World Theatre Day 2025: शेक्सपियरच्या 1900 वर्षांपूर्वी लिहिलेले 'नाट्यशास्त्र' जग का विसरले? त्याला सनातनचा पाचवा वेद म्हणतात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Theatre Day 2025: जागतिक रंगभूमी दिन २७ मार्च रोजी संपूर्ण जगभर साजरा केला जातो. रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ती समाजाच्या विचारांची अभिव्यक्ती आणि संस्कृतीचा आरसा आहे. पाश्चात्य रंगभूमीबद्दल चर्चा करताना बहुतेकवेळा शेक्सपियरचे नाव घेतले जाते. परंतु, या नाट्यकलेचा उगम हजारो वर्षांपूर्वी भारतात झाला होता, हे विसरले जाते. प्राचीन भारतातील महर्षी भरत मुनी यांनी इ.स.पू. ३०० मध्ये ‘नाट्यशास्त्र’ नावाचा ग्रंथ रचला, जो नाट्यकलेचा मूलभूत आधार मानला जातो.
नाट्यशास्त्राचे महत्व आणि त्याची वैशिष्ट्ये
भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे (ICHR) संचालक ओमजी उपाध्याय यांच्या मते, नाट्यशास्त्र हा ग्रंथ केवळ रंगभूमीबद्दल नाही, तर मानवी जीवनातील सर्व पैलूंचा अभ्यास करणारा ग्रंथ आहे. या ग्रंथात अभिनय, नृत्य, संगीत, साहित्य आणि रंगभूमीवरील प्रत्येक घटकाचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. वेदांप्रमाणेच नाट्यशास्त्रालाही ‘पाचवा वेद’ मानले जाते. भरत मुनी म्हणतात:
‘ना कौशल्य, न तंत्रज्ञान, न ज्ञान, न कला, नसौ योगो न तत्कर्म नात्येदस्मिन् यान् दृष्यते।’
याचा अर्थ असा की, मानवी जीवनातील प्रत्येक पैलू नाटकामध्ये सामावलेला असतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘माझे पीरियड्स नसते तर काय झालं असतं… ?’ हमासच्या कैदेतून सुटलेल्या इलानाची थरारक कहाणी
पृथ्वीवरील पहिले नाटक कोणते?
इतिहासात ‘समुद्र मंथन की गाथा’ हे पृथ्वीवरील पहिले रंगवलेले नाटक मानले जाते. भारतीय रंगभूमीमध्ये ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांच्या कथांचेही प्रभावी नाट्यरूपांतर झाले आहे. त्यानंतर कालिदास यांनी ‘मेघदूत’सारखी नाटके लिहिली, ज्यांनी भारतीय रंगभूमीला समृद्ध केले.
भारताचा नाट्यपरंपरेतील मोठा ठसा
भारतात नाटक आणि रंगभूमीची परंपरा वैदिक काळापासून सुरु आहे. छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्यातील ‘सीता वेंगारा’ गुहा सुमारे ३००० वर्षे जुनी असून, येथे नाट्यगृहाच्या स्वरूपाच्या रचनांचे अवशेष सापडले आहेत. स्थानिक समजुतीनुसार, येथेच कालिदासांनी ‘मेघदूत’ नाटक रंगवले होते.
पाश्चात्य रंगभूमीचा विकास आणि भारतीय नाट्यकलेचा विसर
१६व्या शतकात शेक्सपियरने रंगभूमीला नवे आयाम दिले, परंतु त्याच्या १९०० वर्षांपूर्वी भारतातच रंगभूमीचा पाया रचला गेला होता. पाश्चात्य देशांनी आपल्या नाट्यपरंपरेचा जागर केला, पण भारतात आक्रमकांच्या आगमनामुळे नाट्यकला मागे पडली. मुघल आणि ब्रिटिश काळात रंगभूमीला फारसे पाठबळ मिळाले नाही, त्यामुळे ही परंपरा ग्रंथांपुरतीच सीमित राहिली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेच्या धमक्यांना इराणचे कडवे उत्तर! भूमिगत मिसाईल शहराचा धक्कादायक VIDEO झाला व्हायरल
रामलीला आणि आधुनिक रंगभूमीचा प्रभाव
तुलसीदासांनी रामायणाच्या कथा रंगभूमीवर मांडल्या आणि ‘रामलीला’ नाटकाद्वारे भारतीय रंगभूमीला पुनरुज्जीवन दिले. आज सिनेमासुद्धा या नाट्यकलेचा आधुनिक विस्तार आहे. जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने, भरत मुनींनी दिलेले योगदान पुन्हा एकदा अधोरेखित करण्याची गरज आहे. भारतीय नाट्यपरंपरेचा जागर करणे, हे केवळ संस्कृतीचे जतन नव्हे, तर आपल्या महान वारशाचा सन्मान आहे.