पाकिस्तान वि यूएई(फोटो-सोशल मीडिया)
Pakistan vs UAE : आशिया कप २०२५ मधील आज १० सामना पाकिस्तान आणि यूएई या संघात खेळवण्यात येणार असताना अचानक पाकिस्तान संघ आशिया कपमधून माघार घेणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. याबाबत पीसीबीने आयसीसीसोबत चर्चा देखील केली आहे. या कारणाने ८ वाजता सुरू होणारा सामना वेळेत सुरू होऊ शकला नाही. आता अखेर पाकिस्तान संघ यूएईविरुद्ध सामना खेळणार आहे. त्यामुळे आता आजचा दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार असलेला सामना रात्री भारतीय वेळेनुसार ९ वाजता सुरू होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
दोन्ही संघांसाठी आजचा हा नॉकआउट सामना असेल. या सामन्यात दोन्ही संघाला विजय मिळवणे खूप महत्वाचे असणार आहे. कारण आजचा विजेता संघ पुढील फेरीत धडक मारणार आहे. तर पराभूत संघाचे मात्र या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आज दोन्ही संघांचे अस्तित्व पणाला लागणार आहे.
पाकिस्तान संघाकडून आशिया कप २०२५ स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पीसीबीने पाकिस्तान संघाला मैदानात जण्यापासून रोखले होते आणि त्यांना हॉटेलमध्येच थंबण्याचे आदेश दिले होते. त्यामागील कारण म्हणजे “मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याशी अलिकडेच झालेल्या हस्तांदोलन प्रकरणाच्या वादावरून पाकिस्तान संघाकडून आशिया कप २०२५ मध्ये संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या त्यांच्या शेवटच्या गट-स्टेज सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आला होता.” त्यामुळे पाकिस्तान संघ वेळेत मैदानावर पोहचू शकला नाही आणि म्हणून सामन्याला विलंब झाला आता मात्र आयसीसीसोबत चर्चा करून या सामन्यात पाकिस्तान खेळणार आहे. सामना रात्री ९ वाजता सुरू होणार आहे.
हेही वाचा : अरेरे! काय रे पाकिस्ताना? पुन्हा नाचक्कीच! जपानमध्ये जाण्यासाठी बनावट फुटबॉल संघ बनवला; विमानतळावर अटक
दोन्ही संघ खालीलप्रमाणे
यूएई संघ : मोहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, राहुल चोप्रा (यष्टीरक्षक), आसिफ खान, मोहम्मद जोहैब, हर्षित कौशिक, मोहम्मद फारूख, मोहम्मद जवादुल्ला, सगीर खान, हैदर अली, जुनैद सिद्दीकी, मोहम्मद रोहिद खान, आर्यन शर्मा, ध्रुव पराशर, मतिरान सिंह, मतिरान खान, ध्रुव पराशर.
पाकिस्तान संघ : साहिबजादा फरहान, सैम अयुब, फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद, मोहम्मद वसीम ज्युनियर, हसन अली, हुसेन तलत, खुशदील शाह, सलमान मिर्झा, सुलेम मिर्झा.
हेही वाचा : PAK vs UAE : मोठी बातमी ! भारताशी पंगा माहागात! पाकिस्तान Asia cup 2025 मधून बाहेर! PCB ची घोषणा