस्तर

जबरदस्त ऑफर! जिओ या प्लॅनसह देत आहे एक्स्ट्रा मोबाइल डेटा मोफत, 20GB पर्यंत वापरू शकता जास्त इंटरनेट; जाणून घ्या सविस्तर

Parbhani News : ग्रामपंचायतीच्या दारूबंदी ठरावनंतरही खुलेआम दारू विक्री होत असल्याने दिला इशारा

Parbhani News : ग्रामपंचायतीच्या दारूबंदी ठरावनंतरही खुलेआम दारू विक्री होत असल्याने दिला इशारा

Nashik News : चांदवड नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपट्टी बिलांची शिवसेनेने केली होळी

Nashik News : चांदवड नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपट्टी बिलांची शिवसेनेने केली होळी

Amravati News : अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा जनसुरक्षा विधेयकाला कडवा विरोध! ‪

Amravati News : अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा जनसुरक्षा विधेयकाला कडवा विरोध! ‪

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.