रशियाला मिळाला पुतिनचा उत्तराधिकारी? समोर आला व्लादिमीरचा १० वर्षांचा गुप्त वारसदार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच गूढतेने वेढलेले असते. आता त्यांच्या कथित मोठ्या मुलाच्या काही नव्या छायाचित्रांमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. सोशल मीडियावर आणि काही विदेशी माध्यमांतून समोर आलेल्या माहितीनुसार, पुतिन यांचा १० वर्षांचा मुलगा इव्हान आता सार्वजनिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याच्या जन्मापासूनच तो खाजगी जीवन जगत असून, आता त्याला पुतिन यांचा भावी उत्तराधिकारी मानले जात आहे.
२०१५ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये जन्मलेला इव्हान हा व्लादिमीर पुतिन आणि त्यांची कथित मैत्रीण, माजी जिम्नॅस्ट अलिना काबाएवा यांचा मुलगा असल्याचे बोलले जात आहे. या जोडीबाबतचा अधिकृत खुलासा कधीच झालेला नाही, मात्र अनेक जागतिक माध्यमांनी यावर बोट ठेवले आहे. इव्हानचा जन्म अत्यंत गुप्तपणे झाला असून, त्याचे संगोपनही प्रसिद्धीपासून दूरच ठेवले गेले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पहलगाम हल्ल्यामागे TRFचे ‘फाल्कन स्क्वॉड’ असल्याचा दावा; भविष्यात काश्मीरसाठी बनू शकते डोकेदुखी
‘First pictures of Vladimir Putin’s secret son Ivan, 10′ hidden from Russianshttps://t.co/MmBWAO844L pic.twitter.com/dNU9xyY8ns
— The Mirror (@DailyMirror) April 22, 2025
credit : social media
अहवालानुसार, इव्हान मॉस्कोमध्ये शिक्षण घेत आहे. तो इंग्रजी आणि रशियन भाषा शिकतो, तसेच त्याला जिम आणि पोहण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. इव्हान सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहत असून, केवळ काही खास प्रसंगीच तो घराबाहेर पडतो. टेलिग्राम चॅनल VChK-OGPU ने शेअर केलेल्या एका फोटोत इव्हान आणि अलिना एकत्र दिसत आहेत. या फोटोंनी पुतिन यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगविल्या आहेत. मात्र क्रेमलिनने या दाव्यांबाबत कुठलाही अधिकृत खुलासा किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही.
वयाच्या ७२ व्या वर्षी असलेले पुतिन हे रशियाचे सर्वात शक्तिशाली आणि दीर्घकाळ कार्यरत असलेले राष्ट्रप्रमुख आहेत. रशियाच्या विद्यमान संविधानानुसार, पुतिन आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष राहू शकतात, मात्र त्यांच्या कार्यकाळानंतर नेतृत्वाची सूत्रे कोणाकडे जातील, याबाबत सध्या गोंधळाचे वातावरण आहे. अशातच, इव्हानला भावी राष्ट्राध्यक्ष म्हणून तयार केले जात आहे का? हा प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. डॉसियर सेंटरच्या अहवालानुसार, इव्हानच्या जन्मावेळी पुतिन अत्यंत आनंदी होते आणि त्यांनी आपल्या मित्रमंडळींसमोर हा आनंद साजरा केला होता. इव्हानचे चेहरेपट्टीचे वैशिष्ट्यही लहानपणीच्या पुतिनसारखेच असल्याचे निरीक्षण अनेकांनी नोंदवले आहे.
इव्हान व्यतिरिक्त, पुतिन यांचा एक ६ वर्षांचा दुसरा मुलगा देखील असल्याचा दावा करण्यात आला आहे. या मुलाचे नाव ‘पुतिन ज्युनियर’ असल्याचे बोलले जात आहे. मात्र या दाव्यांबाबतही कोणतीही अधिकृत पुष्टी नाही.
विश्लेषकांच्या मते, इव्हानबाबत रशियाच्या संविधानात भविष्यात विशेष तरतूद केली जाऊ शकते, ज्यायोगे तो राष्ट्राध्यक्ष पदासाठी पात्र ठरेल. पुतिन यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची ही तयारी गुप्तपणे सुरु असल्याचे संकेत काही गुप्त अहवालांमधून मिळत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानला ‘बालाकोट 2.0’ ची भीती; भारतीय सीमेवर AEW&C विमानांची तैनाती, हाय अलर्ट घोषित
व्लादिमीर पुतिन यांचे आयुष्य कायमच रहस्यमय राहिले आहे. आता त्यांच्या कथित मुलगा इव्हानची चर्चा होत असली, तरी ही माहिती अधिकृतदृष्ट्या पुष्टी झालेली नाही. मात्र रशियाच्या राजकारणात व पर्यायाने जगभरात या ‘गुप्त वारसदाराची’ चर्चा भविष्यात आणखी गडद होण्याची शक्यता आहे.