फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताच्या संघाला न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात देखील पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताच्या संघांचा मालिकेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने ८ विकेटने पराभव केला होता. भारताच्या संघासाठी ही मालिका महत्वाची आहे त्याचबरोबर येणारे कसोटी सामने सुद्धा महत्वाचे आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टिकोनातून ही मालिका टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे. ही मालिका जिंकून भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२५ मध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले असते, परंतु टीम इंडियाला पुणे कसोटीतील पराभवाची मोठी किंमत मोजावी लागू शकते. आतापर्यंत दोन टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळणारा भारत हा एकमेव देश आहे, पण पुण्यात हरला तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचू शकेल का? यासंदर्भात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच समीकरण समजून घ्या.
चार संघामध्ये चुरस
सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या अंतिम फेरी गाठण्यासाठी चार संघांमध्ये चुरशीची स्पर्धा सुरू आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया सध्या अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडने ही मालिका जिंकली तरी अंतिम फेरीत जाण्याची आशा फार जास्त आहेत. मात्र भारत-ऑस्ट्रेलियाशिवाय श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हेही थेट अंतिम फेरीच्या शर्यतीत आहेत.
टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आघाडी
न्यूझीलंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल टेबलमध्ये चांगली आघाडी घेतली होती. पण पुणे कसोटी सामन्यातील पराभवानंतर त्याची गुणांची टक्केवारी जवळपास ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीची होईल. पुणे कसोटीतील पराभवामुळे भारताचे मायदेशात सलग १८ मालिका विजय तर संपुष्टात येतीलच, परंतु सलग तिसरे कसोटी चॅम्पियनशिप फायनल खेळण्याच्या भारताच्या आशांनाही धक्का बसू शकतो. त्यामुळे भारताच्या संघासाठी न्यूझीलंडविरुद्ध होणारी मालिका अत्यंत महत्वाची आहे. कारण यानंतर संपूर्ण समीकरण गुणतालिकेत बदलणार असल्याचं दिसून येत आहे.
भारत न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना
भारताच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडच्या संघाला २५९ धावांवर रोखले. त्यानंतर भारताचा संघ फलंदाजीमध्ये फार काही चांगली कमाल करु शकला नाही. भारताच्या संघाला न्यूझीलंडने १५६ धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर भारतच्या संघाने कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिनी न्यूझीलंडच्या संघाला २५५ धावांवर रोखले आणि न्यूझीलंडच्या संघाने टीम इंडियासमोर ३५९ धावांचे लक्ष्य उभे केले होते. भारताच्या संघाने २२४ धावा करत ८ विकेट्स गमावले आहेत. यामध्ये आता टीम इंडियाच्या आशा रवींद्र जडेजावर टिकून आहेत. भारताच्या संघाला अजूनपर्यंत १३५ धावांची गरज आहे. या सामन्याचा निकाल भारतीय संघासाठी जास्त महत्वाचा आहे हेदेखील खरं आहे.
हेदेखील वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शामीच्या करिअरवर पूर्णविराम? बीसीसीआयने घेतला निर्णय