उपवासाच्या दिवशी कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट उपवासाची करंजी
नवरात्री उत्सवाचा आज सातवा दिवस. नऊ दिवसांच्या नवरात्री उत्सवात सगळीकडे मोठा जलोष असतो. या दिवसांमध्ये देवीची मनोभावे पूजा करून देवीच्या वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. याशिवाय उपवास केल्यानंतर नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये उपवासाची कुरकुरीत करंजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दिवाळीच्या दिवसांमध्ये घरात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे करंजी. खोबर आणि सुका मेवा वापरून बनवलेली करंजी चवीला अतिशय सुंदर लागते. उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणा, भगर किंवा राजगिऱ्याच्या पिठापासून काही ठराविक पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच तेच तेच खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. चला तर जाणून घेऊया उपवासाची करंजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
जेवणात चार घास जातील जास्त! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत लसूण लोणचं, नोट करून घ्या रेसिपी