मानवतेचे खरे हितचिंतक म्हणून ओळखले जाणारे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २० डिसेंबरचा इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारत ही संताची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत एकनाख, संत कबीर, संत गाडगे महाराज यांसारखे अनेक संत आपल्या भूमीला स्पर्थ करुन गेले. ज्यांनी अध्यात्मिक आणि समाजिगक सुधारणा घडवून आणल्या ज्यामुळे आपल्या देशाला शाश्वत ओळख मिळाली, यातीलच मानवतेचे खरे हितचिंतक म्हणून मानले जाणारे संत गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. डेबूजी झिंगारजी जानोरकर म्हणजेच बाबा गाडगे. त्यांचा जन्म २३ फ्रेब्रुवारी १८७६ रोजी महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी येथील शेडगावर कुटुंबात झाला होता. पायता फाटकी चप्पल, डोक्यावर मातीची वाटी घेऊन ते पायी प्रवास करायचे, अशी त्यांची ओळख होती. स्वच्छता अभियानाअंतर्गत प्रत्येक गाव स्वच्छ करण्याची जबाबादारी बाबा गाडगेंनी घेतली होती.
20 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
1924 : ॲडॉल्फ हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.
1945 : मुंबई-बेंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू झाली.
1971 : झुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानचे चौथे राष्ट्रपती बनले.
1994 : राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांनी मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथिर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान केला.
1995 : नाटोने बोस्नियामध्ये शांतता राखण्यास सुरुवात केली.
1999 : पोर्तुगालने मकाऊ बेट चीनला परत केले.
2010 : ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ आणि समीक्षक अशोक केळकर, यांना प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2019 : युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स ही 1947 पासून युनायटेड स्टेट्स सशस्त्र दलाची पहिली नवीन शाखा बनली.
पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा वाढदिवस; जाणून घ्या19 डिसेंबरचा इतिहास
20 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
1868 : ‘हार्वे फायरस्टोन’ – फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 7 फेब्रुवारी 1938)
1890 : ‘जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की’ – नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 27 मार्च 1967)
1901 : ‘रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ’ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जानेवारी 1967)
1909 : ‘वक्कम मजीद’ – भारतीय पत्रकार आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 10 जुलै 2000)
1940 : ‘यामिनी कृष्णमूर्ती’ – पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका यांचा जन्म.
1942 : ‘राणा भगवानदास’ – पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश यांचा जन्म.
1945 : ‘शिवकांत तिवारी’ – भारतीय वकील यांचा जन्म. (मृत्यू : 26 जुलै 2010)
20 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष
1731 : ‘छत्रसाल बुंदेला’ – बुंदेलखंडचे महाराजा यांचे निधन. (जन्म : 4 मे 1649)
1915 : ‘उपेंद्रकिशोर रे’ – भारतीय चित्रकार आणि संगीतकार यांचे निधन. (जन्म : 12 मे 1863)
1933 : ‘विष्णू वामन बापट’ – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक यांचे निधन. (जन्म : 22 मे 1871)
1956 : ‘संत गाडगे महाराज’ – यांचे निधन. (जन्म : 13 फेब्रुवारी 1876)
1971 : ‘रॉय ओ. डिस्ने’ – द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 24 जून 1893)
1993 : ‘वामन नारायण भट’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार यांचे निधन.
1996 : ‘कार्ल सगन’ – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक यांचे निधन. (जन्म : 9 नोव्हेंबर 1934)
1996 : ‘दगडू मारुती पवार’ – बलुतं कार दलित लेखक यांचे निधन. (जन्म : 15 सप्टेंबर 1935)
1998 : ‘बंगळुरू वेंकट रमण’ – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1912)
2001 : ‘लेओपोल्ड सेडर सेन्घोर’ – सेनेगलचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म : 9 ऑक्टोबर 1906)
2010 : ‘नलिनी जयवंत’ – अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 18 फेब्रुवारी 1926)
2010 : ‘सुभाष भेंडे’ – लेखक यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 1936)
2024 : ‘ओम प्रकाश चौटाला’ – हरियाणाचे 7 वे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 1 जानेवारी 1935)
भारताला पहिला कसोटी सामना जिंकवून देणारे विजय हजारे यांचा मृत्यू; जाणून घ्या 18 डिसेंबरचा इतिहास






