• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • National Brothers Day Celebrating The Bond Between Brothers And Sisters

National Brother’s Day : भाऊ म्हणजे बहिणींचा आधारस्तंभ; जाणून घ्या राष्ट्रीय बंधू दिनाचा इतिहास आणि महत्त्व

National Brother's Day : बंधू हा शब्द उच्चारताच डोळ्यांपुढे येतो तो एक असा चेहरा जो संकटाच्या क्षणी नेहमी आपल्या पाठीशी असतो. आपल्या जीवनातील अनेक वळणांवर मार्गदर्शक ठरणारा भाऊ म्हणजे बहिणींसाठी आधारस्तंभ असतो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 24, 2025 | 09:10 AM
National Brother's Day Celebrating the bond between brothers and sisters

राष्ट्रीय बंधू दिन २०२४ : भाऊ म्हणजे आधारस्तंभ; जाणून घ्या या खास दिवसामागचा इतिहास आणि महत्त्व ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

National Brother’s Day : बंधू हा शब्द उच्चारताच डोळ्यांपुढे येतो तो एक असा चेहरा जो संकटाच्या क्षणी नेहमी आपल्या पाठीशी असतो. आपल्या जीवनातील अनेक वळणांवर मार्गदर्शक ठरणारा भाऊ म्हणजे बहिणींसाठी आधारस्तंभ असतो. याच बंधुत्वाच्या नात्याला समर्पित असलेला राष्ट्रीय बंधू दिन (National Brother’s Day) दरवर्षी २४ मे रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे भावाला आपल्या प्रेमाची आणि कृतज्ञतेची जाणीव करून देणे. आपल्या आयुष्यात त्याच्या असण्याने जी भरभराट होते, त्याच्या अष्टपैलू भूमिकांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

बंधू दिनाचा इतिहास

राष्ट्रीय बंधू दिनाची सुरुवात २००५ साली अमेरिकेत झाली. अलाबामा येथील सी. डॅनियल रोड्स या लेखक आणि कलाकाराने या दिवसाची संकल्पना मांडली. त्यांच्या मते, भावांनी समाजासाठी आणि कुटुंबासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांचे कौतुक करणे आवश्यक आहे. तेव्हापासून २४ मे हा दिवस ‘ब्रदर्स डे’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

सुरुवातीला अमेरिकापुरता मर्यादित असलेला हा सण आज अनेक देशांमध्ये, विशेषतः भारत, रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि जर्मनीतही साजरा केला जातो. अनेक वेळा लोक १० एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय भावंड दिनाला बंधू दिन समजून गोंधळ करतात. पण या दोन्ही दिवसांचा उद्देश वेगळा आहे. भावंड दिन हा भाऊ-बहिणींना समर्पित असून, बंधू दिन केवळ भावांच्या नात्याचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची तिहेरी जबाबदारी; रशियाची लज्जास्पद भूमिका आणि चीनचा पाकिस्तानला पडद्यामागून पूर्ण पाठिंबा

बंधू दिनाचे महत्त्व

भाऊ म्हणजे केवळ रक्ताचे नाते नव्हे. तो मित्र, सल्लागार, मार्गदर्शक आणि आनंदाचा भागीदार असतो. अनेक वेळा जीवनात चुलत भाऊ, मित्र, नातेवाईक किंवा अगदी एखादा जवळचा सहकारीही भावासारखा वाटतो. जो संकटाच्या वेळी पाठीशी उभा राहतो, आपल्या भावना समजतो आणि आपल्या यशात आनंद मानतो तोच खरा भाऊ. या दिवशी अनेकजण आपल्या भावाला भेटवस्तू देतात, एखादी खास वेळ घालवतात, त्याला पत्र लिहतात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करतात. यामागील हेतू एकच  भावाला हा दिवस खास वाटावा.

National Brother's Day Celebrating the bond between brothers and sisters

राष्ट्रीय बंधू दिन २०२४ : जाणून घ्या या खास दिवसामागचा इतिहास आणि महत्त्व ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

बंधूचे स्थान आयुष्यात अमूल्य

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात किमान एक असा भाऊ असावा, ज्याच्यावर तो पूर्ण विश्वास ठेवू शकतो. भावासोबत जीवनातील चढ-उतार शेअर करता येतात, संकटाच्या वेळी आधार घेता येतो आणि आनंदाच्या क्षणी हास्यविनोदात रममाण होता येते. बंधुत्व हे केवळ जन्माने जुळलेले नसते, तर ते अनुभवांनी घडते. भावाच्या रूपाने जीवनाला मिळणारा आधार हा अनेक नात्यांहून श्रेष्ठ ठरतो. त्यामुळे राष्ट्रीय बंधू दिन ही केवळ औपचारिकता न राहता, आपल्या भावाशी असलेल्या नात्याचे बंध अधिक दृढ करणारी एक सुंदर संधी आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जर हार्वर्डमधील राहायचे असेल तर! भारतीयांसह परदेशी विद्यार्थ्यांना 72 तासांच्या आत पूर्ण कराव्या लागणार ‘या’ 6 अटी

राष्ट्रीय बंधू दिन

आजच्या धकाधकीच्या युगात अनेक वेळा आपण आपल्या जवळच्या माणसांना वेळ देऊ शकत नाही. राष्ट्रीय बंधू दिन ही संधी आहे आपल्या भावाशी मनमोकळा संवाद साधण्याची, त्याच्या आयुष्यातील स्थान अधोरेखित करण्याची. आजच्या या २४ मेच्या दिवशी, आपल्या भावाला एक फोन करा, एक मिठी द्या किंवा एक पत्र लिहा. त्याला सांगा की, तो तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे – कारण भाऊ हा आयुष्यातला तो आधार आहे जो अनेक वेळा शब्दांशिवाय आपल्यासाठी सर्वस्व अर्पण करतो.

Web Title: National brothers day celebrating the bond between brothers and sisters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 08:56 AM

Topics:  

  • Brothers
  • day history
  • special story

संबंधित बातम्या

World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत…  मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!
1

World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत… मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी
2

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

Independence Day 2025: नेताजींना वाचवण्यासाठी पतीची हत्या, पुढे सेल्युलर जेलमध्ये स्तन कापून काढले! कथा पहिल्या महिला गुप्तहेराची
3

Independence Day 2025: नेताजींना वाचवण्यासाठी पतीची हत्या, पुढे सेल्युलर जेलमध्ये स्तन कापून काढले! कथा पहिल्या महिला गुप्तहेराची

‘हा’ खास दिवस म्हणजे ‘Greatness University’ पासून ‘World Book of Greatness’ पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
4

‘हा’ खास दिवस म्हणजे ‘Greatness University’ पासून ‘World Book of Greatness’ पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
15 हजार पगार असून देखील ‘ही’ बाईक आरामात खरेदी कराल, दरमहा फक्त असेल 2 हजार EMI

15 हजार पगार असून देखील ‘ही’ बाईक आरामात खरेदी कराल, दरमहा फक्त असेल 2 हजार EMI

सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा जाणवतो? मग उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, कायमच राहाल फ्रेश आणि हेल्दी

सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा जाणवतो? मग उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, कायमच राहाल फ्रेश आणि हेल्दी

मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.