Champions Trophy : भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तान करतेय न्यूझीलंडच्या पराभवाची प्रार्थना; कसे असणार सेमीफायनलचे समीकरण
NZ vs BAN Champions Trophy 2025 : स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आणि दुसऱ्या सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागला, त्यामुळे पाकिस्तान आता चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडणे निश्चित झाले आहे. आजच्या सामन्यानंतर पाकिस्तानच्या अस्तित्वावर शेवटचा खिळा ठोकला जाऊ शकतो. खरं तर, आज ग्रुप अ मध्ये न्यूझीलंड आणि बांगलादेश एकमेकांशी भिडत आहेत, ज्यामध्ये जर न्यूझीलंड जिंकला तर ग्रीन आर्मीचा म्हणजेच पाकिस्तानचे या स्पर्धेतील अस्तित्व संपुष्टात येणार आहे.
काल पाकिस्तानविरुद्ध भारताचा शानदार विजय, विराटची शतकी खेळी
Plenty of respect for Virat Kohli from Pakistan's star players at #ChampionsTrophy 👏
More 👉 https://t.co/O9lMfFTkQy pic.twitter.com/MlnIUQ4DtL
— ICC (@ICC) February 24, 2025
न्यूझीलंड गुणतालिकेत अव्वलस्थानी जाईल
न्यूझीलंड संघाने पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानला 60 धावांनी हरवून आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली होती. या मोठ्या विजयामुळे त्याचा नेट रनरेटही सुधारला आहे. सध्या, भारत दोन सामन्यांमध्ये दोन विजयांसह आणि +०.६४७ सह अव्वल स्थानावर आहे, परंतु जर न्यूझीलंडने आज विजय मिळवला, तर दोन सामन्यांमध्ये दोन विजयांसह, ते पॉइंट टेबलमध्ये शीर्षस्थानी जाईल कारण त्याचा एनआरआर सध्या +१.२०० आहे.
बांगलादेशच्या विजयावर पाकिस्तानचे स्पर्धेतील अस्तित्व अवलंबून
बांगलादेशला पहिल्या सामन्यात भारताकडून सहा विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. त्याचा नेट रनरेटदेखील -०.०४८ इतका खराब आहे. अशा परिस्थितीत, आणखी एक पराभव त्यांना स्पर्धेतून बाहेर काढेलच, पण यजमान पाकिस्तानचा खेळही संपवेल. दोन सामन्यांत दोन पराभवांसह, पाकिस्तान अ गटात शेवटच्या स्थानावर आहे. त्याचा नेट रनरेट -१.०८७ आहे.
न्यूझीलंडची प्रत्येक विभागात चांगली कामगिरी
पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने खेळाच्या प्रत्येक विभागात चांगली कामगिरी केली. पाकिस्तानमध्ये त्रिकोणी मालिका खेळल्याने त्याला परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत झाली. पण बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याला अंतिम इलेव्हन निवडण्यासाठी थोडा विचार करावा लागेल कारण रचिन रवींद्र डोक्याच्या दुखापतीतून बरा होऊन परतणार आहे.
न्यूझीलंड संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉन्वे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, जेकब डफी.
बांगलादेश संघ : नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्झिद, हसन, तौहिद हृदयॉय, मुशफिकुर रहीम, मोहम्मद महमुदुल्लाह, जकर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन इमोन, नसुम अहमद, तन्झिम हसन साकिब, नाहिद राणा.