विराट कोहलीचे पदक ड्रेसिंग रूममधून गायब
IND vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील साखळी फेरीचे सामने संपले आहेत. शेवटच्या साखळी फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव करत विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तों म्हणजे वरुण चक्रवर्ती. त्याने पाच विकेट घेत किवींचा अर्धा संघ गारद केला. सामन्यानंतर बीसीसीआयच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाकडून विराट कोहलीला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी सर्वोत्तम क्षेत्ररक्षक पदक जाहीर करण्यात आले. परंतु, पदक देण्यापूर्वीच खेळाडूंकडून ते पदक गायब करण्यात आले.
दुबईत खेळवल्या गेलेल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा धुव्वा उडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी विराट कोहलीला त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी त्याला हा पुरस्कार दिला जात असल्याचे सांगितले, तेव्हा मात्र ते पदकच गायब होते. त्यानंतर सर्व खेळाडूंनी मिळून त्या पदकाचा शोध सुरू केला. तसेच खेळाडूंचीही तपासणी करण्यात आली. पदकाचा शोध बराच काळ सुरूच राहिला. शेवटी पदक सापडलं आणि त्यानंतर विराट कोहलीच्या गळ्यात ते घालण्यात आलं. हे पदक थ्रोडाउन स्पेशालिस्ट नुवान सेनेविरत्ने यांच्याकडून विराट कोहलीला प्रदान करण्यात आले. या सर्व प्रकाराच व्हिडिओही आता समोर आला आहे.
हेही वाचा : इंग्लंडचे कर्णधारपद सोडल्यानंतर जोस बटलर भावुक, इंस्टाग्रामवर शेअर केली पोस्ट
🏅 A missing 𝗳𝗶𝗲𝗹𝗱𝗶𝗻𝗴 𝗺𝗲𝗱𝗮𝗹 finds its way to the right hands!
A special team member presents the honor to #𝗩𝗶𝗿𝗮𝘁𝗞𝗼𝗵𝗹𝗶, making for a fun and memorable moment after the #INDvsNZ clash! 🤝🏻😄
WATCH 🎥✨ 🔽 #TeamIndia | #ChampionsTrophy pic.twitter.com/poJWAkOVMa
— Indian Cricket Team (@incricketteam) March 3, 2025
बीसीसीआयकडून गेल्या एकदिवसीय विश्वचषकापासून टीम इंडियामध्ये नवीन परंपरा सुरू करण्यात आली आहे. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप सामन्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला हे पदक देत असतात. टी दिलीपने या सामन्यात तीन खेळाडूंना नामांकन दिले होते. नामांकित खेळाडूंमध्ये अक्षर पटेल, श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांचा समावेश होता. यामध्ये विराट कोहलीला विजेता घोषित करण्यात आले. त्यानंतर खेळाडूंनी पदक गायब केले आणि नंतर तपास सुरू करण्यात आला.
कोहलीला पदक बहाल करण्यापूर्वीच ड्रेसिंग रूममध्ये नाट्य सुरू झाले. कोहलीला देण्यात येणारे पदक मात्र गायब होते. केएल राहुलपासून अक्षर पटेल आणि विराट कोहलीही पदकाच्या शोधाला लागले होते. व्हिडिओमध्ये कोहली पदक गायब झाल्याचे सांगत असल्याचे दिसत आहे. संघाचे सपोर्ट स्टाफ देखील पदकाच्या शोधात व्यस्त होते. त्यांनंतर खेळाडूंची देखील तपासणी करण्यात आली. शमीपासून सुरुवात करून सर्व खेळाडूंचा शोध घेण्यात आला. यामध्ये कर्णधार रोहित शर्माही हसताना दिसत आहे. शेवटी सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचे पदक अक्षर पटेलकडे दिसून आलं.
हेही वाचा : IND vs AUS: सेमी फायनलमध्ये केएल राहुलला खेळवण्यास संभ्रम? ऋषभ पंतला मिळणार संधी, नेमकं कारण काय?
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी सामन्यात दबदबा राखत तिन्ही सामने जिंकले आणि दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. भारताने प्रथम बांगलादेशला 6 विकेटने, नंतर पाकिस्तानला 6 विकेट्सने आणि तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला 44 धावांनी पराभूत केल. या विजयायांमुळे भारताने ‘अ’ गटातील गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप मारली. या विजयासह आता उपांत्य फेरीत भारताचा सामना 4 मार्चला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.