फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना : भारत पाकिस्तान सामना म्हणजेच क्रिकेट चाहत्यांसाठी एक भावना आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांचे म्हणणे असते की काहीही असो पण पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारताच्या क्रिकेट चाहत्यांना पराभव स्वीकारता येणार नाही. असेच पाकिस्तान चाहत्यांचे देखील आहे. भारत पाक सामना झाला या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानच्या संघाला धूळ चारली. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. पाकिस्तान संघाने तीन पैकी दोन लीग सामने गमावले आहेत आणि संघ स्वतःच्या बळावर उपांत्य फेरीचे तिकीट मिळवू शकणार नाही. न्यूझीलंडनंतर भारतानेही पाकिस्तान संघाला हरवले.
आता पाकिस्तानकडे स्पर्धेत फक्त एकच सामना शिल्लक आहे, जरी तो जिंकला तरी तो बाद फेरीसाठी पात्र ठरू शकणार नाही, कारण पाकिस्तान संघाला इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल. पाकिस्तान संघाचे चाहतेही संघाच्या या खराब कामगिरीवर नाराज आहेत. कारण भारताच्या संघाने पाकिस्तानला ४५ चेंडूं शिल्लक असताना ६ विकेट्सने पराभूत केले. यामध्ये भारताचा स्टार विराट कोहलीने शतक ठोकले. आता सोशल मीडियावर या सामान्यांमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याने घातलेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या जर्सीवर क्रिकेटप्रेमी भारतीय संघाची जर्सी घालताना दिसत आहे.
पाकिस्तानी के फैन को हम लोगों ने भारत जर्सी पहना दिया ! #INDvsPAKlive #INDvsPAK #ViratKohli𓃵 #virat pic.twitter.com/Mx1w0Ymhy7
— ANSHUL YADAV (@Anshulydv02) February 24, 2025
सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आधी सुरुवातीला स्टेडियममध्ये बसलेला प्रेक्षक हा पाकिस्तान क्रिकेट संघाची जर्सी घातलेली असते. जेव्हा सामना भारतीय संघ जिंकणार आहे असे समजून येते तेव्हा तो टीम इंडियाची जर्सी काढतो आणि घालायला सुरुवात करतो. यावेळी आजूबाजूचे सर्व क्रिकेट चाहते जोरजोरात ओरडतात आणि त्याला बोलतात जर्सी घाल चल जर्सी घाल यावेळी तो काही सेकंड विचार करतो आणि जर्सी घालतो.
महाराष्ट्रात पाकिस्तानविरुद्ध ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५’ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना जिंकल्यानंतर लोक आनंद साजरा करताना दिसले. लोक भारत माता की जयच्या घोषणा देत असल्याचे दिसून आले. काल रात्री, जम्मू आणि काश्मीरच्या रस्त्यांवर चाहत्यांनी फटाके फोडले आणि भारताच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दिवाळी साजरी केली. यावेळी संपूर्ण परिसर हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणांनी दुमदुमून गेला.