सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमला गवई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
सध्या देशाचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई हे कार्यरत आहे. कमला गवई या त्यांच्या आई आहेत. अमरावती येथील संघाच्या शाखेने त्यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित केले. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. कमला गवई या दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाशी नाळ जोडलेली असताना त्या संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता असल्यामुळे जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
5 ऑक्टोबर 2025 रोजी अमरावती येथील श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या पटांगणात संध्याकाळी 6 वाजता विजयादशमी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारणीचे सदस्य आणि प्रज्ञा प्रवाहाचे संयोजक जे. नंदकुमार या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असतील. तर कमला गवई यांना सुद्धा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. अमरावतीमधील या विजयादशमीच्या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
गवई कुटुंबामध्ये आंबेडकरी चळवळीची परंपरा
भूषण गवई हे सध्या देशाचे सरन्यायाधीश आहेत. सरन्यायाधीशांचे वडील आणि कमला गवई यांचे पती रा.सू. गवई यांनी विदर्भात रिपब्लिकन पक्षाची जबाबदारी सांभाळली आहे. गवई कुटुंब रिपब्लिकन चळवळीशी संबंधित आहेत. कमला गवई आता चक्क भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर जाण्याची शक्यता असल्याने आंबेडकरी चळवळीत चर्चा होत आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना रा.सू.गवई हे मंत्री होते. ते पवारांचे निकटवर्तीय मानले जात. पुढे ते राज्यपाल झाले. रा.सू.गवई यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र राजेंद्र गवई हे रिपब्लिकन पक्षाची धुरा सांभाळत आहेत. त्यामुळे कलमा गवई यांचे संघाच्या कार्यक्रमामधील सहभागावरुन चर्चांना उधाण आले आहे
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नागपूरमध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे
विजयादशमी आणि त्यानंतरच्या एका आठवड्यासाठी, जास्तीत जास्त स्वयंसेवक संघाच्या सर्व शाखांमध्ये पूर्ण गणवेशात उपस्थित राहून संघाचे ध्येय स्पष्ट करतील. प्रभाग आणि मंडळ पातळीवर सामाजिक मेळावे आयोजित केले जातील. ब्लॉक पातळीवर सामाजिक सलोखा बैठका घेतल्या जातील. याव्यतिरिक्त, सर्व प्रमुख सामाजिकदृष्ट्या सक्रिय व्यक्तींना आमंत्रित करून एक मोठी जाहीर सभा आयोजित केली जाईल. युवा जागृती कार्यक्रम देखील आयोजित केले जातील.दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त नागपूरमध्ये होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक मोहन भागवत हे देखील या कार्यक्रमाला संबोधित करतील. पहिल्यांदाच नागपुरात तीन ‘पथ संचलन’ (स्वयंसेवक परेड) आयोजित केल्या आहेत.






