फोटो सौजन्य - X
विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा व्हिडिओ : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच म्हणजे कसोटी मालिका पार पडली. या आधी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. विराट कोहलीने t20 फॉरमॅट मधून आणि कसोटी फॉरमॅटमधून क्रिकेटला अलविदा केला आहे तो फक्त आता एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. 2026 मध्ये होणारा t20 विश्वचषक आजचा विराट कोहली भाग नसणार हे स्पष्ट आहे. पुढील एकदिवसीय मालिका ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवली जाणार आहे.
यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही खेळताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याआधी भारताचा संघ आशिया कप खेळेल. विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांचा एक व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही रस्ता क्रॉस करताना दिसत आहेत. यावेळी ते क्रॉस करताना त्यांना आणखी एक कपल समोर येते आणि त्यांच्याशी संवाद चालत असते. त्यावेळी विराट कोहली हसताना पाहायला मिळाला.
मागील काही वर्षांपासून विराट कोहली अनुष्का शर्मा आणि त्याचा परिवार हे लंडनमध्ये राहत आहेत. फार कमी वेळा ते भारतामध्ये येतात वारं होत असलेल्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सध्या त्याची मोठी चर्चा सुरू आहे. नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराट कोहली नव्हता. त्याने मे महिन्यात खेळाच्या सर्वात लांब स्वरूपातून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या कसोटी कारकिर्दीत, विराट कोहलीने १२३ कसोटी सामन्यांच्या २१० डावांमध्ये ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या आणि त्यात ३० शतके केली.
Virat Kohli and Anushka Sharma are spotted walking through the streets of London.🥰❤️ pic.twitter.com/s9zNQ2ipzU
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) August 17, 2025
या दरम्यान, त्याची सर्वोत्तम धावसंख्या २५४ नाबाद होती. त्याने ६८ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्वही केले, ज्यामध्ये भारताने ४० जिंकले आणि १७ गमावले, तर ११ सामने अनिर्णित राहिले. २०१४ ते २०१९ दरम्यान, कोहलीने आव्हानांशी लढणे सोडले नाही आणि आधुनिक काळातील अनेक क्रिकेटपटूंना न गाठता आलेली उंची गाठली. कोहलीने धावा आणि शतकांचा एक ढीग ठोकला आणि भारताला कसोटी क्रिकेटमध्ये काही मोठ्या उंचीवर आणि संस्मरणीय विजयांवर नेले.