एबी इनबेव्ह आणि ICC कडून जागतिक भागीदारीची घोषणा(फोटो-सोशल मीडिया)
मुंबई : इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) ने घोषित केले आहे की, जगातील आघाडीची ब्रूइंग कंपनी एबी इनबेव्ह २०२६ पासून सुरू होणाऱ्या सर्व प्रमुख आयसीसी टूर्नामेंट्ससाठी अधिकृत बीअर पार्टनर असणार आहे. भारतात या भागीदारीचे नेतृत्व बडवाईझरची नॉन-अल्कोहोलिक बीअर बडवाईझर ०.० करेल, तर युरोप आणि आफ्रिकेमध्ये एबीआयचे मेगा ब्रॅंड भागीदार बनतील.
क्रिकेटचा सामना स्टेडियममध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहण्यापासून ते बार किंवा पबमध्ये मित्रांसमवेत जाऊन, कमी अल्कोहोल-बाय-व्हॉल्यूम (एबीव्ही) आणि बडवाईझर ०.० सारख्या नो-अल्कोहोल पर्यायांचा आस्वाद घेत घेत बघण्यापर्यंत बीअर हाच जबाबदारीपूर्वक आनंद घेण्याचा स्वाभाविक पर्याय आहे. आयसीसीसोबत केलेल्या या भागीदारीच्या माध्यमातून एबी इनबेव्ह जगभरातील मद्यपान करण्यास पात्र वयाच्या क्रिकेट चाहत्यांसाठी अधिक उल्हास, पर्याय आणि आनंदोत्सवाचे क्षण निर्माण करेल.
आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता म्हणाले, “दोन बिलियनपेक्षा जास्त चाहत्यांसह क्रिकेट हा जगातील एक अत्यंत लोकप्रिय खेळ आहे आणि आयसीसी इव्हेंट हा क्रिकेटचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे, तर एबी इनबेव्हचाहत्यांचा विस्तार आणि सहभाग अधिक दृढ करण्यासाठी उत्तम अनुभवांचे सर्जन करण्यात आघाडीवर आहे. ही भागीदारी अशा दोन संस्थांमधील एक स्वाभाविक भागीदारी आहे, ज्या चाहत्यांचा सहभाग विविध प्रकारे वाढवणाऱ्या इनोव्हेशन्सच्या माध्यमातून क्षण अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी, सुंदर आठवणी निर्माण करण्यासाठी आणि अप्रतिम अनुभव प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आमच्या प्रतिष्ठित व्यावसायिक भागीदारांच्या यादीत आम्ही एबी इनबेव्हचे सहर्ष स्वागत करत आहोत आणि एकत्र मिळून आमच्या सर्व टूर्नामेंट्समधून मल्टी-मोडल इव्हेंट अनुभव प्रदान करण्यास आणि जगभरात खेळांबद्दलचा रोमांच आणखी वाढवण्यास उत्सुक आहोत.”
एबी इनबेव्हचे ग्लोबल चीफ मार्केटिंग ऑफिसर मार्सेल मार्कोन्डेस म्हणाले, “क्रिकेट हा जगातील अत्यंत लोकप्रिय खेळ आहे आणि त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. या मोठ्या मंचावर क्रिकेटच्या चाहत्यांशी निगडित होताना आम्हाला आनंद होत आहे. बीअर हे सामाजिक संबंध आणि संयमित सेवनासाठीचे पेय आहे. आणि आयसीसीसोबत केलेल्या या भागीदारीमुळे आमच्या ब्रॅंड्सना सगळीकडच्या उपभोक्त्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.”
या प्रसंगी एबी इनबेव्ह इंडियाचे अध्यक्ष कार्तिकेय शर्मा म्हणाले, “इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलशी भागीदारी जाहीर करताना आम्ही रोमांचित आहोत. गेल्या दोन दशकांपासून बडवाईझर भारतात आनंद सोहळ्यांच्या केंद्रस्थानी आहे. आणि देशातील एक आघाडीचा प्रीमियम बीअर ब्रॅंड म्हणून लक्षावधी लोकांना एकत्र आणणाऱ्या खेळामध्ये सेलिब्रेट करण्याचे आमचे पॅशन घेऊन येण्यासाठी हा योग्य क्षण आहे. स्टेडियममधील उन्मादापासून ते लिव्हिंग रूममध्ये बसून आपल्या देशासाठी प्रार्थना करण्याच्या क्षणापर्यंत क्रिकेटचा प्रत्येक क्षण अधिक उन्नत करण्याची आणि खेळ महान बनवणाऱ्या चाहत्यांवर फोकस ठेवण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे. आयसीसी समवेत आम्ही जागतिक दर्जाचा अनुभव प्रदान करू, जो क्रिकेटचे सेलिब्रेशन बडवाईझरसारखे बनवेल- अभिमानाने भरलेले, जबाबदार आणि ज्यांच्यामुळे या क्षणाला महत्त्व आहे अशांच्या हातात नेहमी असणारे.”
या भागीदारीत २०२७ पर्यंतचे आयसीसी पुरुष आणि महिलांचे सर्व महत्त्वाचे इव्हेंट समाविष्ट आहेत. यात भारत आणि श्रीलंकेत होणारा आयसीसी मेन्स टी२० विश्व कप २०२६, युके मध्ये होणारा आयसीसी वीमेन्स टी२० विश्वकप २०२६, श्रीलंकेत होणारी पहिली आयसीसी वीमेन्स चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७, इंग्लंडमध्ये आयोजित आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२७ आणि दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामीबिया येथे योजलेला आयसीसी मेन्स क्रिकेट विश्व कप २०२७ यांचा समावेश आहे.






