आयपीएल 2024 पॉईंट टेबल : इंडियन प्रीमियर लीग 2024चे (Indian Premier League 2024) आतापर्यत 59 सामने झाले आहेत. आज आयपीएल 2024चा 60 सामना रंगणार आहे, परंतु अजुनपर्यत एकही संघ प्लेऑफमध्ये नाही ही फार आश्चर्यचकित करणारी बाब आहे. सध्या गुणतालिकेची स्थिती पाहता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांनी पंजाब किंग्स (Punjab Kings) हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. सध्या मुंबई इंडियन्सचा संघ नवव्या स्थानावर आहे तर पंजाब किंग्सचा संघ 8 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. पहिल्या दोन संघाचा विचार केला तर अव्वल स्थानावर 16 गुणांसह कोलकाता नाईट राइडर्सचा संघ आहे. कोलकाताचे आतापर्यत 11 सामने झाले आहेत त्यामध्ये त्यांनी 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर 3 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
[read_also content=”दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मोठा झटका! कर्णधार पुढच्या सामन्यात संघाबाहेर https://www.navarashtra.com/sports/a-big-blow-to-the-team-of-delhi-capitals-the-captain-is-out-of-the-team-for-the-next-match-532215.html”]
गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. राजस्थानचे सध्या 16 गुण आहेत. राजस्थानचा रनरेट कमी असल्यामुळे ते सध्या दुसऱ्या स्थानावर आहेत. सनरायझर्स हैदराबादचा संघ 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. हैदराबादचे आतापर्यत 12 सामने झाले आहेत त्यापैकी त्यांना 7 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे तर 5 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईच्या संघाला कालच्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु कालच्या पराभवानंतरही चेन्नई सुपर किंग्स 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
[read_also content=”मुंबई-कोलकाता सामना पावसामुळे रद्द होणार? हवामानामुळे चाहत्यांचं टेन्शन वाढलं https://www.navarashtra.com/sports/will-the-mumbai-kolkata-match-be-canceled-due-to-rain-due-to-the-weather-the-tension-of-the-fans-increased-532091.html”]
त्यांच्या मागोमाग 12 गुणांसह अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. परंतु दिल्ली कॅपिटल्सचा पुढील सामना रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे, हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. परंतु या सामन्यांमध्ये दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे दिल्लीचा संघ या सामन्यामध्ये विजय मिळवतो की, बंगळुरूचा संघ या प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहतो याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आतापर्यत 12 सामने झाले आहेत त्यापैकी त्यांनी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर 7 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कालच्या विजयानंतर गुजरात टाइटच्या प्लेऑफच्या आशा अजूनही कायम आहेत.