पंचायती राज म्हणजे काय? पंतप्रधान मोदी आज 'या' व्यक्तींना करणार पुरस्कार प्रदान ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली / मधुबनी : भारतातील लोकशाही व्यवस्थेचा खरा आधार असलेल्या पंचायती राज संस्थांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी २४ एप्रिल रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय पंचायती राज दिन (NPRD) यंदा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. १९९२ साली संविधानात करण्यात आलेल्या ७३ व्या दुरुस्तीच्या अंमलबजावणीचा हा ३२ वा वर्धापन दिन आहे.
या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील झांझरपूर ब्लॉकच्या लोहना उत्तर ग्रामपंचायतीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. यावेळी ते देशभरातील पंचायती राज संस्थांना संबोधित करतील आणि राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ वितरित करतील.
पंचायती राज संस्थांचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे स्थानिक पातळीवर लोकसहभाग सुनिश्चित करून विकासात्मक निर्णय घेणे. गाव ते जिल्हा पातळीपर्यंत त्रिस्तरीय रचना – ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद – यांच्यामार्फत ही व्यवस्था प्रभावीपणे कार्यरत आहे. १९९३ साली लागू झालेल्या ७३ व्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायती राज संस्थांना संवैधानिक मान्यता मिळाली आणि नियमित निवडणुका, आरक्षण, आर्थिक स्वायत्तता, तसेच राज्य निवडणूक आयोग आणि राज्य वित्त आयोगाची निर्मिती ही महत्त्वाची पावले उचलण्यात आली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रशियाला मिळाला पुतिनचा उत्तराधिकारी? समोर आला व्लादिमीरचा 10 वर्षांचा गुप्त वारसदार
राष्ट्रीय पंचायती राज दिवस 2025 के अवसर पर आज माननीय प्रधानमंत्री बिहार के मधुबनी में आयोजित कार्यक्रम में भाग लेंगे। इस अवसर पर वे उत्कृष्ट प्रदर्शन करने वाली पंचायतों को सम्मानित करने के लिए राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 प्रदान करेंगे।
आज माननीय प्रधानमंत्री कई अहम विकास… pic.twitter.com/obQV3BwjEs
— Ministry of Panchayati Raj, Government of India (@mopr_goi) April 23, 2025
credit : social media
या वर्षी राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात विशेष श्रेणी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, ज्यांचा उद्देश हवामान कृती, स्वावलंबन, व क्षमताविकास क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेणे हा आहे. या पुरस्कारांचे वितरण २४ एप्रिल रोजी लोहना उत्तर ग्रामपंचायतीत करण्यात येणार आहे.
क्लायमेट ॲक्शन स्पेशल पंचायत पुरस्कार (CASPA):
रँक १: दव्वा एस ग्रामपंचायत, गोंदिया, महाराष्ट्र
रँक २: बिरदहल्ली, हसन, कर्नाटक
रँक ३: मोतीपूर, समस्तीपूर, बिहार
आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार (ANPSA):
रँक १: मॉल, रंगारेड्डी, तेलंगणा
रँक २: हातबदरा, मयूरभंज, ओडिशा
रँक ३: गोल्लापुडी, कृष्णा, आंध्र प्रदेश
पंचायत क्षमता बांधणी सर्वोत्तम संस्था पुरस्कार (PKNSSP):
रँक १: केरळ इन्स्टिट्यूट ऑफ लोकल ॲडमिनिस्ट्रेशन (KILA)
रँक २: राज्य ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था, ओडिशा
रँक ३: राज्य पंचायत व ग्रामीण विकास संस्था, आसाम
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पहलगाम हल्ल्यामागे TRFचे ‘फाल्कन स्क्वॉड’ असल्याचा दावा; भविष्यात काश्मीरसाठी बनू शकते डोकेदुखी
प्रत्येक पुरस्कार क्रमांकानुसार १ कोटी, ७५ लाख आणि ५० लाख रुपयांचे रोख प्रोत्साहन, प्रमाणपत्र आणि खास डिझाइन केलेल्या ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहेत. विशेषतः ३ पुरस्कार विजेता ग्रामपंचायती महिला सरपंचांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत, ज्यामुळे महिलांचे नेतृत्व ग्रामीण भागात प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट होते.
लोकशाहीची खरी शक्ती ग्रामस्वराज्याचा पाया
राष्ट्रीय पंचायती राज दिनाचा उद्देश स्थानिक स्वराज्याच्या मूल्यांची जनजागृती, पंचायत प्रतिनिधींना सन्मान आणि ग्रामीण विकासातील योगदानाचे कौतुक करण्याचा आहे. हे एक मंच आहे जिथे देशाच्या विकासात खऱ्या अर्थाने सहभागी ठरणाऱ्या गावकऱ्यांना आणि स्थानिक नेत्यांना मान्यता दिली जाते. पंचायती राज संस्थांचे बळकटीकरण म्हणजे लोकशाहीची मूळ रचना अधिक दृढ करणे, आणि राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या निमित्ताने हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित होतो. यंदाचा दिवस, केवळ पुरस्कारांचा नव्हे तर ग्रामीण भागाच्या प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.