फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आकाशदीप : भारताच्या संघाने नुकतीच बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिका झाली, यामध्ये भारताच्या संघाने २-० अशी मालिका नावावर केली. भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीपने कसोटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. यावेळी त्याने त्याच्या दोन्ही सामन्यांमध्ये प्रेक्षकांना त्याच्या कामगिरीने प्रभावित केले. कानपूरमध्ये आणि चेन्नईमध्ये झालेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये आकाशदीपने कमालीची कामगिरी केली. भारताच्या संघाने पहिला सामना २८० धावांनी जिंकला तर दुसरा सामना ७ विकेट्सने जिंकला आहे. या विजयानंतर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आकाशदीप अयोध्येला पोहोचला, जिथे त्याने रामललाचे दर्शन घेतले.
बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या विजयात आकाश दीपने महत्त्वाची भूमिका बजावली होती. २७ वर्षीय वेगवान गोलंदाजाने दोन सामन्यात एकूण ५ विकेट घेत आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली. केवळ तीन कसोटी सामने खेळलेल्या आकाशदीपने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळल्यानंतर आकाशदीप रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला पोहोचला.
Akash Deep takes the blessings of Lord Rama at Ram Mandir in Ayodhya 🙏#AkashDeep #IndianCricketTeam #CricketTwitter pic.twitter.com/CIdlgCXjaS
— InsideSport (@InsideSportIND) October 3, 2024
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, प्रभू रामाचे दर्शन घेणे हे माझे खूप दिवसांपासूनचे स्वप्न होते. ज्या दिवशी हे मंदिर पूर्ण झाले त्या दिवसापासून मी येऊ शकलो नाही. आता इथे आल्यावर मला खूप बरं वाटतंय. रामललाच्या स्थापनेदरम्यान मी व्हिडिओमध्ये रामाची मूर्ती पाहिली, ती मूर्ती पाहून त्याचे चित्र माझ्या मनात घर करून गेले. इथे आल्यावर बरे वाटले आणि रिलॅक्स वाटले.
आकाशदीप पुढे म्हणाला की, मी मंदिरात काही मागण्यासाठी आलो नाही. मला फक्त दर्शन घ्यायचे होते, देव देणारा आहे, त्याला काय द्यावे हे माहित आहे. ज्या वर्चस्वाने टीम इंडिया जगभर खेळत आहे. प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळल्यानंतर आम्हाला समजते की आम्हाला कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. ती पातळी कायम ठेवण्यासाठी येणाऱ्या पिढीने अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.