फोटो सौजन्य : X
Ajit Aagarkar भारतीय क्रिकेट नियामक बोर्डा (BCCI)ची वार्षिक सर्वसाधारण सभा ( AGM) शुक्रवारी पार पडली. या बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर यांच्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर यांचा कार्यकाळ ६ ऑक्टोबर २०२६ ला संपणार आहे. अशात बीसीसीआय त्यांच्या जागी नव्या अध्यक्षाचा शोध घेत आहे. निवड समितीबाबत निर्णय घेण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती बैठकीनंतर बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना दिली. त्याशिवाय त्यांनी इतर कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांना दिली नाही. बीसीसीआयच्या ९५ व्या एजीएममध्ये विविध राज्य क्रिकेट संघाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या बैठकीत बंगाल क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी व भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी व माजी वेगवान गोलंदाज व्यँकटेश प्रसाददेखील उपस्थित होते.
वरिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षांच्या निवडीशिवाय बीसीसीआय ज्यूनियर निवड समितीच्या सर्व पाच पदांना भरण्याच्या प्रक्रियेबाबत ही विचार करत आहे. यादरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ने बोर्डाकडे काही प्रमुख सामन्यांवेळी मुंबईचा प्रामुख्याने विचार करण्यात यावा अशी विनंती केली आहे. एमसीएचे सचिव उन्मेष खानविलकर यांनी याबाबत माहिती दिली. प्रतिष्ठीत वानखेडे स्टेडियममध्ये मागील दोन वर्षांपासून कोणताही कसोटी सामना खेळवला गेला नाही. येथे मागील अखेरचा कसोटी सामना हा २०२४ च्या अखेरीस न्यूझीलंडविरुद्ध खेळवला गेला होता. वानखेडेमध्ये पार पडणाऱ्या आगामी क्रिकेट सामन्यांचा विचार करता, येथे पुढील वर्षाच्या सुरुवातीला पहिल्यांदा आयोजित होणाऱ्या महिला चॅम्पियन्स लीग व महिला प्रीमियर लीगच्या काही सामन्यांचा समावेश आहे.
Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?
बीसीसीआयने बैठकीनंतर एक प्रसिद्धीपत्रक जारी केली. त्या प्रसिद्धीपत्रकात असे सांगण्यात आले की, २०२८मध्ये पार पडणाऱ्या बीसीसीआयच्या शताब्दी वर्षाच्या आयोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे शताब्दी वर्ष डिसेंबर २०२७ ला सुरू होत २०२८ पर्यंत वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरे केले जाणार आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हा एक महत्त्वपूर्ण क्षण ठरणार असल्याचेही नमुद करण्यात आले आहे.
Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन






