फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
गुजरात टायटन्स आयपीएल टीम : अंबानी कुटूंबाने मुंबई इंडियन्सला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा संघ मागील बऱ्याच वर्षांपासून आयपीएलच्या मैदानावर कहर केला आहे. अंबानी कुटुंबानंतर अदानी ग्रुपनेही आयपीएलमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला. पण अदानीचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत अब्जाधीशाची ही स्वप्ने टोरेंट ग्रुपने धुळीस मिळवली. टोरेंट ग्रुपने बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझी गुजरात टायटन्समधील मोठा हिस्सा ताब्यात घेण्याची घोषणा केली. या संपादनाची किंमत किती आहे याचा खुलासा करण्यात आलेला नाही.
तथापि, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हा करार ५००० कोटी रुपयांना झाल्याचा दावा केला जात आहे. टोरेंट ग्रुपने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘टोरेंट इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड (TIPL) या होल्डिंग कंपनीच्या माध्यमातून, CVC कॅपिटल पार्टनर्स (आयरेलिया स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) सोबत आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्समधील ६७ टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी करार करण्यात आला आहे.’ हा व्यवहार विविध मंजुरींच्या अधीन आहे (बीसीसीआयच्या मंजुरीसह). या कराराअंतर्गत, इरेलिया फ्रँचायझीमध्ये ३३ टक्के हिस्सा राखेल. या करारासह, टोरेंट ग्रुपने भारतातील वेगाने वाढणाऱ्या क्रीडा क्षेत्रात प्रवेश केला आहे.
२०२१ मध्ये दोघांनीही ही संधी गमावली होती. या कराराबद्दल माहिती देताना, टोरेंट ग्रुपच्या संचालिका जिनल मेहता म्हणाल्या, ‘भारतात गेम्सना महत्त्व मिळत आहे, त्यामुळे टोरेंटला या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रात क्षमता दिसते.’ २०२१ मध्ये अहमदाबादच्या आयपीएल टीम गुजरात टायटन्सला खरेदी करण्याची संधी अदानी ग्रुप आणि टोरेंट ग्रुपने हुकवली. यानंतर, दोघांकडून गुजरात टायटन्समध्ये भाग घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अलिकडेच, ईटीने वृत्त दिले होते की सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स अदानी ग्रुप आणि टोरेंट ग्रुपसोबत संघाचा कंट्रोलिंग स्टेक विकण्यासाठी चर्चा करत आहेत.
बीसीसीआयने गुजरात टायटन्सला फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्यांचा हिस्सा विकण्यास मनाई केल्यामुळे कराराला अंतिम स्वरूप देण्यात विलंब झाला . याच कारणामुळे कराराच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर सुमारे सात महिन्यांनी कराराच्या अंतिम स्वरूपाची माहिती देण्यात आली. सीव्हीसी कॅपिटल देखील नफ्यात आपला हिस्सा विकण्याचा प्रयत्न करत होता. २०२१ मध्ये, बीसीसीआयने आयपीएलमध्ये दोन नवीन शहर-आधारित संघांचा समावेश करण्यासाठी बोली लावली होती. अहमदाबाद हे सर्वात जास्त चर्चेत असलेले शहर होते. त्यावेळी अदानी ग्रुपने ५१०० कोटी रुपये आणि टोरेंट ग्रुपने ४६५३ कोटी रुपये बोली लावली होती.