आज आहे World Computer Literacy Day ; जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस? आणि त्याचे महत्व (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या जग वेगाने बदलत चालले आहे. आपण AI क्रांतीच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहोत. काळ पूर्णपणे डिजिटल झाला असून रोजच्या दैनंदिन जीवनातील कामे, बँकिग पासून ते आरोग्य सेवांपर्यंत शिक्षणापासून ते मनोरंजनापर्यंत सर्व डिजिटल स्वरुपात झाले आहे. यासाठी कप्युटरचे ज्ञान असणे अत्यावश्यक झाले आहे. आता केवळ कप्युटरचे ज्ञान असणे महत्त्वाचे नाही, तर त्याचे कौशल्य टिकून ठेवणे, त्यामध्ये प्रगती करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच दरवर्षी २ डिसेंबरला जागतिक संगणक साक्षरता दिवस (World Computer Literacy Day) साजरा केला जातो. आज आपण या निमित्त याचे महत्व आणि याचा उद्देश जाणून घेणार आहोत.
जागतिक संगणक सारक्षता दिवस हा सर्वप्रथम २ डिसेंबर २००१ मध्ये साजरा करण्यात आला होता. NIIT च्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त याची सुरुवात करण्यात आली. शिवाय आजच्या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या संसदेत सदस्यांना संगणकाचे शिक्षण देण्यात आले होते. या दिनाचा उद्देश केवळ एखाद्या देशालाच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत लोकांना संगणक साक्षर बनवणे होता. याच हेतूने या दिनाची सुरुवात करण्यात आली होती. यामुळेच आज प्रत्येक व्यक्ती ही संगणक साक्षर असून तिचे सर्व कामे डिजिटल रुपात आणि अतिशय सोप्या भाषेत समजून घेऊन करु शकते.
याचा उद्देश देशातील प्रत्येक लोकांपर्यंत डिजिटल संसाधने पोहोचवणे आणि त्यांना कौशल्यपूर्ण विकासासाठी ज्ञान देणे आहे. लोकांना संगणक साक्षरतेमुळे IT, ई-कॉमर्स, फ्रीलांन्सिंग, डिजिटल मार्केटिंग अशा क्षेत्रांमध्ये आज रोजगार उपलब्ध होत आहे. या दिनामुळे जगभरात डिजिटल दृष्ट्या सक्षम समाजाची निर्मित होत आहे. ज्याचा फायदा प्रत्येक देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
दरवर्षी या जागतिक संगणक साक्षरता दिनानिमित्त एक उद्देश ठरवण्यात येतो. यंदा हा दिन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे सध्याच्या डिजिटल युगात लोकांना कप्युटर साक्षरतेचे महत्व अधोरेखित करणे आहे. आज AI, सायबर सुरक्षा, डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये लोकांना प्रगतशील बनवणे आणि त्यासाठी डिजिटल साक्षरतेचे महत्त्व पटवून देणे हा याचा उद्देश आहे.






