फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सद्भावना दिवस 2024: भारतात दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी सद्भावना दिन साजरा केला जातो. आपल्या देशाचे सातवे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती आहे. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी सद्भावना दिन साजरा करण्यात येतो. देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर 1992 मध्ये काँग्रेसने राजीव गांधी सद्भावना पुरस्काराची स्थापना केली होती. हा दिवस राष्ट्रीय सद्भावना आणि सांप्रदायिक मैत्री वाढवण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊया त्याचा इतिहास आणि महत्त्व.
आपण सद्भावना दिवस का साजरा करतो?
इंग्रजीत ‘सद्भावना’ या शब्दाचा अर्थ ‘सुसंवाद’ असा होतो. राजीव गांधी हे देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. विकसित राष्ट्राचे त्यांचे स्वप्न होते. ज्याचे नेतृत्व त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांतून केले. विविध धर्म आणि भाषांच्या लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सांप्रदायिक संबंध वाढवणे असे त्यांचे ध्येय होते. हा दिवस भारतातील सर्व जाती, पंथ आणि धर्माच्या लोकांमध्ये दीर्घकालीन शांतता आणि सांप्रदायिक संबंधाला प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो. यंदाच्या वर्षी सद्भावना दिनानिमित्त विविधतेचा स्वीकार करणे, मतभेदांचा आदर करणे आणि राष्ट्र उभारणीच्या समान उद्दिष्टासाठी एकत्र काम करणे याच्या महत्त्वाच्या गोष्टींवर भर दिला जात आहे.
सद्भावना दिनाचा इतिहास
राजीव गांधी 1984 ते 1989 पर्यंत भारताचे पंतप्रधान झाले. देशाच्या आधुनिकीकरणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी ते ओळखले जातात. राजीव गांधींच्या कारकिर्दीत शिक्षण, शांतता आणि तंत्रज्ञान सुधारण्याचे उपक्रम राबविण्यात आले. अनेक अडथळ्यांवर मात करून त्यांनी जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यावर भर दिला. त्यांच्या समर्पणाचा प्रभाव बराच काळ टिकला. सद्भावना दिवसाची स्थापना राजीव गांधींच्या मूल्यांना जपण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी करण्यात आली.
या दिवशी देशभरातील नागरिक शपथ घेतात
“मी शपथ घेतो की, मी जात, धर्म, प्रदेश किंवा भाषा यांचा विचार न करता भारतातील सर्व लोकांच्या भावनिक ऐक्यासाठी आणि एकोप्यासाठी काम करीन. तसेच मी हिंसाचाराचा अवलंब न करता संवाद आणि घटनात्मक मार्गाने इतरांशी असलेले सर्व मतभेद दूर करीन.”
राजीव गांधी राष्ट्रीय ‘सद्भावना’ पुरस्कार
हा पुरस्कार दरवर्षी अशा व्यक्तींना दिला जातो ज्यांनी शांतीची भावना समजून घेण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. आतापर्यंत लता मंगेशकर, शुभा मुदगल, सुनील दत्त, अमजद अली खान, मोहम्मद अझरुद्दीन, गोपालकृष्ण गांधी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराची स्थापना पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सन्माणार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अखिल भारतीय संसदीय आयोगाने 1992 मध्ये केली होती.