फोटो सौजन्य: iStock
लंडन: निसर्गात अनेक विविध पक्षी, प्राणी आढळतात. बरेच पक्षी, प्राणी आपल्याला माहितही नसतील. प्रत्येक प्राण्याचे काही वैशिष्ट्ये असतात. असाच एक प्राणी हिप्पोपोटॅमस (पाणघोडा) ज्याचे एक आश्चर्यचकित करणारे वैशिष्ट समोर आले आहे. हिप्पोपोटॅमस गोंडस दिसत असले तरी अतिशय धोकादायक प्राणी आहेत. ते इतके अप्रत्याशित आहेत की ते कधी हल्ला करतील हे आपल्याला कळणार नाही. नर हिप्पोचे वजन 1500 ते 1800 किलो असते, तर मादी हिप्पोचे वजन 1300-1500 किलो असते. इतके वजनदार असूनही, हिप्पो उडू शकतात! असा दावा इंग्लंडमधील एका विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.
फोर्ब्सच्या अहवालानुसार, लंडन युनिव्हर्सिटीच्या रॉयल व्हेटर्नरी कॉलेजच्या संशोधकांनी नुकतेच हिप्पोवर (फ्लाइंग हिप्पो रिसर्च) संशोधन केले आहे. या संशोधनात त्यांना हिप्पो देखील उडू शकतो असा निष्कर्ष समोर आला आहे. पण ते इतर पक्ष्यांप्रमाणे उंच भरारी घेऊ शकत नाहीत. संशोधकांना असे आढळून आले की जेव्हा हिप्पो वेगाने धावतात तेव्हा काहीवेळा असे घडते की त्यांचे चारही पाय हवेतच राहतात. हिप्पो तासाला ३० किलोमीटर वेगाने धावू शकतात.
हिप्पोबद्दल शास्त्रज्ञांचा मोठा दावा
हे संशोधन इंग्लडमधील रॉयल व्हेटर्नरी कॉलेजमधील उत्क्रांती बायोमेकॅनिक्सचे प्राध्यापक जॉन हचिन्सन आणि पशुवैद्यकीय विद्यार्थिनी एमिली प्रिंगल यांनी केले आहे. त्यांनी फ्लेमेन्गो लँड रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या हिप्पोंच्या हालचालींची नोंद केली. त्यांनी एकूण 32 हिप्पोच्या 169 प्रकारच्या हालचाली रेकॉर्ड केल्या. याशिवाय प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या दोन हिप्पोच्या हालचालींचीही नोंद त्यांनी केली. प्राध्यापकांनी सांगितले की हिप्पोच्या हालचालींवर पुरेसे काम केले गेले नाही जेणेकरुन त्याच्या आधारावर संशोधन केले जाऊ शकेल.
हिप्पो धावत असताना हवेत राहतात!
संशोधनात असे आढळून आले आहे की हत्ती आणि गेंडे हळू चालतात आणि उडी मारून वोगाने धावतात. तर हिप्पो उडी मारून धावतात. पण धावताना चारही पाय हवेत उचलणे हे त्याच्या चालीचे वैशिष्ट्य आहे. हवेत राहण्याच्या या कलेला फक्त उडी मारणे म्हणता येणार नाही. त्यांची हालचाल इतर प्राण्यांपेक्षा खूपच वेगळी आहे. त्यामुळेच हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. संशोधनात असे म्हटले आहे की ते इतक्या वेगाने धावतात की जणू ते उडत आहेत.