फोटो सौजन्य - iplt20 सोशल मीडिया
Ashwani Kumar is Mumbai Indians’ best all-rounder : सोमवारी मुंबई इंडियन्सकडून कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध खेळताना पदार्पण करणाऱ्या युवा वेगवान गोलंदाज अश्विनी कुमारने एक मोठा खुलासा केला आहे. आयपीएल पदार्पणात ४ विकेट घेणारा अश्विन पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. त्याने सांगितले की तो त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात फक्त एक केळ खाल्ल्यानंतर मैदानात उतरला होता. २३ वर्षीय गोलंदाजाने तीन षटकांत केवळ २४ धावा देत चार महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही घोषित करण्यात आले.
अश्विनी कुमारने सांगितले की, पदार्पणापूर्वी तो खूप घाबरला होता, पण हळूहळू सर्व काही ठीक झाले. सामन्यानंतरच्या सादरीकरणात तो म्हणाला, ‘मला खूप चांगले वाटत आहे. सुरुवातीला मला दबाव जाणवत होता, पण संघातील वातावरणाने मला तसे वाटू दिले नाही. सामन्यापूर्वी मी फक्त एक केळ खाल्ले कारण मी घाबरलो होतो. यामुळे मला फार भूक लागत नव्हती. मी थोडी योजना आखली होती, पण कर्णधाराने मला सांगितले की सामना एन्जॉय कर आणि मी जे करत आहे ते करत राहा.
प्रत्येक सामन्यानंतर प्रत्येक संघाच्या त्यांच्या बेस्ट खेळाडूला बॅच दिले जाते आणि सत्कार केला जातो. यामध्ये सर्वोत्तम अष्टपैलूमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकत्ता सामन्याचा पुरस्कार मुंबई इंडियन्सच्या संघाने अश्वनी कुमार याला दिला. यावेळी हार्दिक पांड्याने त्याला हे बॅच लावले. यावेळी हार्दिक पांड्या म्हणाला, जेव्हा आपण मैदानात होतो आणि हडल केलं होतं तेव्हा मी सर्वांना सांगितलं होतं की खेळाची तीव्रता काय आहे निर्दयता दाखवा आणि आज अश्वनी तू दाखवून दिले मला खूप तुझा अभिमान आहे असे हार्दिक पांड्या युवा खेळाडूला म्हणाला.
बॅच मिळाल्यानंतर अश्विनी सर्वांसमोर म्हणाला की मला खूप चांगले वाटत आहे की मला एवढ्या मोठ्या खेळाडूंमध्ये खेळण्याची संधी मिळाली चांगला टीममध्ये त्याचबरोबर मी अशीच कामगिरी करत राहील आणि संघाला जिंकवत राहील.
या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद करणारा पहिला गोलंदाज होता. त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये, त्याने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली आणि रिंकू सिंग, आंद्रे रसेल आणि मनीष पांडे यांच्या मोठ्या विकेट्स घेत कोलकाताचे कंबरडे मोडले. या २३ वर्षीय गोलंदाजाला गेल्या वर्षी पंजाब किंग्ज संघात स्थान देण्यात आले होते, परंतु त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.