फोटो सौजन्य - X
भारत विरुद्ध इंग्लड : भारताचा संघ आयपीएल 2025 नंतर इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. याआधी भारताचा अ संघ इंग्लडमध्ये अ संघाशी खेळणार आहे. बीसीसीआयने भारत अ संघाची घोषणा केली आहे. यामध्ये अभिमन्यु ईश्वरन हा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. भारताचे दोन महत्वाचे खेळाडु रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी कसोटी क्रिकेटमधुन निवृतीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भारताचा नवा कर्णधार कोण असणार यावर अजुनही प्रश्नचिन्ह आहे. त्याचबरोबर भारताच्या संघाची अजुनपर्यत कोणत्या खेळाडुंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे.
आता आयपीएल 2025 नंतर भारताचा संघ इंग्लड दौऱ्यावर जात असताना या दोन खेळाडूंची लाॅटरी लागु शकते. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली नाही. पण भारताच्या संघामध्ये चेन्नईचा अंशुल कम्बोजला या इंग्लडविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये संधी मिळु शकते. त्याचबरोबर पंजाब किग्सच्या संघामध्ये असलेला अर्शदीप सिंह याने या सिझनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे त्यामुळे इंग्लडविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये त्याला संधी मिळु शकते.
🚨 INDIAN TEST TEAM UPDATE 🚨
– Arshdeep Singh or Anshul Kamboj likely to be picked for the five-match Test series against England. [Devendra Pandey from Express Sports] pic.twitter.com/KOSfY2Sjyo
— Johns. (@CricCrazyJohns) May 23, 2025
भारताचा अ संघ हा इंग्लड अ संघाविरुद्ध 30 मे पासुन खेळणार आहे. यामध्ये भारताच्या अनेक युवा खेळाडुंना संघामध्ये स्थान मिळाले आहे. संघाचे कर्णधारपद हे अभिमन्यु ईश्वरनच्या हातात सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर उपकर्णधारपद हे धुव्र जुरेलकडे देण्यात आले आहे. करुण नायर हा 8 वर्षानंतर पुन्हा इंग्लड कसोटी खेळणार आहे.
ICC ने केली WTC फायनलसाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा! दिसणार भारतीय दोन अनुभवी पंच
क्रिकबझमधील एका वृत्तानुसार, केएल राहुलला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अनौपचारिकपणे संकेत दिले आहेत की त्याला आघाडीवर फलंदाजी करावी लागेल. जर ही योजना यशस्वी झाली, तर राहुल यशस्वी जयस्वालसोबत सलामीच्या फलंदाजीसाठी खेळेल अशी अपेक्षा आहे तर गिल चौथ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. यामुळे साई सुधरसन किंवा करुण नायर यापैकी एकासाठी तिसऱ्या क्रमांकाचे स्थान खुले होऊ शकते. अहवालानुसार, काही नवीन नावे वगळता, संघात जवळजवळ तीच नावे असतील जी नोव्हेंबर-जानेवारीमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती.