फोटो सौजन्य – X
जागतिक ऍथलेटिक्स कॉन्टिनेन्टल टूर सध्या सुरू आहे. या स्पर्धेचे आयोजन कलिंगा स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. सध्याचा भारताचा सर्वात वेगवान धावपटू अनिमेष कुंजूरने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सेमी फायनलच्या शर्यतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहून फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्याने मागील काही स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेन्टल टूर स्पर्धेमध्ये कांस्य पातळीच्या स्पर्धेत अनिमेष कुंजूर समोर दक्षिण कोरियाच्या केओ सेउघवानं याने 200 मीटर शर्यतीमध्ये विजेतेपदासाठी पदासाठी धडपड केली. यावेळी भारताचा स्टार अनिमेष कुंजूरणे स्वतःला फायनलच्या शर्यतीत झोकून गोल्ड मेडल नावावर केले आहे.
कुजूरच्या बाबतीत मात्र नाट्यमय घडामोडी घडल्या. २२ वर्षीय या खेळाडूने सकाळी पुरुषांच्या १०० मीटर हीट शर्यतीत काही पावले टाकल्यानंतर पुन्हा एकदा वेग घेतला. त्यानंतर अर्ध्या तासाने तो २०० मीटर हीटमध्ये धावला आणि २०.९९ सेकंदांच्या वेळेसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. कुजूरच्या शर्यतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने १०० आणि २०० मीटरमध्ये अंतिम शर्यत जिंकली आणि २०.७७ सेकंदात भारताचा राष्ट्रीय रेकाॅर्ड नावावर केला.
𝗜𝘁’𝘀 𝗔𝗻𝗶𝗺𝗲𝘀𝗵 𝗦𝗵𝗼𝘄!#Odisha‘s Animesh Kujur brings glory for the country as he clinched 1st place in Men’s 200m Run at the World Athletics Continental Tour Bronze.
Huge congratulations, Animesh! pic.twitter.com/lsWhqIz20a
— Odisha Sports (@sports_odisha) August 10, 2025
या शर्यतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेला दक्षिण कोरियाचा धावपट्टू या धावपटूची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ २०.४५ सेकंद आहे. तो संपूर्ण शर्यतीत कुजूरला पुढे ढकलत राहिला परंतु १०० आणि २०० मीटरमध्ये भारताचा राष्ट्रीय विक्रमधारक २०.७७ सेकंदात त्याने गोल्ड मेडल नावावर केले. सेउंगहवान २०.९५ सेकंदात दुसऱ्या क्रमांकावर आला तर रगुल कुमार २१.१७ सेकंदात तिसऱ्या क्रमांकावर या शर्यतीत राहिला. शेवटी तो कसा जिंकला असे विचारले असता, कुजूर म्हणाले, “माझे प्रशिक्षक मला नेहमीच शेवटच्या टप्प्यात माझा फॉर्म कायम ठेवायला सांगतात. ही शेवटची ५० मीटर शर्यत आहे जिथे बहुतेक खेळाडू त्यांचा फॉर्म गमावतात.
भारताचा ऑलिम्पियन मुरली श्रीशंकर यांनी देखील कमालीची कामगिरी केली. त्याने सलग चौथ्यांदा सुवर्णपदक जिंकले, या स्पर्धेमध्ये त्याने शेवटच्या प्रयत्नात ८.१३ मीटरची उडी मारून गोल्ड मेडल जिंकले आहे. तर या आधी त्याने टोकियो वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये 8.27 त्यानंतर पार केले होते. महिलांच्या भालाफेकींमध्ये अशी एक क्रीडा स्पर्धेतील विजेती अनुराणीने चौथ्या फेरीमध्ये 62.01 मीटर भाला फेकून सुवर्णपदक नावावर केले आहे. त्यामुळे आता ती सप्टेंबर मध्ये होणाऱ्या टोकियो वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये स्थान मिळवण्याची पक्की दावेदार झाले आहे. शैलेश सिंह महिलांच्या लांब उडी स्पर्धेमध्ये 8.28 मीटर अंतर पार करून विजय नावावर नोंदवला आहे.